Wednesday, February 21, 2024

 वृत्त   

कॉपीमुक्त परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 'ड्रोन'चा वापर

 ·     जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संवेदनशील केंद्रांना भेटी 

 

नांदेड, (जिमाका) दि. 21 :- यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार केल्यास कोणतीही गय केली जाणार नाही. तसेच उपद्रवी केंद्राची मान्यता काढण्याची शिफारस मंडळाकडे करण्यात येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 7 फेब्रुवारी 2024 च्या बैठकीत केले होते. त्यानुसार आजच्या पहिल्या दिवशीच्या इंग्रजी विषयीच्या पेपरच्या दिवशी काही निवडक परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले. असा प्रयोग करणारा नांदेड जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

 

यावर्षी दिनांक 7 व 14 फेब्रुवारी 2024 या तारखांना जिल्हाधिकारी यांनी बैठका घेतल्या होत्या व कोणत्याही गैरप्रकारास थारा दिला जाणार नाही याबाबत  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आजच्या पहिल्या दिवशीच्या पेपरला जिल्हयातील नायगाव व मुखेड तालुक्यातील काही निवडक केंद्रावर ड्रोनद्वारे परीक्षा केंद्राचे चित्रीकरण करण्यात आले. यामध्ये उपद्रवी व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांचेविरुध्द फौजदारी कारवाई करण्यासाठी निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्याचा प्रयोग करणारा नांदेड जिल्हा राज्यात पहिला ठरला आहे. यामुळे गैरप्रकार करणा-या व्यक्तींना व त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना चपराक बसणार आहे.

 

जिल्हयात एकुण 101 केंद्रावर बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आलेली असून प्रत्येक बैठे पथकात महसूलपंचायत समिती व शिक्षण विभाग असे एकुण 3 सदस्य आहेत. बैठे पथकाने पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर थांबून परीक्षा सुरळीत चालू राहण्यासाठी कार्यवाही करायची आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार जिल्हा परिषदेतील वर्ग-1 अधिका-यांची 5 विशेष भरारी पथके नियुक्त केली असून त्यांनी संवेदनशील केंद्रांना भेटी देण्यासाठी आदेशित केलेले आहे. तसेच मंडळ कार्यालयाकडून 06 भरारी पथके कार्यान्वित असून यामध्ये प्राचार्य डायटशिक्षणाधिकारी प्राथमिकमाध्यमिक व योजनाउपशिक्षणाधिकारी माध्यमिक व विशेष महिला पथक जिल्हयात कार्यान्वित आहे. अशा प्रकारे जिल्हयात एकुण 51 भरारी पथके कार्यान्वित आहेत.

 

आजच्या इयत्ता 12 वीच्या पेपरच्या दिवशी जिल्हयातील सर्व अधिकारी यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत. यामध्ये स्वत: जिल्हाधिकारी यांनी कंधार व नायगांव तालुका पिंजून काढला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नांदेड शहरातील केंद्रांना भेटी दिल्या. पोलीस अधिक्षक यांनी कंधारनायगांव व बिलोली तालुक्यातील केंद्रांवर भेटी दिल्या. तर मंडळाकडून नियुक्त भरारी पथकांनी मुखेडअर्धापूरहदगांवकिनवटदेगलूरमाहूर या तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारीतहसिलदारगटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. यामध्ये शेकापूर येथे 07गांधीनगर येथे 01 व हिमायतनगर येथील केंद्रावर 01 असे एकुण 09 प्रकरणे गैरप्रकाराची जिल्हयात घडली आहेत. आजच्या एकुण 101 परीक्षा केंद्रावर 42089 परीक्षार्थ्यांपैकी 41118 परीक्षार्थी उपस्थित होते. तर 971 परीक्षार्थी अनुपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 97.69 टक्के एवढी होती.

000000





 



 

 


 वृत्त क्रमांक 159 

लातूर महानगरपालिकेच्या पदभरती

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 21 :- लातूर महानगरपालिकेच्‍या आस्‍थापनेवरील गट-अ ते  गट-ड सरळसेवा पदभरती परीक्षा-2024 च्या नांदेड जिल्ह्यातील 2 परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या  राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड व श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड  शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर  नांदला, दिग्रस, खडकूत या 2 परीक्षा केंद्रात 22 ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

या कालावधीत सदर केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात सकाळी 5 ते रात्री  9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 158 

जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध सभांचे

29 फेब्रुवारी रोजी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि.  21 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समितीची सभा गुरूवार 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायं 5 वा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा जिल्हा उद्योग मित्र समितीचे सदस्य सचिव अमोल इंगळे यांनी केले आहे.  

