Thursday, February 10, 2022

 प्रादेशिक परिवहनच्या

अनुज्ञाप्तीसाठी शनिवारी मुलाखत

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे 7 फेब्रुवारी रोजीच्या अनुज्ञाप्तीसाठीची मुलाखत शनिवार 12 फेब्रुवारी रोजी सुधारीत करण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000 

 नांदेड जिल्ह्यात 30 व्यक्ती कोरोना बाधित

तर 199 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 929 अहवालापैकी 30 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 26 तर अँटिजेन तपासणीद्वारे 4 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 469 एवढी झाली असून यातील 99 हजार 177 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 407 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

बुधवार 9 फेब्रुवारी रोजी गांधीनगर बिलोली येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 686 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 9, नांदेड ग्रामीण 1, धर्माबाद 1, हदगाव 2, किनवट 1, लोहा 2, कंधार 1, परभणी 2, लातूर 1, यवतमाळ 1, हिंगोली 4, नागपूर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे बिलोली 2, कंधार 1, मुदखेड 1 असे एकुण 30 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 85,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 111, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 199 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 21, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 219, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 145, खाजगी रुग्णालय 20 असे एकुण 407 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 58 हजार 240

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 40 हजार 66

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 469

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 376

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 686

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.98 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-407

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

विकास प्रक्रीयेत सक्रीय सहभागासाठी

योजनांची माहिती रेल्वेद्वारे लोकांपर्यंत 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जनसामान्याच्या प्रगतीसाठी विविध विकास योजना शासनाने हाती घेतल्या आहेत. यात त्या-त्या घटकांचा सकारात्मक सहभाग व्हावा व त्यांच्यापर्यत या योजना पोहचाव्यात या उद्देशाने विविध योजनांची माहिती रेल्वेद्वारे लोकांपर्यत पोहचवली जात आहेत. मराठवाड्यातील किनवटपर्यत ही माहिती पोहचविण्यासाठी नंदिग्राम एक्सप्रेसची निवड करण्यात आली असून यावर ही योजनाची माहिती दर्शविण्यात आली आहे. दिनांक 8 फेब्रुवारीपासून नंदिग्राम एक्सप्रेसवर ही माहिती प्रदर्शित केली जात आहे. 

मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात महाविकास आघाडी शासनाने विविध विकासात्मक योजना राबविल्या. या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य तर दिलेच शिवाय विविध विकास योजनाही प्रभावीपणे लोकापर्यत पोहचविल्या. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातर्गत आपला महाराष्ट्र आपले सरकार, दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची अंतर्गत शासनाने राबविलेल्या योजनामध्ये समृध्दी महामार्ग, आपदग्रस्तांना दिलासा, उद्योग पर्यटन, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून भरीव तरतूद,  आपदग्रस्ताना मदत वितरीत, कोल्हापूर, सांगली साताऱ्यात एसडीआरएफ व शासनाच्यामाध्यमातून पुरग्रस्तांना सावरण्यासाठी युध्द पातळीवर मदत, विविध तैनात केलेली पथके आपत्तीपासून सुरक्षिततेची हमी, पांढऱ्या सोने अर्थात कापसाच्या विक्रमी खरेदीसाठी मदत, उच्च शिक्षण गोंडवाना विद्यापिठात पदव्युत्तर अभ्यासक्रम, ई-पिक पाहणी, व्यापक लसीकरण, चिंतामुक्त शेतकरी आदी विकास योजनाचा समावेश आहे. रेल्वेच्या माध्यमातूनही विकास योजनाची माहिती मिळत असल्याने प्रवाशानी समाधान व्यक्त केले.

00000








 मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट)

प्रकल्पातंर्गत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत नांदेड जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्था कडून मूल्य साखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज शेतमाल, शेळ्या (मांस व दुध) व पसबागेतील कुक्कुटपालन (अंडी) मूल्यसाखळी विकासाच्या उपक्रमासाठी आहेत. पात्र समुदाय आधारित संस्थानी https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर अर्ज करावे तसेच ऑफलाईन अर्ज  दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत खालील दिल्याप्रमाणे संबंधित कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा यांनी केले आहे. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती  अभियानांतर्गंत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचालित साधन केंद्र यांचा समावेश आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत, अर्जाचा नमूना आदी  माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून  इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावर डाऊनलोड करून त्यामध्ये माहिती आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून द्यावी.  शेतकरी उत्पादक कंपनी यांनी  प्रकल्प संचालक , आत्मा कार्यालय तसेच लोकसंचलित साधन केद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक एमएसआरएलएम यांच्या कार्यालयात ऑफलाईलन अर्ज सादर करावेत. या अगोदर अर्ज केलेल्या संस्थांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही असे आवाहन जिल्हा अंमलबजावणी  कक्ष (स्मार्ट) तथा संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

000000

 धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थासाठी

पायाभूत सोयी सुविधाबाबत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सन 2021-22 साठी या योजनेतर्गंत कमाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभासाठी अर्जाचा नमूना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूकांनी अर्ज जिल्‍हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालयात 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शिख व पारसी मिळून) किमान  70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.

 

या योजनेतर्गंत अनुज्ञेय असलेल्या पायाभूत सोयी-सुविधा या प्रमाणे आहेत. शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे, ग्रंथालय अद्ययावत करणे, प्रयोगशाळा उभारणे, अद्यावत करणे,संगणक कक्ष उभारणे, अद्ययावत करणे, प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे, डागडुजी करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टर, जनरेटरची सुविधा निर्माण करणे, झेरॉक्स मशीन, अध्ययनाची साधने (लर्निग मटेरियल) एल.सी.डी.प्रोजेक्टर, अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर, इत्यादी, इंग्रजी लँग्वेज लॅब, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर इ. या योजनेतर्गंत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्या शाळा/संस्था यावर्षी अनुदानास पात्र असणार नाहीत. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज, प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...