Thursday, February 1, 2024

 वृत्त क्र. 96

 

महासंस्कृती महोत्सवा

शिवकालीन पारंपारीक खेळ सादर करण्‍याची खेळाडूंना संधी

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदानस्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनतसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवाय्यांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्याचे महाराष्‍ट्र शासनाचे निर्देश आहेत.

 

त्‍याअनुषंगाने नांदेड जिल्‍हामध्‍ये जिल्हा प्रशासन नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे महासंस्‍कृतीक महोत्‍सव अंतर्गत शिवकालीन पारंपारीक खेळाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्ये  खो-खो व कबड्डी या खेळामध्ये सन 2023-24 या वर्षातील शालेय तालुकास्तरावर 19 वर्षाआतील मुले-मुली संघनी प्रथम क्रमांक संपादन केलेल्या संघास संधी देण्यात येणार आहे.  कुस्ती या खेळप्रकाराकरीता 19 वर्षाआतील मुले-मुली खेळाडूंना आपली नावे नोंदविता येतील व आटयापटया, लेझीम, लाठीकाठी, रस्सीखेच, गतका, लगोरी व मल्लखांब (पुरुष व महिला खुला गट) या खेळाचा समावेश यात करण्यात आला आहे. या क्रीडा प्रकारात पारंगत असणाऱ्या जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत विहित नमुन्यातील फॉ भरुन खेळाडूची/संघाची प्रवेशिका ई-मेल आयडी dsonanded@rediffmail.com यावर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावेत.

 

या कालावधी नंतर प्राप्‍त प्रवेश अर्जाची छाणणी होऊन समितीद्वारे अंतिम करण्‍यात येवूननिवडक खेळाडूं/ संघास "महासंस्‍कृती महोत्‍सवात" सहभाग घेता येईल. वैयक्तिक व सांघीक खेळ प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणा-या खेळाडू / संघास रोख पारीतोषीक व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते पुरुष व महिला गटात स्वतंत्र देण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे महासंस्कृती महोत्सव समिती नांदेडच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

000000

 वृत्त क्र. 95

 

समाज कल्याण कार्यालयामार्फत

विविध महामंडळाचा मंगळवारी जिल्हास्तरीय मेळावा

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र शासनाचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्यावतीने सामाजिक न्याय विभागाअंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.नांदेडसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.नांदेड व संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.नांदेड या विविध महामंडळांचे एक दिवशीय जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन मंगळवार फेब्रुवारी 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे करण्यात आले आहे.

 

सदर महामंडळाच्या लाभार्थ्यांचे कर्ज मंजुरीचे कर्ज प्रस्ताव बँकेकडून तात्काळ मंजूर करण्याच्या उद्देशाने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेडजिल्हा अग्रणी बँक अधिकारीजिल्हा समन्वयक अधिकारी व उपरोक्त महामंडाळांचे जिल्हा व्यवस्थापक तसेच लाभार्थी यांचे मंगळवार फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्हयातील संबंधीत महामंडळाचे सर्व लाभार्थी व नागरीक यांनी या एकदिवसीय मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्र.94

शेतकऱ्यांना विदेश अभ्यास दौऱ्यासाठी

फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- कृषि विभागामार्फत विविध देशांनी विकसित केलेली शेती विषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी केलेला अवलंब त्याद्वारे त्यांचे उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या- त्या देशातील शास्त्रज्ञशेतकरी यांचेशी प्रत्यक्ष चर्चाक्षेत्रीय भेटी घेण्यात येणार आहेत. तसेच तेथील संस्थांना भेटी द्वारे शेतकऱ्यांच्या ज्ञान व क्षमता उंचविण्यासाठी राज्य पुरस्कृत योजना २०२३-२४ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे देशातील अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत. तरी कागदपत्रांची पुर्तता होत असलेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विभागाकडे संपर्क करुन विहित प्रपत्रातील अर्जासह व आवश्यक कागदपत्रासह फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन êüजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

विदेश अभ्यास दौऱ्यासाठी राज्यातील ३४ जिल्हयातून प्रत्येकी ३ नुसार १०२ व राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार १८ असे एकूण १२० शेतकरी व ६ अधिकारी यांची निवड केली जाणार आहे. क्षेत्रीय स्तरावरील निवड प्रक्रिया पुर्ण करुन ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत शेतकरी याद्या कृषि आयुक्तालयाकडे सादर करण्याचे निर्देश आहेत.

 

राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत जर्मनीफ्रान्सस्पेनस्वित्झरलँडन्यूझीलंडनेदरलँडव्हिएतनाममलेशियाथायलंडपेरूब्राझीलचिलीऑस्ट्रेलियासिंगापुर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील कोकण कृषि विभागातून ५ जिल्हयातुन १५ शेतकरीनाशिक कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरीपुणे कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरीकोल्हापूर कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरीछत्रपती संभाजी नगर कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरीलातूर कृषि विभागातून ५ जिल्हयातुन १५ शेतकरीअमरावती कृषि विभागातून ५ जिल्हयातुन १५ शेतकरी व नागपुर कृषि विभागातून ६ जिल्हयातुन १८शेतकरी असे एकुण १०२ शेतकऱ्यांची विदेशातील अभ्यास दौ-यासाठी निवड केली जाणार आहे.

 

जिल्हयातील ३ शेतकऱ्यांची निवड विदेश अभ्यास दौऱ्यासाठी करावयाची असून शेतकरी निकष पुढील प्रमाणे आहेत.