000000

 वृत्त क्रमांक 157 

बारावी-दहावी परीक्षेसाठी

राज्य मंडळ स्तरावर समुपदेशक नियुक्त

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेसाठी राज्यमंडळ स्तरावर समुपदेशक नियुक्ती करण्यात आले आहे.


परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

 

भ्रमणध्वनी 7387400970, 9011184242, 8421150528, 8263876896, 8369021944, 8828426722, 9881418236, 9359978315, 7387647902, 9011302997 या क्रमांकावर समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी ते रात्री या कालावधीतच विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थीपालक यांनी परीक्षा केंद्रबैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यादींबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये याची नोंद घ्यावीअसे आवाहन राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 19 मार्च 2024 तसेच माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) व सामान्य ज्ञान (जी.के.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 20 ते 23 मार्च 2024 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी ) परीक्षा दि. ते 26 मार्च 2024 या कालावधीत पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरमुंबईकोल्हापूरमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली आहे.

00000

 वृत्त क्रमांक 156 

आज पासून क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबिराची सुरुवात

 

·  जिल्हास्तर क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्याची संधी

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीर सन 2022-23 चे आयोजन दिनांक 22 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुलश्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परीसर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्य. व प्राथमिक)व जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

या प्रशिक्षण शिबीराचा मुख्य हेतू राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धनप्रचारप्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भुमिकेतुन राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आले आहे. या क्रीडा धोरणातील मुद्या क्र. 6 (5) नुसार खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञानप्रशिक्षणाच्या पद्धतीनविन खेळांची शास्त्रोत माहिती वेळोवेळी क्रीडा शिक्षक, शारीरिक शिक्षकांना होणे आवश्यक आहे.

 

त्यासाठी क्रीडा शिक्षकांना क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा शरीर रचना शास्त्र, क्रीडा वैद्यक शास्त्रक्रीडा संघटन व व्यवस्थापनक्रीडा व्यायाम व आहार, व्यायामाचे शरीर क्रिया शास्त्र व आवश्यक विषयांची माहिती होऊन खेळाडूंना खेळाविषयी पोषक वातावरण तयार करुन देण्यात येणार आहे. याकरीता नांदेड जिल्ह्यातील प्रती तालुक्यातील 5 क्रीडा शिक्षक / शारीरिक शिक्षक यांना बोलविण्यात ये आहे. सदर प्रशिक्षण शिबीर हे निवासी असुन यामध्ये भोजन व निवासाची सोय शासनामार्फत करण्यात आली आहे.

00000

 वृत्त क्रमांक 155

 

कॉपीमुक्त परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 'ड्रोन'चा वापर

 ·     जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संवेदनशील केंद्रांना भेटी 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- आजपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाने ड्रोन कॅमेराचा वापर केला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक संवेदनशील केंद्रांना आज भेटी देऊन या अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा केली. 

21 फेब्रुवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये प्रशासनाने 28 संवेदनशील केंद्राची निवड केली आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून कुठेही गैरप्रकार होऊ नये यासाठी आज ड्रोन कॅमेरा वापरण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गैरप्रकार झाल्यास केंद्रप्रमुखांसोबतच इतरांवरही कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. 

आज प्रशासनाने ड्रोन कॅमेराद्वारेच अनेक केंद्रांवर या संदर्भातील काळजी घेतली. जनता हायस्कूल नायगाव, नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल पानभोसी तालुका कंधार या केंद्रावर ड्रोनने परिसराची तपासणी करण्यात आली. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक केंद्रांना आज भेटी दिल्या. संवेदनशील केंद्रांची पहाणी केली. सन 2024 परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने सर्व केंद्रावर करडी नजर ठेवली जात आहे. याबाबत तक्रार निवारण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून नागरिकांनीही या अभियानात हेल्पलाइनवर तक्रार करून प्रशासनाची मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

000000








 

 


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...