Thursday, May 6, 2021

 

शेतीसंबंधी सेवा व कृषी सेवा केंद्र

सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत सुरु

-जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  जिल्हयात कोविड-19 ब्रेक द चेन निर्बंध कालावधीमध्ये शेती विषयक सेवांशी निगडीत असलेले कृषि सेवा केंद्र जसे बियाणे, खते, किटकनाशके, कृषि साहित्य विक्री दुकाने यांच्याशी निगडीत विक्री साठवणूक व वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे .

 

राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत शेती संबंधित येणाऱ्या काळातील पेरणी व शेती व्यवस्थापनाअंतर्गत करावयाच्या अत्यावश्यक कामामध्ये शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये यादृष्टीने विचार करण्यात आला. त्यानुसार कोविड-19 ब्रेक द चेन निर्बंध कालावधीमध्ये शेती संबंधी कार्य, उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषिक्षेत्राचे अखंडीत सातत्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला.  

 

या सेवा सुरु ठेवतांना कोविड-19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वाचे तंतोतंत पालन करणे सर्व संबंधीतांना बंधनकारक राहील. या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपली व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.

0000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...