Thursday, December 17, 2020

 

32 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

38 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  गुरुवार 17 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 32 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 19 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 38 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 215 अहवालापैकी 1 हजार 182 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 943 एवढी झाली असून यातील 19 हजार 910 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 276 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 16 डिसेंबर रोजी किनवट तालुक्यातील मांडवी येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 562 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, कंधार तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 8 असे एकूण 38 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 14, अर्धापूर तालुक्यात 1, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव 1 असे एकुण 19 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6, हदगाव तालुक्यात 1, मुखेड 2, देगलूर 3, कंधार 1 असे एकुण 13 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 276 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 31, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 21, मुखेड कोविड रुग्णालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 13, हदगाव कोविड रुग्णालय 4, किनवट कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 119, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 27, हैदरबाद येथे संदर्भीत 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 20 आहेत.   

गुरुवार 17 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 161, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 63 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 67 हजार 208

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 42 हजार 198

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 943

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 910

एकुण मृत्यू संख्या-562

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-487

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-276

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-16.           

000000

 

दहावी, बारावी परीक्षा अर्जातील

माहितीच्या अनुषंगाने शिक्षण मंडळाकडून खुलासा 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्य शिक्षण मंडळामार्फत आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा फॉर्ममधून हिंदू शब्द वगळल्याबाबतच्या काही बातम्या विविध प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत असल्याचे दिसून आले आहे. त्याअनुषंगाने राज्य शिक्षाण मंडळाकडून पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधीत माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने भरुन घेण्यात येतात. या आवेदनपत्रामध्ये विविध माहितीचा समावेश आहे. त्यामध्ये Minority Religion अल्पसंख्याक धर्म हा रकाना सन 2014 पासून समाविष्ट करण्यात आलेला आहे. या रकान्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन या Minority Religion अल्पसंख्याक धर्माचा उपरकान्यात समावेश आहे. या व्यतिरिक्त उर्वरित सर्व घटकांसाठी Non-Minority  अल्पसंख्याक इतरहा रकाना सन 2014 पासूनच समाविष्ट करण्यात आलेला आहे. तेंव्हापासून याबाबतची प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाच्या परीक्षा अर्जामध्ये शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरुन घेण्यात येत आहे.

 

सन 2013 मध्ये अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकार यांनी तसेच अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र शासन यांनी स्पर्धा परीक्षांसाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा तपशील मंडळाकडे मागितला. मंडळाच्या परीक्षा समितीच्या दिनांक 7 सप्टेंबर 2013 च्या सभेतील विषय क्रमांक 54 अंतर्गत झालेल्या ठरावान्वये उपरोक्त उपरकान्यांचा समावेश परीक्षा फॉर्ममध्ये करण्यात आलेला आहे. या रकान्यात नमूद केलेले मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन हे अल्पसंख्यांक समुदाय महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मंडळाच्या आवेदनपत्रामध्ये घेण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना या रकान्यातील माहिती भरण्यासाठी Non – Minority अल्पसंख्याक हा रकाना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या रकान्यातील माहितीचा उपयोग उपरोक्त नमूद केलेल्या कारणांसाठी करण्यात येतो. सदर माहिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर नमूद करण्यात येत नाही, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

 

सुधारीत वृत्त क्र. 948

18 डिसेंबर रोजी अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस

वेबीनारद्वारे साजरा करण्यात येणार

नांदेड (जिमाका) दि. 17 :- अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव माहिती देण्यासाठी शुक्रवार 18 डिसेंबर 2020 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वा. ऑनलईन, वेबीनारद्वारे साजरा करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून ॲड. विजयमाला संभाजी मनवर नांदेड ह्या संबोधित करणार आहेत. 

संयुक्‍त राष्‍ट्रसंघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्‍ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्‍पसंख्‍याकांच्‍या हक्‍काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्‍तृत केला आहे. त्‍यानुसार अल्‍पसंख्‍याक नागरिकांना त्‍यांची संस्‍कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्‍यादींचे संवर्धन करता यावे यादृष्‍टीने प्रयत्‍न करण्‍याबाबत राष्‍ट्रीय आयोगाने सूचना दिल्‍या आहेत. त्‍यानुसार प्रत्‍येकवर्षी दि. 18 डिसेंबर हा दिवस जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस म्‍हणून राबविण्‍यात येतो. 

अल्‍पसंख्‍याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी कोविड-19 च्‍या विषाणुच्‍या संसर्गाची पार्श्‍वभूमी विचारात घेता केंद्र व राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनानुसार लोकसहभागाबाबत देखील योग्‍य खबरदारी घेवून 18 डिसेंबर हा दिवस अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस म्‍हणून ऑनलाईन / वेबिनार इत्‍यादी पद्धतीने साजरा करण्‍याबाबत सूचना दिल्‍या आहेत. तसेच या दिवसाच्‍यानिमित्ताने अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव किंवा माहिती करुन दिली जाणार आहे. त्‍याअनुषंगाने दि. 18 डिसेंबर 2020 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता पुढील ऑनलाईन, वेबीनारद्वारे साजरा करण्‍यात येत आहे. या कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून ॲड. विजयमाला संभाजी मनवर नांदेड ह्या संबोधित करणार आहेत. 

Join Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/7044496169?pwd=djVOY0RISNIEUFhVQVdMTjRrcGtLQT09

Meeting ID: 7044496169

Passcode: 2uvRH8         

अल्‍पसंख्‍यांक समाजातील नागरीकांनी वरील लिंकवर जॉईन होऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

000000

 

उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी

सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2020 या वर्षासाठी रविवार 31 जानेवारी 2020 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे. 

उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात. सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते. 

जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या वेळी, उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापुर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे. 

नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी रविवार 31 जानेवारी 2021 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000

 

 

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी

प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 17 :- बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीची प्रवेश परिक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यास मंगळवार 29 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर करता येईल.

 

ही प्रवेश परिक्षा शनिवार 10 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार आहे. संबंधित शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांनी याची नोंद घ्यावी. तालुक्यातील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन शंकरनगर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. एच.व्ही प्रसाद यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...