Tuesday, January 4, 2022

मुख्यालय वृत्त


राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

        मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2022 असा आहे.

                        उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.inआणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेचराज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

            राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे : -

 

पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचेनाव

पारितोषिक

1

बाळशास्त्रीजांभेकरपुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

2

अनंतगोपाळशेवडेपुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

3

बाबूरावविष्णूपराडकरपुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

4

मौलानाअबुलकलामआझादपुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

5

यशवंतरावचव्हाणपुरस्कार

शासकीयगट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

6

पु.ल.देशपांडेउत्कृष्टदूरचित्रवाणीवृत्तकथापुरस्कार(राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

7

तोलारामकुकरेजाउत्कृष्टवृत्तपत्रछायाचित्रकारपुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

8

केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कारशासकीयगट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

9

समाज माध्यम पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

10

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

11

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)


विभागीय पुरस्कार

 

12

दादासाहेबपोतनीसपुरस्कार,

नाशिकविभाग

 

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र,

याव्यतिरिक्तरुपये 10 हजारदै.गावकरीनेपुरस्कृतकेलेआहेत.)

13

अनंतरावभालेरावपुरस्कार,

औरंगाबादआणि लातूर विभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

14

आचार्यअत्रेपुरस्कार,

मुंबईविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

15

 

नानासाहेबपरूळेकरपुरस्कार,

पुणेविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

16

शि.म.परांजपेपुरस्कार,

कोकणविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

17

ग.गो.जाधवपुरस्कार,

कोल्हापूरविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

18

लोकनायकबापूजीअणेपुरस्कार,

अमरावतीविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

19

ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार,

नागपूरविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

 

या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे :-

 

नियम व अटी

राज्य / विभागीय पुरस्कार

 

        पुरस्कारांसाठी पत्रकारांचीमागील पाच वर्षाचीकामगिरी, त्यांचीसामाजिकबांधिलकी, शासनाच्याविकासविषयकप्रसिद्धीसाठी, जनतेमधीलविकासविषयकजाणिवांच्याजागृतीसाठीत्यांनीकेलेलेप्रयत्नआणिपुरस्कारदेण्यातयेणाऱ्यावर्षातीलत्यांचीकामगिरीयाचाविचारकेलाजाईल. मराठी, इंग्रजी, हिंदीआणिउर्दूभाषेतीलराज्य/विभागीयपुरस्कारांसाठी पत्रकारांचीनिवडयाचपद्धतीनेकेलीजाईल. यास्पर्धेतफक्तमराठीभाषेसाठीवराज्यवविभागीयस्तरआहेत. इंग्रजी, हिंदी,उर्दूयाभाषेतीलपुरस्कारतसेच समाज माध्यम पुरस्कारआणिस्वच्छमहाराष्ट्रजनजागृतीपुरस्कारहेकेवळराज्यस्तरीयआहेत.पुरस्कारासाठीनिवडझाल्यासपुरस्कारस्वीकारण्याचीतयारीअसल्याचेसंबंधितपत्रकाराचेसंमतीपत्रप्रवेशिकेसोबतजोडणेआवश्यकआहे.

            उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठीपाठवावयाच्याप्रवेशिकेसोबतमूळ लेखनाचेकात्रणत्याच्यादोनप्रतीसहपाठवावे. मूळ लेखनाच्यावृत्तपत्रीयकात्रणांसोबतत्याच्यादोन प्रतीनसल्यासप्रवेशिकारद्दहोईल. मूळ लेखनावरलेखकाचेनावनसल्यासज्यानियतकालिकातहालेखप्रसिद्धझालाअसेलत्यानियतकालिकाच्यासंपादकांचादाखलाजोडलेल्याप्रवेशिकांचाचविचारकेलाजाईल.

पत्रकारांच्यातसेचवृत्तपत्रछायाचित्रकारांच्यागटातभागघेणाऱ्यास्पर्धकांनीशासनअथवाशासकीयमहामंडळाच्यासेवेतनसल्याचेप्रतिज्ञापत्रप्रवेशिकेसोबतजोडणेआवश्यकआहे.

            अर्जदारानेराज्यवविभागीयपातळीवरीलप्रवेशिकानागपूरआणिऔरंगाबादयेथीलसंचालक(माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकणविभागयेथीलविभागीयउपसंचालक(माहिती) किंवाजिल्हामाहितीअधिकारीयांच्याकडेथेटपाठवाव्यात. प्रवेशिकेसोबतजिल्हामाहितीअधिकारीकिंवापत्रकारसंघटनांच्याशिफारसपत्राचीआवश्यकतानाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दूयाचारहीभाषेतीलराज्यस्तरीयपुरस्कारांसाठीतसेचराज्यपातळीवरीलशासकीयगटवविभागीयपातळीवरीलमराठीभाषेतीलपुरस्कारपात्रविजेत्यांचीनिवडकरण्यासाठीमाहितीवजनंसपर्कमहासंचालनालयातर्फेपरीक्षकांचीसमितीनियुक्तकरण्यातयेईल. समितीचीरचना,स्पर्धावस्पर्धेतीलपुरस्कारासंबंधीशासनाचेनिर्णयअंतिमराहतील.

