Saturday, September 19, 2020

 

शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार  

72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी   

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर परस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

जिल्ह्यात 15 ते 19 सप्टेंबर दरम्‍यान काही मंडळात अतिवृष्‍टी झाली असून काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शासन निर्णय 29 जून 2020 नुसार ज्‍या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरलेला आहे त्‍या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्‍या आत कळविणे बंधनकारक आहे. 

बऱ्याच शेतकऱ्यांना विमा कंपनीस सूचना देण्‍याची पद्धत माहिती नसल्‍यामुळे शेतकरी या नुकसानीची तक्रार विमा कंपनीस करत नाहीत. त्‍यामुळे नुकसान भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहतात. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी अशाप्रकारे अतिवृष्टी किंवा पूर परिस्‍थीतीमुळे पिकांचे नुकसान होत असेल तर पुढीलप्रमाणे विमा कंपनीला तक्रार नोंदवावी. यासाठी शेतकऱ्यांना 18001035490 या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवता येईल. कंपनीच्‍या ई-मेल आयडी suportagri@iffcotokio.co.in वर तक्रार नोंदवता येईल. क्रॉप इन्शोरन्‍स अॅपद्वारे ही तक्रार नोंदवता येईल. तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज देऊन तक्रार नोंदवता येईल. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

297 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

332 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 19 :- शनिवार 19 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 297 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 332 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 118 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 214 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 443 अहवालापैकी  1 हजार 70 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 13  हजार 316 एवढी झाली असून यातील 9  हजार 54 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 845 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 34 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात एकुण 7 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी बोधडी खुर्द किनवट येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा व 70 वर्षाच्या एका महिलेचा, लावंडी नायगाव येथील 66 वर्षाच्या एका पुरुषाचा, नांदेड शाहूनगर येथील 46 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर शनिवार 19 सप्टेंबर रोजी पिंपळगाव येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा व नांदेड दत्तनगर येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 350 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, बारड कोविड केंअर सेंटर 1, भोकर कोविड केंअर सेंटर 3, लोहा कोविड केंअर सेंटर 22, कंधार कोविड केंअर सेंटर 1, किनवट कोविड केंअर सेंटर 31, उमरी कोविड केंअर सेंटर 8, नायगाव कोविड केंअर सेंटर 7, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 27, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 22, हदगाव कोविड केंअर सेंटर 3, बिलोली कोविड केंअर सेंटर 16, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन, होम आयसोलेशन 78, मुदखेड कोविड केंअर सेंटर 28, मुखेड कोविड केंअर सेंटर 30, खाजगी रुग्णालय 12 असे 297 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 79, लोहा तालुक्यात 6, हदगाव तालुक्यात 3, कंधार तालुक्यात 3, बिलोली तालुक्यात 1, हिंगोली 4, परभणी 2, लातूर 1, नांदेड ग्रामीण 3, अर्धापूर तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 6, हिमायतनगर तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 1, मुदखेड तालुक्यात 1, यवतमाळ 3 असे एकुण 118 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 79,  हदगाव तालुक्यात 4, अर्धापूर तालुक्यात 12, किनवट तालुक्यात 21, बिलोली तालुक्यात 8, मुखेड तालुक्यात 29, धर्माबाद तालुक्यात 9, देगलूर तालुक्यात 1, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 3, मुदखेड तालुक्यात 5, लोहा तालुक्यात 6, कंधार तालुक्यात 2, भोकर तालुक्यात 8, नायगाव तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 22, बीड 1 एकुण 214 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 845 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 280, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 810, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 76, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 44, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 132, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 72, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 157,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 65, लोहा कोविड केअर सेंटर येथे 60, हदगाव कोविड केअर सेंटर 55, भोकर कोविड केअर सेंटर 40, कंधार कोविड केअर सेंटर येथे 44, बारड कोविड केअर सेंटर 23, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 50, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 105, मुदखेड कोविड केअर सेटर 51,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 20, किनवट कोविड केअर सेंटर येथे 198, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 50, उमरी कोविड केअर सेंटर 75, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 21,  खाजगी रुग्णालयात दाखल 332, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड 82, औरंगाबाद 1, निजामाबाद 1 व हैद्राबाद येथे 1 संदर्भित  झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 71 हजार 292,

निगेटिव्ह स्वॅब- 54 हजार 659,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 332,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 13 हजार 316,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-16

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 6,

एकूण मृत्यू संख्या- 350,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 9 हजार 54,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 845,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 288, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 34,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 70.19 टक्के  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

