Sunday, August 14, 2016

पशुसंवर्धन, वस्त्रोद्योग राज्यमंत्री
अर्जुन खोतकर यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 14 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड जिल्हयाच्या दौऱ्यावर असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
  रविवार 14 ऑगस्ट, 2016 रोजी देविदहेगाव येथून मोटरीने सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे  आगमन व राखीव (मुक्काम).
 सोमवार 15 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 8.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन. सकाळी 9.05 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधुनिकीकरण झालेल्या शाखेचे उद्घाटन तसेच आपले नांदेड एन्ड्राईड मोबाईल ॲप्लिकेशनचे उद्घाटन स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. 9.50 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून मोटारीने पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेडकडे प्रयाण. 9.55 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे आगमन व सायबर लॅबचा उद्घाटन कार्यक्रम व इतर कार्यक्रमास उपस्थिती. 10.54 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथून मोटारीने गुंडेगाव तालुका नांदेडकडे प्रयाण. 11.30 वा. गुंडेगाव तालुका नांदेड येथे आगमन व जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामाची पाहणी व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने नांदेड रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. सायं. 5.55 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000
शिवाजी पुतळा ते महात्मा गांधी पुतळा परिसरात बंदी आदेश
नांदेड, दि. 14 :-  नांदेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात रविवार मध्यरात्री 12 वाजेपासून सोमवार 15 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
सोमवारी 15 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात होणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर रविवार मध्यरात्री 12 वाजेपासून सोमवार 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली इत्यादी आंदोलन करण्यात येऊ नयेत. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये  बंदी आदेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून देण्यात आली.

000000
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 621 मि.मी. पाऊस
हंगामात पावसाची टक्केवारी 64.99 इतकी 
          नांदेड, दि. 14 :- जिल्ह्यात रविवार 14 ऑगस्ट 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 53.93 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 3.37  मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे.  तर जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 621.00 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. यंदाच्या  हंगामातील  पावसाची  टक्केवारी  64.99 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात रविवार 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 2.63 (601.72), मुदखेड- निरंक (523.68), अर्धापूर- 1.33 (656.32) , भोकर- 10.50 (848.00) , उमरी- निरंक (482.93), कंधार- 11.00 (501.48), लोहा- 8.33 (619.83), किनवट- 7.29 (729.86), माहूर- 1.00 (875.25), हदगाव- 1.14 (758.98), हिमायतनगर- 3.67 (719.65), देगलूर- 0.50 (410.51), बिलोली- निरंक (620.20), धर्माबाद- 3.00 (537.36), नायगाव- 1.40  (535.60), मुखेड- 2.14 (514.69) आज  अखेर  पावसाची सरासरी 621.00  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 9936.06) मिलीमीटर आहे.  

000000
स्वातंत्र्य दिन मुख्य समारंभात आज
राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 14 :- भारतीय स्वातंत्र्याच्या  69 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 15 ऑगस्ट, 2016  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...