Saturday, October 8, 2016

जिल्ह्यात हंगामात 112.78 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 40.90 मि.मी. 
           नांदेड, दि. 9 :- जिल्ह्यात  रविवार 9 ऑक्टोंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 654.46 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 40.90 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 1077.66 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-156.85, नांदेड-133.30, अर्धापूर-132.97, भोकर-128.41, कंधार-126.45, मुखेड-124.43, बिलोली-113.77, हदगाव-113.31,नायगाव-108.10, मुदखेड-105.83, माहूर-103.69, धर्माबाद-102.85, देगलूर-97.43, उमरी-97.08, हिमायतनगर-95.29, किनवट-85.14. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  112.78 इतकी झाली आहे. 
जिल्ह्यात रविवार 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 49.63 (1215.54), मुदखेड- 47.00 (903.35), अर्धापूर-50.33 (1156.33), भोकर-30.50 (1279.50), उमरी-55.67 (967.27), कंधार-45.00 (1019.97), लोहा-58.33 (1307.00), किनवट-22.43 (1055.75), माहूर-46.50 (1285.75), हदगाव-27.00 (1107.41), हिमायतनगर-7.67 (931.31), देगलूर-44.50 (877.17), बिलोली-37.40 (1101.40), धर्माबाद-49.33 (941.71), नायगाव-39.60 (989.74), मुखेड-43.57 (1103.42) आज  अखेर  पावसाची सरासरी 1077.66 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 17242.62) मिलीमीटर आहे. 
नांदेड जिल्ह्यात 1 जून ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत पडणारा वार्षिक पाऊस मि.मी. मध्ये पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) किनवट-1240.00, माहूर-1240.00, भोकर-996.40, उमरी-996.40, हदगाव-977.30, हिमायतनगर-977.30, बिलोली-968.10, धर्माबाद-915.60, नायगाव-915.60, नांदेड-911.90, देगलूर-900.30, मुखेड-886.80, अर्धापूर-869.60, मुदखेड-853.56, लोहा-833.30, कंधार-806.60.

00000
नवरात्रोत्सवात सप्तमी, अष्टमीचा अपूर्व योग….
शारदीय नवरात्रोत्सवात आज शनिवार 8 ऑक्टोंबर रोजी सप्तमी व अष्टमी एकाच दिवशी येण्याचा योग जुळून आला आहे. असा योग चारशे वर्षातून एकदा येतो असे माहूरगड येथील श्री रेणुकादेवी संस्थानातील पुजारी चंद्रकांत भोपी यांनी सांगितले. नवरात्रोत्सवाच्या आजचे श्री रेणुकामाता देवीचे सालंकृत रुपाची छायाचित्रे (छाया- विजय होकर्णे नांदेड )

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न
269 प्रकरणे निकाली, 1 कोटी 9 लाख रुपये वसूल
नांदेड , दि. 8 :- जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने जिल्हयात आज राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यात जिल्ह्यात तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 927 प्रकरणांपैकी 269 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये तडजोड व दंड स्वरूपात  1 कोटी 9 लाख 77 हजार 372 रुपये वसूल करण्यात आले.   
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातर्फे फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, ट्रॅफिक, पिट्टी प्रकरणे तसेच मुनिसिपल प्रकरणांचे राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित केले होते. या लोकन्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाले.
            नांदेड जिल्हा न्यायालयात एकूण 5 पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश एच. आर. वाघमारे, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एन. सचदेव, सह दिवाणी न्यायाधीश एस. आर. नरवाडे, दिवाणी न्यायाधीश विश्वंभरण सरिता, एस. एम. जोशी यांनी काम पाहिले. तसेच यांना पॅनल सदस्य म्हणून अॅड. विजय गोणारकर, अॅड. एच. आर. जाधव, अॅड. नईमखान पठाण, अॅड. आर. एस. कानोटे, अॅड. सी. आर. भुयारे, अॅड. साबळे, अॅड. प्रविण अयाचित, अॅड. एम. के. हुके, अॅड. पी. एच. रतन, अॅड. मो. शाहेद मो. इब्राहिम यांचे सहकार्य लाभले.
या लोकन्यायालयात जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन व्यवस्थापक एम. के. आवटे तसेच विधीज्ञ, पक्षकार बांधव आणि जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक पी. एस. तुप्तेवार, अधिक्षक कबिर सिध्दीकी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक पी. आर. खरात, पॅनलवरील न्यायालयीन कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

000000

आदिवासी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन संपन्न

नांदेड , दि. 8 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा किनवट येथे शुक्रवार 7 ऑक्टोंबर रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचे हस्ते  ध्वजारोहण व क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून पार पडले.    
या प्रसंगी डॉ. भारुड यांनी दैनंदिन जीवनात खेळाचे महत्व यावर मार्गदर्शन केले व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तहसीलदार आजामोद्दीन, लेखाधिकारी श्री. आगळे, श्री. जाधव, श्री. बनसोडे,  श्री. कांबळे, शासकीय व अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक , क्रीडा प्रशिक्षक आदी  उपस्थित होते.  यावेळी विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून डॉ.राजेंद्र  भारुड यांना  मानवंदना दिली.

00000