Thursday, March 17, 2022

 जिल्ह्यात 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 639 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 794 एवढी झाली असून यातील 1 लाख 89 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2 असे एकुण 2 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 5 असे एकुण 13 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 89 हजार 252

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 69  हजार 380

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 794

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 89

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-13

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 3 एप्रिल 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 3 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) ज. मो. अभ्यंकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

गुरुवार 24 मार्च 2022 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 9 वा. नांदेड येथे आगमन (शासकीय विश्रामगृह). दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा. भरती, अनुशेष, प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे तक्रार निवारण कक्ष इत्यादी विषयावर बैठक. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत मा. पंतप्रधानाचा पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत जिल्हा परिषद नांदेड सभागृह येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी किनवट यांच्यासोबत आदिवासी विभागाकडून अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक. सायं 4 ते 5 वाजेपर्यंत मा. अध्यक्ष जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेडकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा तसेच समितीला येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा. सायं. 5 ते 6 वाजेपर्यंत अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातीच्या संघटना व व्यक्तींची निवेदने स्विकारतील, चर्चा व मुक्काम. शुक्रवार 25 मार्च 2022 सकाळी 9 वा. नांदेड येथून परभणीकडे प्रयाण करतील.

0000

 

 विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत

शेतकरी ते थेट ग्राहक विक्री मेळावा व धान्य महोत्सवाचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 17 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने धान्य महोत्सव-2022 च्या अनुषंगाने विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 20, 21 व 22 मार्च 2022 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत आयोजीत केला आहे. या धान्य महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

 

या धान्य महोत्सवात भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त 75 भव्य शेतमाल‍ विक्री केंद्र असणार आहेत. यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गहु, ज्वारी, तांदूळ, तुर, मुग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले, विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने (गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने जसे, मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने (चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी), टरबुज, खरबुज आदी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. जिल्ह्यातील ग्राहकांनी या महोत्सवास भेट देऊन शेतकऱ्यांकडुन शेतमाल खरेदी करावा, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

0000

 गरजेनुसार शेतकऱ्यांनी खतसाठा करावा 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक खत बाजारात खत तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्य असेल तेवढी व गरजेनुसार आवश्यक खते खरेदी करुन ठेवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमणशट्टे यांनी केले आहे.  

भारत सर्वाधिक खतांची आयात करणारा देश असून युध्दजन्य परिस्थीतीचा देशाला फटका बसण्याची शक्यता आहे. तरी सद्यस्थितीत बाजारात उपलब्ध खत साठा असून, येणाऱ्या खरीप हंगामासाठी खतांची खरेदी करुन आवश्यक खत साठा करुन ठेवावा. जेणेकरुन रशिया व युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर ऐन हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही. पिकाच्या गरजेनुसार खताचा वापर करावा. नांदेड जिल्ह्याचे सरासरी सोयाबिन पेरणी क्षेत्र 3 लाख 97 हजार 242 हेक्टर आहे. सिंगल सुपर फॉस्फेट हे कॅल्शियम, स्फुरद, गंधक घटक असणारे व कमी दरात उपलब्ध असणारे खत आहे. तरी शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट सारख्या खताचा सोयाबिन पिकासाठी वापर करुन उत्पादन खर्चात बचत करावी असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

 

 समस्याग्रस्त व पिडीत महिलासांठी

21 मार्च रोजी महिला लोकशाही दिन 

नांदेड, (जिमाका) दि. 17:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 21 मार्च 2022 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 21 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 दारु दुकाने शुक्रवारी बंद 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात येत्या 18  मार्च रोजी धुलिवंदन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शुक्रवार 18 मार्च 2022 रोजी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.   

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी शुक्रवार 18 मार्च रोजी धुलिवंदन निमित्त जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3, सिएलएफएलटीओडी-3  एफएल / बीआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

0000

सुधारीत वृत्त

होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरे करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेतअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

 

होळी / शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि. 17 मार्च, 2022 रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा. तसेच दि. 18 मार्च रोजी धूलिवंदन व 22 मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी सण साधेपणाने साजरे करावेत, अशा गृहविभागातर्फे सूचना आहेत.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...