Wednesday, October 7, 2020

 

हॉटेल, फुट कोर्टस, रेस्टॉरन्टस्, बारमधील

कामागारांच्या कोरोना तपासणीसाठी फिरते पथक  

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 7  :- हॉटेल, फुड कोर्टस, रेस्टॉरन्टस् आणि बारमधील कामगारांची फिरत्या पथकामार्फत तपासणी करण्याचे  निर्देश  जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर  यांनी  दिले आहेत. एखादा  कामगार  कोरोना बाधित असेल तर  त्याच्यापासून  ग्राहकांना कोरोना विषाणुची लागण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्देश सर्व संबंधित विभागप्रमुखांना त्यांनी दिले. 

 

पर्यटन विभागाने केलेल्या मार्गदर्शक प्रणालीचे तंतोतंत पालन करुन 50 टक्के क्षमतेने  हॉटेल्स, फुड कोर्टस, रेस्टॉरन्टस् आणि बार सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतू त्याठिकाणी प्रवेश देतांना ग्राहकाचे तापमान व थर्मल स्क्रिनिंग करुनच लक्षणे नसलेल्या ग्राहकांना प्रवेश द्यावा हे बंधनकारक करण्यात आले आहे. कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाकारुन अशा बाधितांची  तपशिलासह स्वतंत्र नोंदणी करुन असे तपशील आरोग्य विभाग व प्रशासनास उपलब्ध करुन देण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

00000

 

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश 9 ऑक्टोंबर पासून लागू 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- नांदेड जिल्ह्यात 9 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 23 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 9 ऑक्टोंबर 2020 चे 06.00 वाजेपासून ते दिनांक 23 ऑक्टोंबर 2020 चे मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

 

लॉकडाऊनच्या कालावधीत

दुकाने, आस्थापनांना वेळेची मुभा 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- नांदेड जिल्‍हयात सर्व प्रकारचे दुकाने, आस्‍थापना उघडणे व बंद करण्याच्या वेळेच्या बंधनात मुभा देण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार नांदेड जिल्हयात दि. 1 ऑक्टोंबर 2020 रोजीचे 00.00 वाजेपासून ते दिनांक 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत 24.00 वा. पर्यंत पुढीलप्रमाणे सुधारित आदेश दिले आहेत. 

राज्यात कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत शासनाने आदेश निर्गमीत केले असून लॉकडाऊनचा कालावधी 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या आदेशातील परिशिष्‍ट -1 नुसार  कोविड- 19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पुढील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झाल्यास दंडात्मक, फौजदारी कारवाईस पात्र राहील. सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर      व नाकावर मास्कचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर 1 हजार रुपयाचा दंड आकारावा. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत आली आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.  नांदेड जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. परंतू प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/ हॉल  सभागृह, घर  व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत लग्न संबंधित समारंभाचे आयोजन तसेच या कार्यालयाने वेळोवेळी दिलेले आदेश व अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन उपस्थित राहण्यास  परवानगी राहील. नांदेड जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास 1 हजार रुपये दंड आकारावा.  सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा /तंबाखु इत्यादी सेवन करणेस मनाई करण्यात आली आहे. 

कामाच्या ठिकाणी पुढील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे. कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्कॅन, हॅडवॉश, सॅनिटायझर याची आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व  वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे. औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

 

परिशिष्‍ट- 2 नुसार कन्टेमेंट प्रतिबंधीत क्षेत्र हे दिनांक 19 मे 2020 व 21 मे 2020 रोजीच्‍या आदेशानुसार जिल्‍हयामध्‍ये तयार करण्‍यात येत असलेले कन्‍टेमेंट झोन हे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. केंद्र शासनाने  व राज्‍यशासनाने पुर्वी दिलेल्‍या सूचना जशास तसे लागू  राहतील. 

नांदेड जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करण्यात आली आहेत (प्रतिबंधीत / बंद क्षेत्रे) सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्टीटयुट हे 31 ऑक्टोंबर  2020 पर्यंत बंद राहतील. परंतू ऑनलाईन / दुरस्‍थ शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृह, जलतरण तलाव, करमणूक उदयाने, थिएटर, असेंबली हॉल  यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. MHA ने परवानगी दिलेल्‍या व्‍यतीरिक्‍त आंतरराष्‍ट्रीय वाहतुक. सर्व सामाजिक, राजकिय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. मनाई केलेल्‍या बाबी व्‍यतिरिक्‍त ज्‍या दुकाने, आस्‍थापनांना चालू ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली आहे. अशा सर्व  दुकाने व आस्‍थापनांना, त्‍याचप्रमाणे हॉटेल, फुड कोर्टस्, रेस्‍टॉरन्‍टस् आणि बार त्‍यांच्‍याशी निगडीत दुकाने आस्‍थापनाचे अनुज्ञप्‍ती, परवाण्‍यामध्ये दिलेले वेळेनुसार उघडणे, बंद करणे व कार्यरत ठेवता येतील. (जसे महाराष्‍ट्र दुकाने व आस्‍थापना अधिनियम व  इतर अनुषंगिक तरतुदीनुसार प्राप्‍त परवाना, अनुज्ञप्‍तीधारकाच्‍या परवाण्‍यात दिलेल्‍या वेळा) तसेच कोव्‍हीड -19 चा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या अनुषंगाने शासनाने व या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले उपाययोजनेचे सर्व सबंधित दुकाने, आस्‍थापनाधारकास काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक व बंधनकारक राहील.

