Wednesday, September 7, 2022

वृत्त क्र.  829 

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित

 नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  85 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 असे एकूण 2 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 436 एवढी झाली असून यातील 1 लाख 730  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1 असे एकूण 1  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 8,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 6 असे एकूण 14 व्यक्ती उपचार घेत आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 17 हजार 703
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 96 हजार 840
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 436
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 730
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 01
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-14
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 वृत्त क्र.  828 

मतदार यादीतील त‍पशिलाशी आधार जोडणी करण्‍यासाठी

11 सप्‍टेबर रोजी नांदेड जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादीच्‍या नोंदीचे आधार कार्डाशी जोडणी करण्‍याकरीता रविवार 11 सप्‍टेबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले आहे. जिल्‍हयातील सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्‍यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी रविवार 11 सप्‍टेबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आपल्‍या भागातील मतदान केंद्रावर जाऊन संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

दिनांक 11 सप्‍टेबर 2022 रोजी विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. सदर विशेष मोहिमेच्‍या दिवशी  मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहुन मतदार यादीतील तपशिलाशी मतदाराचे आधार क्रमांकाची जोडणी करणार आहेत. सदर दिवशी जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदार यादीत नावे समाविष्‍ट असलेल्‍या सर्व मतदाराचे मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांकाची जोडणी करण्‍यात येणार आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्‍यासाठी नमुना अर्ज 6 (ब) ERO Net , Garuda App, nvsp  आणि VHA  या माध्‍यमांवर देखील उपलब्‍ध करून देण्‍यात आलेला आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुलभतेसाठी Voter Helpline App ची सुविधा दिलेली आहे. VHA व्‍दारे मतदारांना आधार क्रमांक लिंकींग करता येतील तसेच मतदारांना www.nvsp.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्‍यात आली आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळास भेट द्यावी.

0000



 आणीबाणी कालावधीत लढा देणाऱ्या व्यक्तींची सन्मान योजना नव्याने सुरू


·  पात्रताधारकांनी परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- आणीबाणीच्‍या कालावधीत (सन 1975 ते 1977) मधील लढा देणाऱ्या व्‍यक्‍तींना सन्‍मान / यथोचित गौरव करण्‍यासाठी योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेत शासनाद्वारे मानधन दिले जाणार आहे. पात्रताधारक लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

ही योजना नव्‍याने सुरु करण्‍यास 28 जुलै 2022 रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. या योजनेअंतर्गत आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 10 हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस 5 हजार रुपये मानधन देण्यात येईल. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 5 हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस 2 हजार पाचशे रुपये मानधन अनुज्ञेय राहील. आणिबाणीच्‍या लढयामध्‍ये सहभाग घेतलेल्‍या व्‍यक्‍ती ज्‍यांनी यापूर्वी अर्ज केला नाही त्‍यांनी अर्जाचा नमुना परिशिष्‍ट अ व शपथपत्राचा मसुदा परिशिष्‍ट ब मध्‍ये माहिती व आवश्‍यक पुरावा कागदपत्रांच्‍या प्रमाणित प्रतीसह अर्ज सादर करावेत, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


0000

6.9.2022

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

 नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  91 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, नांदेड ग्रामीण 1, मुखेड 1 असे एकूण 4 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 434 एवढी झाली असून यातील 1 लाख 729  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1 असे एकूण 1  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 9,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 4 असे एकूण 13 व्यक्ती उपचार घेत आहेत 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 17 हजार 618
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 96 हजार 758
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 434
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 729
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-
 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-13
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...