Monday, February 11, 2019

टंचाईग्रस्त गावांना दिलासा
देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील
-         पाणी पुरवठा राज्यमंत्री खोत  
नांदेड, दि. 11 :- राज्य शासनाने
 
दुष्काळग्रस्तांना दिलासा देणारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून टंचाईग्रस्त गावांना मदत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील, अशी ग्वाही राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
बिलोली व देगलूर उपविभागातील कृषि, पाणीपुरवठा व दुष्काळ परिस्थितीचा आढावा राज्यमंत्री श्री. खोत यांनी बिलोली पंचायत समिती सभागृहात आज घेतला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, डॉ. मिनलताई खतगावकर, पंचायत समिती सभापती श्री बोधणे, विशेषकार्य अधिकारी मधु गिरगावकर, विभागीय कृषि सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तहसिलदार विक्रम राजपुत, अरविंद बोळगे, सुरेखा नांदे, अतुल जटाळे, राजेश लांडगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले, टंचाई काळात गावातील माणसाला पाण्याबरोबर जनावराला चारा व हाताला कामाची गरज असते. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपल्यास्तरावर निर्णय घेऊन एकोप्याने कामे त्वरीत पूर्ण करावीत. टंचाई काळात उपाय योजनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा व विभागस्तरावर दिले आहेत. पाणी पातळी घटलेल्या गावातील पिण्याचे प्रश्न सुटतील असे प्रस्ताव त्वरीत तयार करावेत व जुन्या कामाचे दुरुस्ती प्रस्तावाला लागणारा निधी दिला जाईल. बोगस कामे केलेल्या पाणी पुरवठा कंत्राटदारांची यादी करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी. पाणी पुरवठा योजनेपासून गावे वंचीत राहणार नाहीत तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी गावपातळीवर होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहिले पाहिजे. दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी बिलोली व देगलूर उपविभागातील पाणी पुरवठा प्रश्नासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात लवकरच घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कृषि, पाणी पुरवठ्यासह विविध विषयांवर आमदार सुभाष साबणे व आमदार राम पाटील रातोळीकर यांनी चर्चा करुन उपयुक्त सुचना केल्या.
बैठकीस विविध गावातील सरपंच, पदाधिकारी, नायब तहसिलदार संजय नागमवाड, ओमप्रकाश गोंड, पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक शुभांगी गोंड, उपअभियंता पाणी पुरवठा श्री. गायकवाड, वनअधिकारी कोळी, तालुका कृषि अधिकारी घुगे, शितोळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागेश लखमावाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री पवार यांचेसह इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
000000

पेरणी ते कापणीचा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना
देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा विचार  
-         कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत  
नांदेड, दि. 11 :- शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतली असून या माध्यमातून कृषि क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. पेरणी ते कापणीचा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा विचार असल्याचे राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 
संस्कृति संवर्धन मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त कृषि तंत्रज्ञान महोत्सव 2019 चे कृषि विभाग नांदेड व कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शेतकरी व महिला मेळाव्याचे आयोजन शारदानगर सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वसुंधरा सभागृह मैदानावर केले होते. या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. खोत यांचे हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, विशेषकार्य अधिकारी मधु गिरगावकर, रयतक्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे, तहसिलदार विक्रम राजपुत, विभागीय कृषि सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे, विभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, जिल्हा रेशीम अधिकारी पुंडलिक नरवाडे, तहसीलदार विक्रम राजपूत, कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंगिनी सरंबेकर, माविमचे प्रकल्प संचालक चंदनसिंह राठोड उपस्थित होते.
दुष्काळात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेती शिवारात जावून काम पाहणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेव असल्याचे नमूद करुन राज्यमंत्री श्री. खोत पुढे म्हणाले, शेतकरी व नागरिकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयाची राज्यात चांगली अंमलबजावणी होत आहे. शेतकऱ्यांचे तूर, हरभरा खरेदी व बोंडअळीचे पैसे जमा केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीत नवीन तंत्र आवश्यक असून कृषि विज्ञान केंद्र हे शेतीचा दवाखाणा असून बदलत्या वातावरणात पिकाच्या निवडीसाठी विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून केंद्राचे काम महत्वाचे आहे. त्याप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्य करीत आहे. मागील 60 वर्षापासून ही संस्था शिक्षणासह शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
            आमदार साबणे यांनी येथील संस्था शेतकऱ्यांसाठी एकरूप होऊन काम करीत असल्याचे म्हणाले. संस्थेचे चेअरमन देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या हिताची जाणीव असलेले राज्यमंत्री खोत यांची ओळख असून राज्य सरकार वंचितासाठी चांगले काम करत असल्याचे नमूद केले.
सुरुवातीला राज्यमंत्री श्री. खोत यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट देऊन पीकशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून पिकांची माहिती घेतली. त्यानंतर केंद्रातील कृषि निविष्टा विक्री केंद्र, प्ररीक्षण प्रयोगशाळेची पाहणी केली.    
यावेळी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका व बियाणांचे वाटप करण्यात आले. महिला उद्योजक श्रीमती सीताबाई मोहिते व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. निरुपमा देशपांडे यांनी बचत गट व शेतकरी महिलांना  मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन माधुरी देवणवार तर आभार व्यंकट शिंदे यांनी मानले. या परिसरात कृषि अवजारे व शेतीपुरक उत्पादने, माती नमुना, कीड व्यवस्थापन, रोपवाटिका आदी विषयी माहिती तसेच विक्रीचे दालने उभी आहेत. याठिकाणी शेतकरी, महिला, परिसरतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
000000

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...