Saturday, September 19, 2020

लोकशाहीच्या सर्वागीण विकासासाठी

निवडणूक आयोगाचा नैतीक बाबींवर जोर 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :-भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमदेवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सुधारीत सुचना निर्गमीत केल्या आहेत. यापूर्वी दिनांक 10 ऑक्टोंबर 2018 व 6 मार्च 2020 रोजी निर्देश निर्गमीत केले होते. त्याच्या तपशीलावर सूचनांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. यानुसार आता संबंधित उमदेवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी जर एखादाची गुन्हेगार पार्श्वभूमी असेल तर त्याबाबत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर तपशील द्यावा, असे स्पष्ट केले आहे. 

हा तपशील पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करावा लागेल याची पहिली प्रसिद्धी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या चार दिवसांमध्ये, दुसरी प्रसिद्धी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पाचव्या ते आठव्या दिवसामध्ये तर तिसरी प्रसिद्धी ही नवव्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच मतदान होण्याच्या दोन दिवस आगोदर पर्यंत करावी. 

बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांच्या संदर्भात निवडणूक आयोगाने आणखी स्पष्टता केली आहे. यात जे बिनविरोध विजयी उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांनी सुद्धा इतर उमेदवार व राजकीय पक्षासाठी निश्चित केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबत तपशील प्रसिद्ध करतील. आयोगाने ठरविल्यानुसार भागधारकांमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला आहे. यात आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचना व प्रारुपे यांचे एक संकलन प्रसिद्ध केले जाईल. यासंदर्भातील सर्व सूचना गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आणि त्यांना नामनिर्देशीत करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...