Thursday, May 6, 2021

 

                              1 हजार 273 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 661 व्यक्ती कोरोना बाधित

 17 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 674 अहवालापैकी 661 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 555  तर अँटिजेन तपासणीद्वारे 106 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 83  हजार 559 एवढी झाली असून यातील 74 हजार  838  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  6  हजार  772  रुग्ण उपचार घेत असून 198 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 4 ते 6 मे या तीन दिवसांच्या कालावधीत 17  रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 668 एवढी झाली आहे. दिनांक 4 मे रोजी व्हिजन कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  येथे मुखेड येथील 64 वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील 45 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 42 वर्षाचा पुरुष, अर्धापूर येथील 57 वर्षाचा पुरुष, उमरी येथील 46 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे मुखेड  येथील 75 वर्षाचा पुरुष, नायगाव तालुक्यातील कोपरा येथील 50 वर्षाची महिला, नायगाव तालुक्यातील 75 वर्षाचा पुरुष, मुखेड तालुक्यातील बाऱ्ळाळी येथील 52 वर्षाची महिला, कंधार तालुक्यातील बारुळ येथेल 55 वर्षाचा पुरुष, हिंगोली गेट नांदेड येथील 85 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुग्णालय येथे मुखेड तालुक्यातील राजुरा येथील 65 वर्षाची महिला, भगवती कोविड रुग्णालय येथे श्रीनगर नांदेड येथील 59 वर्षाचा पुरुष, फोनिक्स कोविड रुग्णालय येथे डोंगरगाव नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील सिडको नांदेड येथील 63 वर्षाचा पुरुष, श्रीगणेशा कोविड रुग्णालय येथे गवळभ्पुरा नांदेड येथील 80 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.56 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 177, बिलोली 15, हिमायतनगर 11, मुदखेड 12, हिंगोली 17, लातूर 2, नांदेड ग्रामीण 13, देगलूर 46, कंधार 30, मुखेड 25, परभणी 3, अर्धापूर 14, धर्माबाद 36, किनवट 52, नायगाव 24, यवतमाळ 2, भोकर 3, हदगाव 40, लोहा 25, उमरी 5, बिदर 3,असे एकूण 555 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 22, देगलूर 26, किनवट 9, माहूर 5, नांदेड ग्रामीण 2, हदगाव 4, लोहा 6, हिंगोली 4, अर्धापूर 3, हिमायतनगर 1, मुखेड 13, यवतमाळ 3, भोकर 1, कंधार 2, नायगाव 4, चंद्रपुर 1, व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 106 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 273 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 15, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 809, धमार्बाद तालुक्यातंर्गत 12, देगलूर कोविड रुग्णालय 5, अर्धापूर तालुक्यातंर्गत 30, उमरी तालुक्यातंर्गत 32, माहूर तालुक्यातर्गंत 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 13, मुखेड कोविड रुग्णालय 19, मुदखेड कोविड केअर सेंटर 12, किनवट कोविड रुग्णालय 46, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 5, बिलोली तालुक्यातंर्गत 61, खाजगी रुग्णालय 115, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 8, नायगाव तालुक्यातर्गत 2, कंधार तालुक्यातर्गत 6, भोकर तालुक्यातर्गंत 44, लोहा तालुक्यातर्गंत 22, बारड कोविड केअर सेटर 2 असे एकूण 1 हजार 273 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 6 हजार 772 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 82, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 140, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 33, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 63, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 68, देगलूर कोविड रुग्णालय 19, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 15, बिलोली कोविड केअर सेंटर 61, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 9, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 33, माहूर कोविड केअर सेंटर 30, भोकर कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 32, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 37, कंधार कोविड केअर सेंटर 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर 31 , मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 17, बारड कोविड केअर सेंटर 31, मांडवी कोविड केअर सेंटर 6, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 9, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 21, एनआरआय कोविड केअर सेंटर 58, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 2 हजार 111, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 187, खाजगी रुग्णालय 1 हजार 513 असे एकूण 6 हजार 772 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 35, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 30, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 58 भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 25  खाटा उपलब्ध आहेत.

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 76 हजार 433

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 82 हजार 965

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 83 हजार 559

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 74  हजार 838

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 668

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.56 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-16

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-27

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-400

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 6 हजार 772

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-198

00000

 

 

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह

                                         पाऊस व गारपीट होण्याची शक्यता

             नागरिकांनी सावधगिरी बाळगावी 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 6 मे 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार 6 मे  ते 10 मे 2021 या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

 

शेतीसंबंधी सेवा व कृषी सेवा केंद्र

सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत सुरु

-जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  जिल्हयात कोविड-19 ब्रेक द चेन निर्बंध कालावधीमध्ये शेती विषयक सेवांशी निगडीत असलेले कृषि सेवा केंद्र जसे बियाणे, खते, किटकनाशके, कृषि साहित्य विक्री दुकाने यांच्याशी निगडीत विक्री साठवणूक व वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे .

 

राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत शेती संबंधित येणाऱ्या काळातील पेरणी व शेती व्यवस्थापनाअंतर्गत करावयाच्या अत्यावश्यक कामामध्ये शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये यादृष्टीने विचार करण्यात आला. त्यानुसार कोविड-19 ब्रेक द चेन निर्बंध कालावधीमध्ये शेती संबंधी कार्य, उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषिक्षेत्राचे अखंडीत सातत्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला.  

 

या सेवा सुरु ठेवतांना कोविड-19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वाचे तंतोतंत पालन करणे सर्व संबंधीतांना बंधनकारक राहील. या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपली व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.

0000

 

कोविड आजार व लसीकरणासाठी

आरोग्य साक्षरता महत्वाची

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- नांदेड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट हळुवारपणे कमी-कमी होत चालली आहे. मात्र भविष्यातील कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. यासाठी कोविड आजारासह लसीकरण साक्षरता महत्वाची असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. नागरिकांमध्ये आरोग्य साक्षरतेसाठी आरोग्य विभागातर्फे हाती घेण्यात आलेल्या प्रसिद्धी मोहिमेच्या कोविड-19 लसीकरण जनजागृती एलईडी मोबाईल डिजीटल व्हॅनला त्यांनी हिरवी झेंडी दाखवून आज रवाना केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिह परदेशी, जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय व शहरी आरोग्य अभियानच्या माध्यमातून  नांदेड शहर, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय अंतर्गत जिल्ह्यातील वेगवेगळया तालुक्यांच्या ठिकाणी कोरोना लसीकरण विषयक जनजागृती विषयक माहिती  चित्ररथाव्दारे दिली दिली जाणार आहे.   

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले लोकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. लसीकरणाचे होणारे फायदे म्हणजे भविष्यात कोरोना झाला तरी त्याचा आरोग्यावर परिणाम  होत नाही. त्यामुळे आपण सामान्यपणे हा आजार थोपवू शकतो इतकी क्षमता शासनाने निर्माण केलेल्या लसीमध्ये आहे.  शासनाने निर्देशीत केलेल्या नियमानुसार नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी  डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी लसीकरण करणे यावर आरोग्य प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी लोकांमध्ये लसीकरणाचे महत्च याबाबत जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी लसीकरणाचा प्रसार केला जाणार असल्याचे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

00000




  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...