            ज्यानियतकालिकांचाखपवजनमानसावरीलप्रभावचांगलाआहे,अशाचनियतकालिकांतीलमजकूरस्पर्धेच्या प्रवेशिकेसाठीपात्रठरेल.

            जेपत्रकारबृहन्मुंबई, नवीमुंबई(कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणेआणिऔरंगाबादयाविभागातवास्तव्यकरीतअसतील,त्यांनात्याविभागासाठीअसलेल्याविभागीयस्पर्धेतचभागघेतायेईल.मात्रत्यांचेलेखणअन्यकोणत्याहीविभागातीलवृत्तपत्रातप्रसिद्धझालेअसेलतरीतेग्राह्यमानण्यातयेतील.

            गोवावबेळगावयेथीलपत्रकारांनाकोल्हापूरविभागीयस्पर्धेत (सिंधुदुर्गआणिसांगलीजिल्ह्यांसह) सहभागघेतायेईल. दिल्लीयेथीलपत्रकारांनी आपल्याप्रवेशिकाथेटकिंवामहाराष्ट्रपरिचयकेंद्रामार्फतमुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय मुंबई-32 येथे पाठवाव्यात.

            शासकीयगटातीलस्पर्धेसाठीएकचप्रवेशिकापाठविण्याचीमुभाराहील. प्रवेशिकासंबंधीविभागाच्यासंचालककिंवाउपसंचालकांनावबृहन्मुंबईच्याप्रवेशिकामाहितीवजनसंपर्कमहासंचालनालयातवेगवेगळ्यापाठवाव्यालागतील.

            2021यावर्षातदैनिकवृत्तपत्रात, नियतकालिकातप्रसिद्धझालेल्यालेखांचीकात्रणेप्रवेशिकेसोबतजोडणेआवश्यकआहे.

            प्रवेशिकाराज्यस्तर किंवाविभागीयस्तरासाठीआहे.तसेच,कोणत्याभाषेकरिताआहेयाबाबतचास्पष्टउल्लेखअसावा. स्पर्धेसाठीपाठविलेलीप्रवेशिका,त्यासोबतजोडलेलीलेखांचीकात्रणे निटनेटकीअसणेअत्यावश्यकआहे. अस्ताव्यस्त, खाडाखोडअसणारीकिंवावाचतायेणारनाहीत, अशीप्रवेशिकारद्दकरण्यातयेईल.एकाचपत्रकारालासलगदोनवर्षपुरस्कारप्राप्त झाला असल्यासतिसऱ्यावर्षीत्याचीप्रवेशिकाविचारातघेतलीजाणारनाही.

            प्रत्येकगट वभाषेसाठीसंबंधितपत्रकारांनीएकचप्रवेशिकापाठवावी. एकापेक्षाजास्तप्रवेशिकापाठविल्यासत्याचाविचारकेलाजाणारनाही.

विकास योजना संदर्भातील

समाज माध्यम(सोशल मीडिया) पुरस्कार

            हीस्पर्धावृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळेवब्लॉग या समाज माध्यमात प्रसारितमराठीभाषेतीलवृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठीआहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात.  विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

            केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियानप्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.

स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखण केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिद्धी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा

        इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीचीमाहितीतसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्रजोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

            प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), यांच्या नावाने मुंबई येथील मुख्यालयातील पत्त्यावर पाठवावे.

                                छायाचित्रकार पुरस्कार

तोलारामकुकरेजाउत्कृष्टवृत्तपत्रछायाचित्रकारपुरस्कारस्पर्धा, हीमराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दूभाषेतीलवृत्तपत्रातीलपूर्णवेळछायाचित्रकारांसाठीआहे. यातसामाजिकसंदेशदेणारीछायाचित्रे, समाजातीलप्रश्नमांडणारीछायाचित्रे, शासकीययोजनांचाप्रचारआणिप्रसारासाठीपुरकठरतीलअशीछायाचित्रेयांच्यासहप्रवेशिकासादरकरतायेईल.

            महाराष्ट्रशासनाच्याविविधलोकोपयोगीयोजनांवरीलछायाचित्रग्राह्य धरण्यात येईल. मात्रहेछायाचित्रमूळस्वरुपातीलअसावे. फोटोप्रतनसावी. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील. 

केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कार, शासकीयगट (मावज)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार

विविधविकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल.

या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे.

            प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.

            इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.

0000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...