 

अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा, स्वत:च्या नावे चालु कालावधीचा सातबाराव ८ अ उतारा असणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वंय घोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र -१), शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल, निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही, सोबत शिधापत्रिका झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब व्याख्यामध्ये पतीपत्नी व १८ वर्षाखालील मुले/मुली), शेतकऱ्यांने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे, शेतकरी किमान बारावी पास असावा. बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे, शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवशी ६० वर्षापेक्षा जास्त नसावे. (त्यासाठी पारपत्रानुसार वयाची पडताळणी करण्यात येईल), शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा, पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानांची झेरॉक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान सहा महिने असावी, शेतकरी शासकीयनिमशासकीयसहकारीखाजगी संस्थेत नोकरीस नसावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरवकीलसीए (चार्टड अकाउंटंट)अभियंताकंत्राटदार इ.नसावा, तसेच त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र-१), शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फतकृषि विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा, तसेच त्याने स्वतःस्वयं घोषणा पत्रात नमूद करावे (प्रपत्र-१), शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे, कोरोना विषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषि विभागास सादर करणे बंधनकारक आहे, अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग ७-१० दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारिरीकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.

 

अनुदान

शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५०

टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख (रुपये एक लाख फक्त) यापैकी कमी असेल ती रक्कम

अनुदान म्हणून देय आहे.

 

शेतकरी निवड कार्यपध्दती


राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सोबत सहपत्रित

केलेल्या प्रपत्र-९ वरील अर्जाप्रमाणे माहिती भरुन संबंधीत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे

प्रस्ताव सादर करतील. तालुका कृषि अधिकारी यांनी प्रपत्र-६ मध्ये निश्चित केलेल्या कालावधीपर्यंतच प्रस्ताव स्विकारुन प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी व छानणी करुन जे शेतकरी निवडीचे निकष पूर्ण करत आहेत अशा प्रस्तावांनाच प्रपत्र-७ नुसार प्रमाणीत करुन अशा पात्र शेतकयांचे प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे विहीत कालावधीत (प्रपत्र-६) मध्ये सादर करतील. जिल्हास्तरावर हा प्रस्ताव विभागीय कृषि सहसंचालक यांचेकडे सादर करणेकरीता समिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आलेली असून प्रकल्प संचालक आत्माजिल्हा कार्यक्षेत्रातील एक उपविभागीय कृषि अधिकारी सदस्य व जिअकृअ कार्यालतील कृषि उपसंचालक हे सदस्य सचिव असतील.

 

जिल्हास्तरीय समितीस तालुकास्तरावरुन पात्र शेतक-यांचे प्रस्ताव मार्गदर्शक सुचना अटी व शर्तीनुसार तपासणी/छाननी करतील. जे प्रस्ताव पात्र असतील अशा प्रस्तावांची सोडत पध्दतीने सोडत काढून जिल्हयातील जेष्ठता क्रमवारी निश्चित करतील.सोडत पध्दत शेतकऱ्यांच्या उपस्थित जिल्हास्तरीय समिती समोर चलचित्रीकरण (व्हिडीओग्राफी) मध्ये होईल. जिल्हास्तरावरील सोडतीनुसार जेष्ठता क्रमवारी निश्चित केलेले प्रस्ताव व यादी विभागीय कृषि सहसंचालक यांचेमार्फत कृषि आयुक्तालयास सादर केले जातीलराज्यस्तरीय समिती जेष्ठता क्रमवारी निश्चित केलेले प्रस्ताव व यादीस अंतिम मान्यता देऊन पुढील कार्यवाही करतील.

00000 

 वृत्त क्र.94

महासंस्कृती महोत्सवात

स्थानिक कलावंताना कला सादर करण्याची संधी

नांदेड (जिमाका) दि. 1 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदानस्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनतसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवाय्यांची माहिती इ. बाबी जनसाम्गन्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्याने शासनाचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये 16, 17 व 18 फेब्रुवारी 2024 रोजी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये लोककला पोवाडाभारुडगोंधळवाघ्या मुरळीभजनजोगवा इ. लोकसंगीत शास्त्रीय गायनलोकगीतजात्यावरील ओव्याभुलैय्यागवळण व वादनाचे विविध प्रकार इ.
लोकनृत्य शास्त्रीय नृत्यआदिवासी नृत्यलोक उत्सव नृत्यलावणीकोळी नृत्यधनगरी नृत्य व महाराष्ट्र परंपरेवर आधारित समुह नृत्य इ. कला प्रकारांचा समावेश असणार आहे.

या कला प्रकारात पारंगत असणाऱ्या स्थानिक कलावंतांनी व  फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी वाजेपर्यंत त्यांचा कला प्रस्ताव जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारीपहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालयनांदेड येथे सादर करावेत. या कालावधीत प्राप्त प्रस्ताव समितीद्वारे अंतिम करण्यात येतील. निवडक कलावंताना महासंस्कृती महोत्सवात सादरीकरण करण्यास अनुमती देण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या कलावंतांना समितीने मान्य केलेले एकत्रीत मानधन अदा करण्यात येईल. तथापी सादरीकरणासाठी लागणारे विविध साहित्यवाद्य व वादकपोषाखसराव व इतर सामग्री स्वतः आणावी लागेल. त्यासाठी वेगळयाने निधी दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...