Thursday, January 13, 2022

 जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते सिम्युलेटरचे उद्घाटन

नांदेड (जिमाका) दि. 13  अनुज्ञप्ती चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 15 नुसार प्रत्यक्ष चाचणी घेण्यापूर्वी उमेदवाराची सिम्युलेटर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार नांदेड येथील प्रादेशिक कार्यालयात व्हर्टेक्स संशोधन कंपनीचे दोन सिम्युलेटर प्राप्त झाले याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामतउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊतसह.प्रादेशिक परिवहन अधिकारी  संदिप निमसेतसेच मोटार वाहन निरिक्षकसहा.मोटार निरिक्षकसर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण सिम्युलेटरची माहिती घेऊन स्वत सिम्युलेटरवर प्रात्याक्षिक करून पाहिले. रस्ता सुरक्षा कक्षशिकाऊ अनुज्ञप्ती कक्ष व संपूर्ण कार्यालयाची पाहणी करून या उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

ड्राईव्हींग सिम्युलेंटरचा उपयोग चारचाकी वाहन शिकणे, पक्के लायन्स काढण्यासाठी तसेच उमेदवारांची चाचणी घेण्यासाठी होणार आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग नांदेड जिल्ह्यात उत्कृष्ट वाहन चालक तयार करण्यासाठी होणार आहे. सिम्युलेटरवर प्रशिक्षण घेऊन नांदेड जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी होण्यास मदत  होईल, अशी माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

000000



 नांदेड जिल्ह्यात 400 व्यक्ती कोरोना बाधित

तर 72 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 618 अहवालापैकी 400 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 343 तर अँटिजेन तपासणीद्वारे 57 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 92 हजार 189 एवढी झाली असून यातील 88 हजार 98 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 436 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 240, नांदेड ग्रामीण 20, भोकर 1, बिलोली 3, देगलूर 2, धर्माबाद 10, हदगाव 1, हिमायतनगर 1, कंधार 4, किनवट 1, लोहा 9, मुदखेड 21, उमरी 3, परभणी 10, हिंगोली 2, वाशीम 1, अमरावती 1, कोल्हापूर 1, अकोला 4, पुणे 1, जालना 1, मुंबई 2, बीड 1, हैद्राबाद 1, उत्तरप्रदेश 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 11, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 3, बिलोली 2, धर्माबाद 10, हदगाव 2, किनवट 8, मुदखेड 2, मुखेड 7, नायगाव 1, उमरी 9, देगलूर 1असे 400 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 58, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, खाजगी रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  

 

आज 1 हजार 436 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 291, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1091,  खाजगी रुग्णालय 15 अशा एकुण 1 हजार 436 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 12 हजार 73

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 6 हजार 13

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 92 हजार 189

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 98

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.56 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-34

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 436

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्जाची पडताळणी  

नांदेड (जिमाका) दि. 13 :- विद्यार्थी, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील सन 2019-20, 2020-21 2021 -22 मधील अर्ज विहित वेळेत फॉरवर्ड झाले नाहीत हे अर्ज आपोआप रद्द होतील. हे अर्ज रद्द झाल्यास याची जबाबदारी महाविद्यालय प्राचार्य, विद्यापीठाचे कुलसचिव संबंधित विद्यार्थ्यांची राहील. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास प्राचार्य, विद्यापीठ व विद्यार्थ्यांची जबाबदारी राहील. शिष्यवृत्तीचे महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज महाविद्यालयांनी आवश्यक कागदपत्राची तपासणी करुन अर्जावर कार्यवाही करावी, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. वि. रा. मोरे यांनी केले आहे. 

संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्जाची तात्काळ पडताळणी संस्था, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरुन करण्याच्या सूचना देण्यात आलेली आहे. डॅशबोर्ड अहवालानुसार सन 2019-20 व सन 2020-21 मधील विद्यार्थ्याचे अर्ज संस्था, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर प्रलंबित आहेत या अर्जाची पडताळणी करुन तात्काळ अर्ज निकाली काढण्यात यावेत, असेही आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. वि. रा. मोरे यांनी केले आहे.

0000

 वाहनाची पुर्ननोंदणी, योग्यता प्रमाणपत्राचे

नुतनीकरण करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 47 व नियम 81 मध्ये सुधारणा करून विविध शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या सुधारणा 1 एप्रिल 2022 पासून अंमलात येणार आहेत. सर्व संबंधितांनी त्यांच्या वाहनांची पुर्ननोंदणी व परिवहन वाहन मालकांनी योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण विहित मुदतीत करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

