Thursday, February 1, 2024

 वृत्त क्र.94

शेतकऱ्यांना विदेश अभ्यास दौऱ्यासाठी

फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- कृषि विभागामार्फत विविध देशांनी विकसित केलेली शेती विषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी केलेला अवलंब त्याद्वारे त्यांचे उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या- त्या देशातील शास्त्रज्ञशेतकरी यांचेशी प्रत्यक्ष चर्चाक्षेत्रीय भेटी घेण्यात येणार आहेत. तसेच तेथील संस्थांना भेटी द्वारे शेतकऱ्यांच्या ज्ञान व क्षमता उंचविण्यासाठी राज्य पुरस्कृत योजना २०२३-२४ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे देशातील अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत. तरी कागदपत्रांची पुर्तता होत असलेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विभागाकडे संपर्क करुन विहित प्रपत्रातील अर्जासह व आवश्यक कागदपत्रासह फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन êüजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

विदेश अभ्यास दौऱ्यासाठी राज्यातील ३४ जिल्हयातून प्रत्येकी ३ नुसार १०२ व राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार १८ असे एकूण १२० शेतकरी व ६ अधिकारी यांची निवड केली जाणार आहे. क्षेत्रीय स्तरावरील निवड प्रक्रिया पुर्ण करुन ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत शेतकरी याद्या कृषि आयुक्तालयाकडे सादर करण्याचे निर्देश आहेत.

 

राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत जर्मनीफ्रान्सस्पेनस्वित्झरलँडन्यूझीलंडनेदरलँडव्हिएतनाममलेशियाथायलंडपेरूब्राझीलचिलीऑस्ट्रेलियासिंगापुर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील कोकण कृषि विभागातून ५ जिल्हयातुन १५ शेतकरीनाशिक कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरीपुणे कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरीकोल्हापूर कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरीछत्रपती संभाजी नगर कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरीलातूर कृषि विभागातून ५ जिल्हयातुन १५ शेतकरीअमरावती कृषि विभागातून ५ जिल्हयातुन १५ शेतकरी व नागपुर कृषि विभागातून ६ जिल्हयातुन १८शेतकरी असे एकुण १०२ शेतकऱ्यांची विदेशातील अभ्यास दौ-यासाठी निवड केली जाणार आहे.

 

जिल्हयातील ३ शेतकऱ्यांची निवड विदेश अभ्यास दौऱ्यासाठी करावयाची असून शेतकरी निकष पुढील प्रमाणे आहेत.

 

अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा, स्वत:च्या नावे चालु कालावधीचा सातबाराव ८ अ उतारा असणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वंय घोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र -१), शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल, निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही, सोबत शिधापत्रिका झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब व्याख्यामध्ये पतीपत्नी व १८ वर्षाखालील मुले/मुली), शेतकऱ्यांने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे, शेतकरी किमान बारावी पास असावा. बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे, शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवशी ६० वर्षापेक्षा जास्त नसावे. (त्यासाठी पारपत्रानुसार वयाची पडताळणी करण्यात येईल), शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा, पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानांची झेरॉक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान सहा महिने असावी, शेतकरी शासकीयनिमशासकीयसहकारीखाजगी संस्थेत नोकरीस नसावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरवकीलसीए (चार्टड अकाउंटंट)अभियंताकंत्राटदार इ.नसावा, तसेच त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र-१), शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फतकृषि विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा, तसेच त्याने स्वतःस्वयं घोषणा पत्रात नमूद करावे (प्रपत्र-१), शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे, कोरोना विषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषि विभागास सादर करणे बंधनकारक आहे, अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग ७-१० दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारिरीकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.

 

अनुदान

शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५०

टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख (रुपये एक लाख फक्त) यापैकी कमी असेल ती रक्कम

अनुदान म्हणून देय आहे.

 

शेतकरी निवड कार्यपध्दती


राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सोबत सहपत्रित

केलेल्या प्रपत्र-९ वरील अर्जाप्रमाणे माहिती भरुन संबंधीत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे

प्रस्ताव सादर करतील. तालुका कृषि अधिकारी यांनी प्रपत्र-६ मध्ये निश्चित केलेल्या कालावधीपर्यंतच प्रस्ताव स्विकारुन प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी व छानणी करुन जे शेतकरी निवडीचे निकष पूर्ण करत आहेत अशा प्रस्तावांनाच प्रपत्र-७ नुसार प्रमाणीत करुन अशा पात्र शेतकयांचे प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे विहीत कालावधीत (प्रपत्र-६) मध्ये सादर करतील. जिल्हास्तरावर हा प्रस्ताव विभागीय कृषि सहसंचालक यांचेकडे सादर करणेकरीता समिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आलेली असून प्रकल्प संचालक आत्माजिल्हा कार्यक्षेत्रातील एक उपविभागीय कृषि अधिकारी सदस्य व जिअकृअ कार्यालतील कृषि उपसंचालक हे सदस्य सचिव असतील.

 

जिल्हास्तरीय समितीस तालुकास्तरावरुन पात्र शेतक-यांचे प्रस्ताव मार्गदर्शक सुचना अटी व शर्तीनुसार तपासणी/छाननी करतील. जे प्रस्ताव पात्र असतील अशा प्रस्तावांची सोडत पध्दतीने सोडत काढून जिल्हयातील जेष्ठता क्रमवारी निश्चित करतील.सोडत पध्दत शेतकऱ्यांच्या उपस्थित जिल्हास्तरीय समिती समोर चलचित्रीकरण (व्हिडीओग्राफी) मध्ये होईल. जिल्हास्तरावरील सोडतीनुसार जेष्ठता क्रमवारी निश्चित केलेले प्रस्ताव व यादी विभागीय कृषि सहसंचालक यांचेमार्फत कृषि आयुक्तालयास सादर केले जातीलराज्यस्तरीय समिती जेष्ठता क्रमवारी निश्चित केलेले प्रस्ताव व यादीस अंतिम मान्यता देऊन पुढील कार्यवाही करतील.

00000 

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...