Tuesday, May 24, 2022

 1 जून रोजी जिल्ह्यातील 75 ठिकाणी

पीक कर्ज वाटप शिबिराचे आयोजन

 

·    आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या

समन्वयातून राबविला जाणार उपक्रम  

·  400 कोटी पीक कर्ज तर बचतगटांसाठी शंभर कोटी कर्ज वाटपाचा निर्धार  

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने अनेक चांगल्या योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी ग्राम पातळीवर बँकिंग क्षेत्राशी निगडीत आवश्यक ती प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी गाव तेथे बँकींग प्रतिनिधी सहज उपलब्ध झाला पाहिजे. आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील 23 बँकांच्या माध्यमातून येत्या 1 जून रोजी जिल्ह्यात 75 ठिकाणी पीक कर्ज वाटप शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बँकांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाईल. यात पीक कर्जाचे 400 कोटी तर बचतगटांसाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप होईल अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

 

जिल्हास्तरीय बँकिंग समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या बैठक कक्षात संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके, गणेश पठारे व संबंधित बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 400 कोटी रुपयांचे तर स्वयंसहाय्यता बचतगटातील जिल्ह्यातील बचतगटांना 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप 1 जून रोजी शिबिरात करण्याचे नियोजन तथा उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. यादृष्टिने प्रत्येक बँकांनी आपल्याकडे वर्ग असलेल्या लाभार्थी व गावनिहाय यादीनुसार योग्य ती पूर्व तयारी करण्याचे निर्देश त्यांनी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

 

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात काम करणारे 900 च्या जवळपास बँकिंग प्रतिनिधी आहेत. यात प्रत्येक गावातील महिला बचत गटात काम करणाऱ्या पात्र महिलांचा समावेश झाला तर त्याही चांगले काम करून दाखवतील. नॅशनल रूरल लाईव्हली हूड मिशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचतगटांचे हे उद्दीष्ट निर्धारीत केले आहे. यात केंद्र आणि राज्य शासनाचा निधी अंर्तभूत आहे. महिला बचतगटांना स्वयंरोजगारांची संधी त्यांच्या गावातच आता उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

00000     






 शालेय शिक्षणासाठी लागणारे विविध

प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- इयत्‍ता दहावी व बारावीच्‍या परीक्षा नुकत्‍याच संपलेल्‍या आहेत. त्‍यानुसार सर्व जण निकालाची वाट पाहत आहेतनिकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्‍यासाठी विविध दाखल्‍याची गरज असतेतहसिल कार्यालयामार्फत उत्‍पन्‍नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, राष्‍ट्रीयत्‍व प्रमाणपत्र, शेतकरी असल्‍याचे प्रमाणपत्र, भुमिहिन प्रमाणपत्र इत्‍यादी दाखले  वितरित करण्‍यात येत असतात याअनुषंगाने प्रमाणपत्राची आवश्‍यकता असल्‍यास विनाविलंब तात्‍काळ सेतु सुविधा केंद्रामार्फत विहित नमुन्‍यात ऑनलाईन अर्ज दाखल करुन प्रमाणपत्र प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन नांदेड तहसिल कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

 

निकालानंतर पुढील प्रवेशासाठी असणारा मर्यादित कालावधी त्‍याचवेळी तहसिल कार्यालयात विविध दाखल्‍यासाठी प्राप्‍त होणाऱ्या  अर्जांचे प्रमाण मोठया प्रमाणात राहु शकते. त्‍यामुळे सर्व अर्जांची तपासणी करण्‍यास वेळ लागतो तसेच सदर केलेल्‍या अर्जात काही त्रुटी असल्‍यास त्‍याची पुर्तता करण्‍यासाठी आपणास पुरेसा वेळ मिळत नाहीतसेच सर्व सेतु केंद्रामार्फत मोठया प्रमाणात प्रमाणपत्रांची आवक वाढून ऑनलाईन प्रमाणपत्र ज्‍या सर्व्‍हरद्वारे देण्‍यात येतात ते सर्व्‍हर युजर्सच्‍या संख्‍या जास्‍त असल्‍यामुळे हॅंग होणे होणे या अडचणी निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकरता येत नाहीत्‍यामुळे विनाविलंब तात्‍काळ पुढील प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करुन वेळेआधीच प्रमाणपत्र प्राप्‍त करुन घ्‍यावे, असेही आवाहन नांदेड तहसिल कार्यालयाने तालुक्‍यातील सर्व पालक, विद्यार्थी, नागरीक, शिक्षकांना केले आहे.

00000 

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 24:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकतामार्गदर्शन केंद्राच्यावतीने जुन 2022 रोजी सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक  प्रशिक्षण संस्था नांदेड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये वेळेवर उपस्थित राहुन संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास 02462-251674 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा nandedrojgar@gmail.com या कार्यालयातील मेल आयडीवर संपर्क साधावा असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

0000000

 शासकीय कार्यालयासाठी भाड्याने जागा हवी आहे 

नांदेड, (जिमाका) दि. 24:- शासकीय कार्यालयासाठी  नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयींनी युक्त सुसज्ज अशी जागा भाड्याने हवी आहे.

 

कार्यालयासाठी कमीत कमी पंधराशे ते दोन हजार स्क्वेअर फुट जागा अपेक्षित आहे. तसेच कार्यालयातील चार चाकी वाहनासाठी पार्किग असणे आवश्यक आहे. उपयुक्त जागा असल्यास संबंधितांनी 8830131197,  8888988093 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

000000

 आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार लाभधारकांशी संवाद

▪️31 मे रोजी राष्ट्रीय संवादाचे आयोजन
▪️नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे पूर्व तयारी
नांदेड, (जिमाका) दि. 24:- विविध विकास योजनांच्या माध्यमातून शासनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेऊन विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेत प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, आणि अमृत, स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा योजनांचा समावेश आहे. दुर्गम भागातील लाभार्थ्यांपासून महानगरापर्यंतच्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या योजनांच्या लाभार्थ्यांशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 31 मे रोजी प्रत्येक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा बैठक घेऊन सर्व संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
या आढावा बैठकीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हाती घेतलेल्या अमृत सरवर योजना व इतर योजनांचाही आढावा घेण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना विविध लोकोपयोगी व पर्यावरण संतुलनाशी निगडीत असलेल्या योजनांमध्ये लोकांचाही सहभाग अपेक्षित आहे. हा लोकसहभाग घेण्यासमवेत सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यातील विविध उद्योगांची यात सहकार्य घेता येईल. शासकीय अधिकाऱ्यांनी केवळ याला नोकरीचा भाग न समजता आपलीही व्यक्तीगत बांधिलकी या नात्याने पुढे सरसावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
000000



  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...