नोंदणीचे उद्देश व शुल्क पुढीलप्रमाणे आहे. नोंदणीचे प्रमाणपत्र निर्गमीत करणे, नवीन नोंदणी चिन्ह नियुक्त करणे किंवा नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी इनव्हॅलीड कॅरेज (दिव्यांगजनासाठी अशक्त वाहन) 50 रुपये, मोटर सायकलसाठी नवीन नोंदणी 300 रुपये, नोंदणीचे नुतनीकरण 1 हजार रुपये, तीन चाकी/ क्वाड्रिसायकलसाठी नवीन नोंदणीसाठी 600 रुपये व नोंदणीचे नुतनीकरणासाठी 2 हजार 500 रुपये, हलकी मोटार वाहनात नवीन वाहन नोंदणीसाठी 600 रुपये, नोंदणीचे नुतनीकरण 5 हजार रुपये, मध्यम मालवाहू, प्रवासी वाहनासाठी 1 हजार रुपये, अवजड मालवाहू / प्रवासी वाहनासाठी 1 हजार 500 रुपये, आयात केलेले मोटार वाहन (दोन किंवा तीन चाकी) वाहन नवीन नोंदणीसाठी 2 हजार 500 व नोंदणीचे नुतनीकरणासाठी 10 हजार रुपये, आयात केलेले मोटार वाहन (चार किंवा अधिक चाके) नवीन नोंदणीसाठी 5 हजार व नोंदणीचे नुतनीकरणासाठी 40 हजार रुपये शुल्क आहे. यात उल्लेख न केलेले इतर कोणत्याही वाहनाच्या नवीन नोंदणीसाठी 3 हजार व नोंदणी नुतनीकरणासाठी 6 हजार रुपये शुल्क आकारले जाईल. 

नोंदणीचे प्रमाणपत्र फॉर्म 23A मध्ये निर्गमीत केलेले किंवा नूतनीकरण केलेले स्मार्ट कार्ड असल्यास 200 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी अर्ज करण्यास उशीर झाल्यास, मोटार सायकलच्या संदर्भात प्रत्येक महिन्याच्या विलंबासाठी किंवा त्याच्या काही भागासाठी 300 रुपये आणि परिवहन वाहनांसाठी प्रत्येक महिन्याच्या विलंबासाठी किंवा त्याच्या काही भागासाठी 500 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. 

अनुक्रमांक (10) आणि त्याच्याशी संबंधित नोंदी नंतर म्हणजे 15 वर्षांपेक्षा जुन्या मोटार वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्राचे अनुदान आणि नुतनीकरणासाठी वाहनाची चाचणी घेणे. मोटार सायकलसाठी हस्तचलित 400 रुपये, स्वयंचलितसाठी 500 रुपये. तीन चाकी किंवा हलकी मोटार वाहन किंवा क्वाड्रिसायकलसाठी हस्तचलित 800, स्वयंचलितसाठी 1 हजार रुपये, मध्यम मालवाहू किंवा प्रवासी मोटार वाहनासाठी हस्तचलित आठशे, स्वयंचलित 1 हजार 300 रुपये. अवजड मालवाहू वस्तू किंवा प्रवासी मोटार वाहन हस्तचलितसाठी 1 हजार रुपये, स्वयंचलित 1 हजार 500 रुपये शुल्क राहील. 

अनुक्रमांक (11) आणि त्याच्याशी संबंधित नोंदी नंतर 15 वर्षांपेक्षा जुन्या मोटार वाहनांसाठी (वाहतूक) फिटनेस प्रमाणपत्र मंजूर किंवा नूतनीकरण मोटारसायकलसाठी 1 हजार रुपये, तीन चाकी किंवा हलकी मोटार वाहन किंवा क्वाड्रिसायकलसाठी 3 हजार 500, हलकी मोटार वाहनासाठी 7 हजार 500 रुपये, मध्यम मालवाहू किंवा प्रवासी मोटार वाहनासाठी 10 हजार रुपये, अवजड मालवाहू वस्तू किंवा प्रवासी मोटार वाहनासाठी 12 हजार 500 रुपये. तर फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 50 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 जिल्ह्यातील युवक, लाभार्थ्यांसाठी उद्यमिता प्रकल्प

नांदेड (जिमाका) 13 :- कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय व लेट्स इंडोर्स संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात 200 उद्योजक घडविण्यासाठी प्रोजेक्ट उद्यमिता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. युवकांनी तसेच व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या लाभार्थ्यांनी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय आणि लेट्स इंडोर्स संस्था यांच्या भागीदारीतून उद्यमिता हा प्रकल्प नांदेड, यवतमाळ, रायगड, पुणे, नाशिक, आणि चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याद्वारे शेकडो अतिसूक्ष्म, सूक्ष्म, लघु उद्योजकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 200 उद्योजक घडविण्यात येणार आहेत. आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत 30 लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून देण्यास व बँकेत कर्ज प्रस्ताव करण्यास सहकार्य केले आहे. 

प्रकल्प उद्यमिता हा अनोख्या शैलीमध्ये इच्छूक उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या उद्देशाने उभी केलेली यंत्रणा आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर व्यवसाय, बचतगटांचे लघुउद्योग, गृह उद्योग, जोड व्यवसाय आणि इतर उपजीविकेचे साधने भक्कमपणे उभी करून उद्योजकांचे उत्पादन वाढ करण्यासाठी नियोजन व प्रयत्न केले जाणार आहेत. शासनाच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान मुद्रा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कौशल्य विकास अभियान, इतर सर्व आर्थिक मागास विकास महामंडळे यासारख्या राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...