Saturday, March 19, 2022

 जिल्ह्यात एक कोरोना बाधित झाला बरा

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 577 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 795 एवढी झाली असून यातील 1 लाख 92 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 11 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 4 असे एकुण 11 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 90 हजार 552

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 70  हजार 649

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 795

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 92

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-11

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 

 

विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत आजपासून धान्य महोत्सव 

·         गावराण लसून पासून कडधान्यासह फळ, भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदीची संधी

·         कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन  

 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत दिनांक 20 मार्च पासून तीन दिवसीय धान्य महोत्सवाचा प्रारंभ होत आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध वैशिष्ट्य व गुणवत्तापूर्ण शेतमालाचे उत्पादन घेणारे अनेक प्रगतशील शेतकरी आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपले उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत कोणत्याही साखळी विना विकता यावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विशेष पुढाकार घेतला. शासनाच्या विकेल ते पिकेल या धोरणाअंतर्गत हा महोत्सव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचला जावा या उद्देशाने घेतला जात आहे.

 

हा धान्य महोत्सव दिनांक 20, 21 व 22 असे सलग तीन दिवस होत असून सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत सुरु राहील. कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे.  या धान्य महोत्सवात भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त 75 भव्य शेतमाल‍ विक्री केंद्र असणार आहेत. यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहु, ज्वारी, तांदूळ, तुर, मुग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले, विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने (गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने जसे, मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने (चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी), टरबुज, खरबुज आदी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

0000

 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...