 

यापुर्वी शासनाने तसेच वेळोवेळी परवानगी दिलेल्‍या बाबी / क्षेत्रे पूर्ववत सुरु राहतील आणि यापुर्वी दिलेले आदेश सदर आदेशास सलग्‍न राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत कायम  राहतील. हॉटेल्‍स, फुड कोर्टस, रेस्‍टॉरन्‍टस् आणि बार दिनांक  5 ऑक्‍टोबर 2020 पासून आस्थापनेच्‍या क्षमतेच्‍या  50 टक्‍के क्षमतेसह सुरू राहतील. ऑक्‍सीजन उत्‍पादन व वाहतुक करणा-या वाहनांच्‍या हालचालीस राज्‍यात व राज्‍याबाहेर कोणत्‍याही  प्रकारचे बंधन असणार नाही. यापुर्वी परवानगी देण्‍यात आलेल्या क्रिया/ बाबी नेमूण दिलेल्‍या आदर्श कार्यप्रणाली सूचनेप्रमाणे (SOP)  चालू  राहतील. जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये मास्‍कचा वापर      करणे, सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे. 

परिशिष्‍ट-3 नुसार मा.संचालक पर्यटन विभाग, महाराष्‍ट्र शासन मुंबई यांनी हॉटेल्‍स, फुड कोर्टस, रेस्‍टॉरन्‍टस् आणि बारसाठी निर्गमित केलेली मार्गदर्शक प्रणालीचे तंतोतंत पालन करणे आवश्‍यक आहे. सदरील (SOP) यासोबत जोडून देण्‍यात येत आहे. या आदेशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्‍यक कायदेशीर व दंडात्‍मक कारवाई करण्‍यास खालील यंत्रणेस प्राधिकृत करण्‍यात आले आहे.  महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका, पोलीस विभाग, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क व अन्‍न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. नगरपालिका हद्दीत नगरपालिका, पोलीस विभाग, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क व अन्‍न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. गावपातळीवर ग्रामपंचायत,पोलीस विभाग, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क व अन्‍न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. 

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 30/09/2020 मधील Annexure III मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी. हा सुधारित आदेश दि. 7 ऑक्टोंबर 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केला आहे.

000000

 

 263 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

209 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 7 :- बुधवार 7 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 263 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 209 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 141 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 277 अहवालापैकी  1 हजार 28 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 16 हजार 841 एवढी झाली असून यातील  13  हजार 476 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 818 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 46 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात सात जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यात शनिवार 3 ऑक्टोंबर रोजी माहूर तालुक्यातील वाई बा. येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा तर मंगळवार 6 ऑक्टोंबर अशोकनगर नांदेड येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय नांदेड येथे, शारदानगर देगलूर येथील 62 वर्षाच्या एका पुरुषाचा देगलूर कोविड रुग्णालयात, गजानन महाराज परिसर नांदेड येथील 62 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, श्रीनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे, बुधवार 7 ऑक्टोंबर रोजी अर्धापूर येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर हदगाव तालुक्यातील वडगाव येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा हदगाव कोविड रुग्णालयात येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 446 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 12, बिलोली कोविड केंअर सेंटर 4, लोहा कोविड केंअर सेंटर 6, हदगाव कोविड केंअर सेंटर 6, माहूर कोविड केंअर सेंटर 1, मुखेड कोविड केंअर सेंटर 7, निजामाबाद येथे संदर्भीत 1, औरंगाबाद येथे संदर्भीत 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 13,  एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 161, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 6, किनवट कोविड केंअर सेंटर 13, नायगाव कोविड केंअर सेंटर 8, खाजगी रुग्णालय 21, लातूर येथे संदर्भीत 2 असे 263 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 82.70 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 47, भोकर तालुक्यात 1, लोहा 3, हदगाव 1, धर्माबाद 2, कंधार 2, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 2, हिमायतनगर 1, किनवट 3, देगलूर 1, नायगाव 3, परभणी 1 असे एकुण 68 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 64, लोहा तालुक्यात 8, हदगाव 1, माहूर 1, उमरी 7, अर्धापूर 5, मुखेड 20, नायगाव 4, नांदेड ग्रामीण 4, किनवट 12, धर्माबाद 1, कंधार 6, बिलोली 3, मुंबई 2, हिंगोली 3 असे एकूण 141 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 818 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 203, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 795 , जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 59, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड नवी इमारत येथे 37, आयुर्वेदिक शासकीय महा.कोविड रुग्णालय सेंटर 13, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 54, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 28, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 88,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 18, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, हदगाव कोविड केअर सेंटर 28, भोकर कोविड केअर सेंटर 24,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 22, बारड कोविड केअर सेंटर 1, मुदखेड कोविड केअर सेटर 14, माहूर कोविड केअर सेंटर 13, किनवट कोविड केअर सेंटर येथे 27, धर्माबाद कोविड केअर सेंटर 38, उमरी कोविड केअर सेंटर 59, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 46, खाजगी रुग्णालयात दाखल 223, लातूर येथे संदर्भित 3, निजामाबाद येथे संदर्भित 4, आदिलाबाद येथे संदर्भित 2 झाले आहेत. 

