Wednesday, November 10, 2021

ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

 

ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर या

अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

नांदेड (जिमाका) दि. 10 :- प्रमोद महाजन कौशल्य  उद्योजकता विकास योजनेंतर्गत पीएसए प्लांट ऑपरेटर या अभ्यासक्रमासाठी, प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. संकल्प प्रकल्पातंर्गत हे प्रशिक्षण मोफत,  निशुल्क देण्यात येणार आहे. उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनातर्फे प्रमाणपत्र देखील देण्यात येईल. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी कार्यालयाच्या क्र.02462-251674 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी व युवा युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार  उदयोजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत केले आहे.

या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता याप्रमाणे आहे.  एनटीसी (आयटीआय)/एनएसी फिटर /वेल्डर/एमएमटीएम/आरएसी/इलेक्ट्रीशियन/मेकॅनिक इन्स्ट्रमेंट, एओसीपी, एमएमसीपी,आयएमसीपी ट्रेड इत्यादी उत्तीर्ण  असावेत असेही प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

बीज प्रक्रीयेसाठी जैविक जिवाणू खतांचा शेतकऱ्यांनी वापर करावा

 

बीज  प्रक्रीयेसाठी जैविक जिवाणू खतांचा शेतकऱ्यांनी वापर करावा

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जैविक जिवाणू संघ रायझोबीयम हरभरा ॲझ्याटोबॅक्टर रब्बी ज्वारी, गहु, मक्का, करडई आदी जैविक जिवाणू खते जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा धनेगाव नांदेड येथे रोखीने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी बिज प्रक्रीयेसाठी जिवाणू संवर्धन खताचा वापर करावा, असे आवाहन जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा धनेगावचे तंत्र अधिकारी एस. एस. स्वामी  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

जैविक जिवाणु खते सेंद्रीय  सजीव असून त्यामध्ये कोणताही अपायकारक टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नाही. हवेतील नत्र, स्पुरद, पलाश शोषून  साठवून नंतर पिकाला उपलब्ध करुन देणाऱ्या जिवाणुंची प्रयोग शाळेत वाढ करुन त्यापासुन तयार केलेल्या खताला जैविक जिवाणु खते म्हणतात. यामध्ये एक दल  तृण धान्य उदा. रब्बी ज्वारी, करडई, गहू, उस या रब्बी हंगामातील पिकास उपयोगी असलेले जिवाणू खत तसेच शेंग वर्गीय  व्दीदल पीकांसाठी उपयोगी असलेले रायझोबीयम हे हरभरा पिकासाठी वापरता येते. ॲझ्याटोबॅक्टर  रायझोबीयम या दोन खतापासून वातावणातील नत्र स्थिर करून पिकाना उपलब्ध होते. रासायनिक खतांच्या मात्रा कमी होवून खर्च कमी होवू शकतो. सर्व पिकांना उपयुक्त  आवश्यक असलेले स्फुरद  पलाश हे पीएसबी  केएमबी या जिवाणुव्दारे पिकाना उपलब्ध होते.

बिज प्रक्रीयासाठी 10 किलो बियाणे स्वच्छ फरशीवर प्लॉस्टीक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरुन त्यावर 100 मिली जैविक जिवाणू खतांचे मिश्रण असलेले द्रावण शिंपडुन हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रीया केलेले बियाणे सावलीत वाळवावे. वाळवलेले बियाणे त्वरीत पेरावेत.

जैविक जिवाणु खत वापरण्यापुर्वी जर बियाण्यांस  किटकनाशके बुरशीनाशके, जंतूनाशके  इ. लावलेले असतील तर जिवाणू संवर्धन नेहमीपेक्षा ज्यास्त प्रमाणात दिडपट लावणे चांगले राहील. कोणत्याही रासायनीक खतांबरोबर जिवाणू संवर्धन मिसळु नये. प्रत्येक पिकासाठी वेगवगळे जिवाणू संवर्धन असते. जिवाणू खते वापरल्यास पिक उत्पादनात 7 ते 10 टक्के वाढ आढळुन आली आहे. तसेच योग्य वापराने जमिनीची सुपीकता  उत्पादकता वाढते. जिवाणू खतांचा जमीनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तसेच नंतरच्या पीकात त्याचा फायदा होतो. जिवाणू खते वापरण्यास अत्यंत सोपे  कमी  खर्चाचे आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...