Tuesday, March 23, 2021

 

नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 330 व्यक्ती कोरोना बाधित

दहा जणांचा मृत्यू

अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 473 अहवालापैकी 1 हजार 330 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 699 तर अँटिजेन तपासणीद्वारे 631 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 34 हजार 337 एवढी झाली आहे. 

रविवार 21 मार्च 2021 रोजी कैलासनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका पुरुषाचा, हदगाव येथील द्रोणागिरीनगर येथील 85 व 48 वर्षाच्या दोन महिलेचा, राज कॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, मिलत्तनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर सोमवार 22 मार्च रोजी विनायकनगर नांदेड येथील 72 वर्षाच्या एका महिलेचा व मंगळवार 23 मार्च रोजी हदगाव येथील 79 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर  सोमवार 22 मार्च रोजी राजकॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, विद्युतनगर नांदेड येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा खासजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 668 एवढी झाली आहे. 

आजच्या 5 हजार 473 अहवालापैकी 4 हजार 38 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 34 हजार 337 एवढी झाली असून यातील 26 हजार 293 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 7 हजार 144 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 307, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 5, धर्माबाद तालुक्यांतर्गत 5, किनवट कोविड रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 21, मुखेड 9, माहूर कोविड केअर सेंटर 8, उमरी तालुक्यांतर्गत 20, खाजगी रुग्णालय 40 असे एकूण 438 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.57 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 514, अर्धापूर तालुक्यात 14, बिलोली 2, धर्माबाद 2, हिमायतनगर 1, किनवट 10, मुखेड 34, उमरी 1, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 26, भोकर 4, देगलूर 4, हदगाव 36, कंधार 12, लोहा 24, नायगाव 11, परभणी 2 असे एकूण 699 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 374, अर्धापूर तालुक्यात 1, बिलोली 32, धर्माबाद 13, कंधार 7, लोहा 36, मुदखेड 3, नायगाव 8, औरंगाबाद 1, राज्यस्थान 1, परभणी 2, नांदेड ग्रामीण 40, भोकर 1, देगलूर 9, हदगाव 17, किनवट 35, माहूर 11, मुखेड 33, उमरी 5, लातूर 1, हिंगोली 1 असे एकूण 531 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 7 हजार 144 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 226, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 88, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 98, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 31, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 87, मुखेड कोविड रुग्णालय 153, देगलूर कोविड रुग्णालय 52, हदगाव कोविड रुग्णालय 16, लोहा कोविड रुग्णालय 130, कंधार कोविड केअर सेंटर 28, महसूल कोविड केअर सेंटर 126, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 399, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 199, खाजगी रुग्णालय 514 आहेत. 

मंगळवार 23 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 80 हजार 973

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 40 हजार 879

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 34 हजार 337

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 26 हजार 283

एकुण मृत्यू संख्या-668

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.57 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-79

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-411

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-7 हजार 144

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-59.

00000

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेच्या

फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी उपक्रमाचे उद्घाटन

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते दोन वाहनांना हिरवी झेंडी

नांदेड (जिमाका) दि. 23 :- विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागात व्हावी या उद्देशाने फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाचे आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, माहिती सहायक अलका पाटील आदी उपस्थित होते. कोरोनाच्या त्रीसूत्रीसह हे वाहन ग्रामीण भागामध्ये जनजागृतीचे काम करेल. सामाजिक न्यायाच्या विविध योजनांची माहिती असलेले हे दोन वाहने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून जनजागृती करतील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून ही वाहने बुधवार 24 मार्च रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी मार्गस्थ होणार आहेत. 

कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ग्रामीण भागात त्रीसूत्रीच्या जनजागृतीसह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती या फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यातील गावात पोहचविण्याचा प्रयत्न आहे. वाहनांवरील श्राव्य (ऑडियो) ध्वनीफितीद्वारे योजनांची माहिती असणाऱ्या जींगल्स ऐकविण्यात येणार आहेत. गावा-गावात पोहचून विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचीत जातींसाठीच्या विद्यार्थी, तरूण तसेच महिला, शेतकरी आदी घटकांसाठीच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विविध प्रकारची प्रशिक्षणे, महिला सक्षमीकरण, लाभार्थी व समूह योजनांची माहिती पोहचविण्याचा उद्देश आहे. या वाहनांना जिल्ह्यातील आठ-आठ तालुक्यांची विभागणी करून देण्यात आली असून त्यासाठीचा मार्गही निश्चित करण्यात आला आहे.  





000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...