बुधवार 7 ऑक्टोंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 58, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 46 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 89 हजार 11,

निगेटिव्ह स्वॅब- 68 हजार 797,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 16 हजार 841,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 13 हजार 476,

एकूण मृत्यू संख्या- 446,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 82.70

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 18,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 773, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 818,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 46.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

0000

 

"गाव तेथे स्मशानभूमी व दफनभूमी" साकारण्यासाठी

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश          

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यातील असंख्य गावात आजही अंत्यविधीसाठी स्वतंत्र अशा जागा नसल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकवेळा वंशपरंपरागत पद्धतीने ज्या जागेवर दहन किंवा दफन विधी केला जातो ती जागा बऱ्याच गावांमध्ये खाजगी मालकीची असल्याने वादविवाद होतात. यात तक्रारी होत असल्याने बऱ्याचवेळा हा प्रश्न जटिल होतो. नांदेड जिल्ह्यातील या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी निर्माण करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेला निर्देश दिले.   

गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी ही संकल्पना साकारण्यासाठी शासन पातळीवर उपलब्ध असलेल्या योजनांचा सुयोग्य मेळ साधत लोकसहभागातून याचे नियोजन केले जाईल. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान ही योजना, लोकप्रतिनिधींच्या निधीतील काही वाटा यात अंतरभूत करण्यात येईल. प्रत्येक गावाच्या स्मशानभूमीची दुरावस्था होऊ नये, याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व पर्यावरणपूरक रहावा यासाठी लोकसहभाग हा अत्यावश्यक करण्यात येईल. 

प्रशासकिय पातळीवरील याबाबतचे प्रस्ताव तात्काळ मंजूर व्हावेत यासाठी ग्रामपंचायत पातळीपासून पंचायत समिती, महसूल विभाग, भूमि अभिलेख विभाग यांचा सुवर्णमध्य साधत प्रत्येक पातळीवर करावयाच्या प्रशासकिय कामांसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिल्यानुसार निश्चित कालबद्ध कार्यक्रम जिल्हा प्रशासनातर्फे ठरविण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले. 

ग्रामपंचायतीच्या नावे काही लोकवाटा देण्यात आला असून हा लोकवाटा भरण्यास ज्या ग्रामपंचायती तयार आहेत त्यांचाच प्राधान्याने यासाठी विचार केला जाईल. हा लोकवाटा ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करुन भरल्यास सदर योजनेस अधिक पूर्णत्व येण्याबरोबरच प्रत्येक गावकऱ्यांनाही ही योजना आपली वाटेल या तत्वावर भर देण्यात आला आहे. काही गावात लोकवाटा रक्कम होण्यात फारच अडचण निर्माण होत असेल तर यासाठी ग्रामपंचायतींचा ग्रामनिधी व मा. खासदार, आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून ही तजविज करता येऊ शकेल. 

याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर रुपरेषा ठरविली जात असून लोकसहभागाला अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी स्पष्ट केले.

00000

 

 राज्यसेवा पुर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 7 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पुर्व) परीक्षा-2020 परीक्षा रविवार 11 ऑक्टोंबर 2020 रोजी नांदेड शहरातील 34 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड शहरातील विविध 34 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 10 ते सायं 5 या कालावधीत परीक्षा दोन सत्रात होणार असून त्यासाठी 9 हजार 816 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात रविवार 11 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...