Saturday, September 1, 2018


लोककला आणि पथनाट्य निवडसूची
अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लोककला व  पथनाट्य  यांची निवडसूचीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढविण्यात आली असून इच्छुक संस्था आता दिनांक १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज सादर करू शकतात.
इच्छुक संस्थांनी संबधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबई आणि मुंबई उपनगरातील इच्छुक संस्थांनी उपसंचालक (माहिती), कोकणभवन,नवी मुंबई यांच्याकडे अर्ज पाठवावेत असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला व पथनाट्य (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग,पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारुड इत्यादी) निवडसूची तयार करण्याचे काम सुरू आहे. इच्छुक संस्थांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना निःशुल्क प्राप्त करून घ्यावा.अर्जाचे नमुने व माहिती www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.inया वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.
००००


 लोकराज्य वाचक अभियानाचा
आज पीपल्स महाविद्यालयात शुभारंभ 
नांदेड, दि. 3 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व पीपल्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "लोकराज्य वाचक अभियान"चा शुभारंभ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सोमवार 3 सप्टेंबर 2018 रोजी पिपल्स कॉलेज नांदेड येथील कै. नरहर कुरुंदकर सभागृहात सकाळी 11.30 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. शैला सारंग, पिपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. यू. गवई आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.   
या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारी व लोकराज्य अंक विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच लोकराज्य प्रदर्शन, लोकराज्य विक्री तसेच लोकराज्य वर्गणीदार नोंदणी स्टॉल असणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, पदवी व पदव्यूत्तर विद्यार्थी व नागरिकांनी या कार्यक्रमास जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर  यांनी केले आहे.    
0000000


बारावी परीक्षेचे साहित्य
मंगळवारी वितरण
नांदेड, दि. 1 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी जुलै-ऑगस्ट 2018 पुरवणी परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालय अभिलेख यांचे वितरण लातूर विभागीय मंडळामार्फत मंगळवार 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत नांदेड जिल्ह्याचे पिपल्स हायस्कूल गोकुळनगर नांदेड येथे वितरण केंद्रावर वितरीत करण्यात येणार आहे. सर्व प्राचार्यांनी आपल्या प्रतिनिधीस लेखी पत्र देवून परीक्षेचे साहित्य स्वीकारण्यासाठी वितरण केंद्रावर पाठविण्यात यावे, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
000000


जेष्ठ नागरिक दिनानिमित्त
आरोग्य तपासणी शिबिर   
नांदेड, दि. 1 :- जेष्ठ नागरिक दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी आयोजित आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचा लाभ जेष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच आर. गुंटूरकर यांनी केले आहे.
जेष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली.  यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जेष्ठ नागरिक दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयात जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी जेष्ठ नागरिकांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात, कर्करोग, भौतिकोपचार सर्व प्रकारचे रक्त तपासण्या, नेत्र तपासणी तसेच औषधोपचार व आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात यावे असे निर्देश दिले आहे.
त्याअनुषंगाने 1 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात  जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहील. इतर रुग्णालयात संबंधित अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर होणार आहे.
आरोग्य शिबिरात जेष्ठ नागरिकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत सर्व प्रकारची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालय येथील बाह्य रुग्ण विभागातील जेष्ठ नागरिक कक्षात दररोज जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. जेष्ठ नागरिकांनी या दैनंदिन तपासणी व 1 ऑक्टोबर 2018 रोजीच्या आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच आर. गुंटूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ .एन आय. भोसीकर व जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी यांनी केले आहे.
00000


वाहनांचा तृतीय पक्ष
विमा मुदतीत बदल
नांदेड, दि. 1 :- रिट याचिका क्र.295 / 2012 मधील चारचाकी दुचाकी यांच्या तृतीय पक्ष विमा प्रकरणात मा. सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया यांनी 20 जुलै 2017 रोजी दिलेल्या आदेशानुसार 1 सप्टेंबर 2018 पासून नविन नोंदणी होणाऱ्या चारचाकी दुचाकी वाहनांच्या तृतीय पक्ष (Third Party) विम्याची मुदत चार चाकी वाहनासाठी 3 वर्ष दुचाकी वाहनासाठी 5 वर्ष करण्यात आली आहे. याची नांदेड जिल्हयातील नागरिकांनी वाहन वितरकांनी नोंद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. तसेच 1 सप्टेंबर पासून नव नोंदणीसाठी सादर होणाऱ्या अर्जासोबत वरील मुदतीचे विमा सादर करण्यात यावीत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड कळवितात.
00000


