Saturday, December 18, 2021

 अल्पसंख्याक हक्क दिवस” ऑनलाईन वेबिनार द्वारे संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक हक्क दिवस हा कार्यक्रम ऑनलाईन वेबीनारद्वारे घ्यावा लागत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख वक्ते ॲड. सरदार अमनपालसिंघ स्वर्णसिंघ कामठेकर व ॲड एम. एस. युसूफजई यांनी अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करून मार्गदर्शन केले.

नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन वेबीनाद्वारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे होते. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सामान्य), जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, इतर अल्पसंख्याक समुदायातील व्यक्ती ऑनलाईन वेबीनाद्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी अल्पसंख्याक समुदयांनी विचारलेल्या विविध प्रश्नांबाबत शासनाच्या निकषानुसार समर्पक उत्तरे देऊन आभार मानले.

000000

 

 शेतकऱ्यांनी हरभरा लागवड बीबीएफ तंत्रज्ञानाने करावी

-         तालुका कृषि अधिकारी सिध्देश्वर मोकळे

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-गटाच्या माध्यमातून नवीन एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन , व बीबीएफ तंत्रज्ञान पीक पद्धती यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून, काटेकोर पद्धतीने शेती केल्यास शेती ही निश्चित फायद्यात राहते असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी सिध्देश्वर मोकळे यांनी केले.

 

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व नांदेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कासारखेडा येथे हरभरा पिकांवरील शेतकरी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शेतीशाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासारखेडा गावचे सरपंच तानाजी शिंदे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी सिध्देश्वर मोकळे, लिंबगावचे मंडळ कृषि अधिकारी प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.

 

मंडळ कृषि अधिकारी प्रकाश पाटील यांनी शेती शाळेचे उद्देश सांगून शेती शाळेचे माध्यमातून शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे शेती केल्यास चांगल्या प्रकारचे उत्पादन घेऊन चांगला बाजारभाव मिळवता येतो, असे सांगितले. तसेच हरभरा पिकांवरील पाने खाणारी अळी व घाटे अळीचा जीवनक्रम सांगून त्याच्या व्यवस्थापन विषयी माहिती दिली. आत्मा यंत्रणेचे तालुका व्यवस्थापक शेखर कदम यांनी शेतकऱ्यांनी गट बनवून, त्यातून कंपनी स्थापन करावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले. याप्रसंगी कोरो मंडळ कंपनीचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक दिनेश जाधव यांनी शेतकऱ्यांना मृदा चाचणीचा लाभ सांगून कंपनीतर्फे मोफत माती परीक्षण करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासारखेडा गावचे कृषी सहायक वसंत जारिकोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहायक रमेश धुतराज, दत्ता भुते, कृषी मित्र उमेश आढाव, ग्रामपंचायतचे लिपिक दशरथ आढाव, शहाजी शिंदे, किशोर शिंदे यांनी सहकार्य केले.  या शेतीशाळा कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य योगाजी देशमुख, भीमा हिंगोले , शिवदास कडेकर, प्रतीक शिंदे, गजानन शिंदे,  राजाराम शिंदे, शेख नजीब आदीसह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

000000




 नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 19 जानेवारीला      

नांदेड (जिमाका) दि. 18 :- नायगाव, अर्धापूर व माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने आदेशीत केले आहे. या निवडणुकांबाबत दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रममध्ये मतमोजणीची तारीख वेळ आता 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...