लोकशाहीच्या सर्वागीण विकासासाठी

निवडणूक आयोगाचा नैतीक बाबींवर जोर 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :-भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमदेवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सुधारीत सुचना निर्गमीत केल्या आहेत. यापूर्वी दिनांक 10 ऑक्टोंबर 2018 व 6 मार्च 2020 रोजी निर्देश निर्गमीत केले होते. त्याच्या तपशीलावर सूचनांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. यानुसार आता संबंधित उमदेवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी जर एखादाची गुन्हेगार पार्श्वभूमी असेल तर त्याबाबत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर तपशील द्यावा, असे स्पष्ट केले आहे. 

हा तपशील पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करावा लागेल याची पहिली प्रसिद्धी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या चार दिवसांमध्ये, दुसरी प्रसिद्धी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पाचव्या ते आठव्या दिवसामध्ये तर तिसरी प्रसिद्धी ही नवव्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच मतदान होण्याच्या दोन दिवस आगोदर पर्यंत करावी. 

बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांच्या संदर्भात निवडणूक आयोगाने आणखी स्पष्टता केली आहे. यात जे बिनविरोध विजयी उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांनी सुद्धा इतर उमेदवार व राजकीय पक्षासाठी निश्चित केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबत तपशील प्रसिद्ध करतील. आयोगाने ठरविल्यानुसार भागधारकांमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला आहे. यात आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचना व प्रारुपे यांचे एक संकलन प्रसिद्ध केले जाईल. यासंदर्भातील सर्व सूचना गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आणि त्यांना नामनिर्देशीत करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000


 

हळद व केळी पिकावरील

किड, रोग नियंत्रणाबाबत चर्चासत्र संपन्न

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथे कृषिविभाग व शिवास्था फॉर्मर प्रोडयुसर कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने हळद व केळी पिकावरील किड व रोनियंत्रणाबाबत चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवीशंकर चलवदे, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले व मंडळ कृषि अधिकारी संजय चातरमल आदी उपस्थित होते. 

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामपविर्तन (स्मार्ट) तसेच शेतकरी गट व शेतकरी कंपन्यासाठी शासनाकडून देय असणाऱ्या अनुदान योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देशमुख यांनी हळद व केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत (पिकाचे संपुर्ण जीवनचक्र) तसेच त्यावरील विविध ‍किड व रोगांची ओळख, किड रोगाचे रासायनिक व जैविक नियंत्रण आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी सोयाबिन ग्राम बिजोउत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकाऱ्यांनी शेतकरी गट व फॉर्मर प्रोडयुसर कंपनी व महिला बचतगटाची क्षमता बांधणीबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. या चर्चासत्रास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हळद व केळी पिकावरील किड व रोग नियंत्रण चर्चासत्र यशस्वीरीत्या संपन्न झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

****




 

कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार :

जिल्हास्तरीय समितीची नाळेश्वरच्या शेतीला भेट 

 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराच्या निवडीसाठी जिल्हास्तरीय समितीने नुकतीच कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील शेतकरी सौ. कमलबाई अन्नाराव धोतरे यांच्या शेतीला भेट दिली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिली आहे. 

यावेळी कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे प्रतिनिधी सिध्देश्वर मोकळे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, नांदेड पंचायत समितीचे सभापतीचे प्रतिनिधी बबनराव वाघमारे, माजी कृषि सभापती नरहरी वाघ, अतुल वाघ, कृषि अधिकारी पुंडलिक माने, कृषि पर्यवेक्षक करंजकर, कृषि सहाय्यक सौ. मोरताडे, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शेखर कदम, कृषि अधिकारी चिंचोलकर, वि.अ. कृषि सतिश लकडे, श्रीमती प्रेरणा धांडे, वि.अ.सांखिकी श्री वाघ, कृषि सभापती यांचे स्विय्य सहाय्यक श्री. हाळे उपस्थित होते. 

समितीने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन सौ. कमलबाई अन्नाराव धोतरे यांनी त्यांचे शेतावर फळबागेत मोसंबी, आंबा आदी फळांची लागवड केली आहे. त्यांनी शेततळे उभारुन त्यात मत्स्य उत्पादन घेतले आहे. यावेळी कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कामांविषयी समाधान व्यक्त करुन नाळेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट दिली व जनावरांना वेळीच उपचार करण्यासाठी निर्देश दिले.  

*****

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...