लोहा तालुक्‍यातील मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द
       भारत निवडणूक आयोगाने दिलेल्‍या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 सप्‍टेंबर 2018 रोजी लोहा तालुक्‍यातील प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्‍दी करण्‍यात आली आहे. मतदारांनी त्‍यांचे दावे व हारकती 31 ऑक्‍टोंबर 2018 रोजी पर्यंत तहसिल कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन लोहयाचे तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
       जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्‍हाधिकारी निवडणूक दिपाली मोतीयाळे, कंधारचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ यांच्‍या मार्गदर्शनाखाली लोहा तालुक्‍यात 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादयांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घेण्‍यात येत आहे. याचाच एक भाग म्‍हणून 1 सप्‍टेंबर 2018 रोजी सदर प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्‍दी संबंधीत बीएलओ यांचे मार्फत करण्‍यात आली. मतदारांनी त्‍यांचे संबंधीत बिएलओ यांचेशी संपर्क साधून मतदार यादी पहावी. याबाबत दावे व हरकती असल्‍यास 31 ऑक्‍टोंबर 2018 रोजी पर्यंत लोहा तहसिल कार्यालयात सादर करावे. प्राप्‍त दावे व हरकती 30 नोंव्‍हेबर 2018 पूर्वी निकालात काढण्‍यात येणार आहेत. 3 जानेवारी 2019 पूर्वी डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई करण्‍यात येणार आहे. तसेच 4 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.
       1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण होत असलेल्‍या पात्र मतदारांनी त्‍यांची नावे संबंधीत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बिएलओ) यांचेकडे नमुना नं (6) मध्‍ये भरुन दयावेत. मतदार यादीतील नावे वगळण्‍यासाठी नमुना नं (7), दुरुस्‍तीसाठी नमुना नंबर (8) व विधानसभा मतदार संघाअंतर्गत स्‍थलांतरासाठी नमुना नंबर (8 अ) भरुन संबंधीत बिएलओ यांचेकडे दयावा. तसेच सर्व मतदारांनी त्‍यांची नावे मतदार यादीत आहेत. या बाबतची खात्री करावी, असे आवाहन तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
00000


दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत
विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम
             
नांदेड दि. 1 :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या मतदारांची नावे या यादीत समाविष्ट नाहीत अशा मतदारांना अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत ज्‍या मतदारांना आक्षेप घ्यावयाचे असतील अशा मतदारांना किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाची असेल अशा मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करता येतील.
            
  त्‍यासाठी दिनांक ०१ सप्‍टेंबर २०१८ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. या प्रारूप मतदार याद्या सर्व मतदान केंद्रांवर, मतदार नोंदणी अधिकारी , सहायक मतदार नोंदणी अधिकारी व जिल्‍हा  निवडणुक अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या आहेत. या मतदार यादीमध्‍ये ज्‍या मतदाराची नावे समाविष्‍ट नाहीत अशा मतदारांना नमुना -६ मध्‍ये अर्ज सादर  करून त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट  करता येतील. तसेच अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना -6अ मध्‍ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्‍ट  करता येईल. मतदार यादीत समाविष्‍ट असलेल्‍या नोंदीबाबत आक्षेप असल्‍यास सदर नोंद वगळण्‍यासाठी नमुना -७ मध्‍ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्‍या नोंदीबाबत दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमुना -८ मध्‍ये आणि एका भागातून दुस-या  यादीभागात नोंद स्‍थलांतरीत करावयाची असल्‍यास विहीत नमुना -८अ मध्‍येअर्ज सादर करता येतील.
             
सदर अर्ज मतदार नोदंणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा  तहसिलदार यांचे कार्यालयात त्‍याच प्रमाणे मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी तथा बिएलओ यांचेकडे मतदान केंद्रावर सादर करता येतील. 
              मतदारांना त्‍यांचे अर्ज दि. 01 सप्‍टेबर 2018 ते 31 ऑक्‍टोबर 2018 या कालावधी मध्‍ये सादर करता येतील.
              दि.१ जानेवारी २०१९ रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख दि.१ जानेवारी २००१ वा त्यापूर्वीची आहे व जो त्‍या यादी भागातील सर्वसाधारण रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील.
               मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
              अधिक माहितीसाठी
 www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.  उपरोक्त सर्व माहिती दि. १ सप्टेंबर २०१८ पासून संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्रं.
पुनरीक्षण कार्यक्रमाचे विवरण
कालावधी
०१
प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी
शनिवार, दि. १ सप्टेंबर २०१८; 
०२
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
शनिवार, दि.१ सप्टेंबर ते बुधवार, दि.३१ ऑक्टोबर २०१८
०३
दावे व हरकती निकाली काढणे
शुक्रवार, दि. ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी; 
०४
डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई
गुरुवार, दि.३ जानेवारी २०१९ पूर्वी;

०५
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी
शुक्रवार, दि. ४ जानेवारी २०१९
        
   दिनांक 01.01.2018 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीनुसार मतदारांची संख्‍या –
Ø  स्‍त्री मतदार-       1262175
Ø  पुरूष मतदार-    1160573
Ø  इतर मतदार –             58
एकूण मतदार -        2422806

v  मतदार यादीतील मतदारांची छायाचित्र टक्‍केवारी               99.69 %

v  मतदार यादीतील मतदारांची ओळखपत्र  टक्‍केवारी     99.74 %

दि.01.01.2018 च्‍या अर्हता दिनांकावर प्रसिध्‍द झालेल्‍या मतदार यादी नंतर झालेया विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम व निरंतर अद्ययावतीकरण कार्यक्रमानंतर,
Ø  समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या मतदारांची संख्‍या                    -       15205
Ø  वगळणी करण्‍यात आलेल्‍या मतदारांची संख्‍या                     -       31204
Ø  दि.०१ .०९.२०१८ रोजी प्रारुप मतदार यादीनुसार मतदारांची संख्‍या    -   2406807

मतदान केंद्र -
दिनांक 01.01.2018 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी प्रसिध्‍दीच्‍या वेळी मतदान केंद्राची संख्‍या – 
एकूण मतदान केंद्र                                               -2832
मतदान केंद्रात झालेली वाढ                                                          -  123
दिनांक – 01.09.2018  रोजी आता एकूण मतदान केंद्राची संख्‍या     --  2955
00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...