Wednesday, September 6, 2017

विधानपरिषदेचे उप सभापती
माणिकराव ठाकरे यांचा दौरा
नांदेड दि. 6 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 7 सप्टेंबर 2017 रोजी दिग्रस जि. यवतमाळ येथुन मोटारीने रात्री 8.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार 8 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9.15 पर्यंत राखीव. सकाळी 9.30 वा. नांदेड येथे आयोजित मराठवाडा विभागीय बैठकीस उपस्थिती स्थळ - नवा मोंढा मैदान नांदेड. सकाळी 11 वा. नांदेड येथुन परभणीकडे प्रयाण करतील.
000000


विधानसभा विरोधी पक्ष नेता
राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
नांदेड, दि. 6 :-  महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 7 सप्टेंबर 2017 रोजी पुणे येथून खाजगी विमानाने रात्री 8 वा. श्री गुरु गोविंदसिंघ विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. रात्री 8.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शुक्रवार 8 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9.30 वा. खा. राहुल गांधी उपाध्यक्ष अखील भारतीय काँग्रेस यांच्यासमवेत काँग्रेस पक्ष विभागीय मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- नवा मोंढा मैदान नांदेड. सकाळी 11.30 वा. नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील. परभणी येथून मोटारीने सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 7 वा. श्री गुरु गोविंदसिंघ विमानतळ नांदेड येथुन खाजगी विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

000000
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान
बृहन्मुंबई, नागपूर, कोल्हापूर व पुण्यातील 5 रिक्तपदांसाठी देखील मतदान

मुंबई, दि. 6 :- नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच बृहन्मुंबई, पुणे व नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 50 हजार 439 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 96 हजार 580 इतकी आहे. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 41 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2; तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 22 जागा राखीव आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ‘116’, पुण्यातील  प्रभाग क्र. ‘21नागपूरमधील प्रभाग क्र. ‘35-आणि कोल्हापूरमधील प्रभाग क्र. ‘11’ ‘77’ च्या रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील मतदान होत आहे. या सर्व ठिकाणी 16 सप्टेंबर 2017 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरूवात होईल. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नांदेड- वाघाळा महानगरपालिका आणि पोट निवडणूक होत असलेल्या अन्य महानगरपालिकांच्या संबंधित प्रभागांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ती संपुष्टात येईल. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
निवडणूक कार्यक्रम
•           नामनिर्देशनपत्रे दाखल करणे-         16 ते 23 सप्टेंबर 2017
•           नामनिर्देशपत्रांची छाननी-               25 सप्टेंबर 2017
•           उमेदवारी मागे घेणे-                      27 सप्टेंबर 2017
•           निवडणूक चिन्ह वाटप-                 28 सप्टेंबर 2017
•           मतदान-                                     11 ऑक्टोबर 2017
•           मतमोजणी-                                 12 ऑक्टोबर 2017
•           निकालांची राजपत्रात प्रसिद्धी-        13 आक्टोबर 2017

0-0-0

(Jagdish More, PRO, SEC)
नांदेड येथील गोदावरी नदीपात्रातील श्री गणेश विसर्जनाची छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी काढलेली आकर्षक छायाचित्रे...!






गट शेतीस चालना देणे योजनेसाठी प्रकल्प
अहवाल सादर करण्यास 20 सप्टेंबरची मुदत    
नांदेड, दि. 6 :- गट शेतीस प्रोत्साहन सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही  योजना सन 2017-18 सन 2018-19 या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणु राबविण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी गटांनी शेतीचे प्रकल्प अहवाल बुधवार 20 सप्टेबर 2017 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक, आत्मा, यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
या योजनेसाठी अटी शर्ती पुढील प्रमाणे राहतील. या योजनेंतर्गत किमान 20 शेतकरी समुहाच्या माध्यमातुन किमान शंभर  एकर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषि कृषि पुरक उपक्रम प्रकल्प स्वरुपात राबविण्यात यावा. समुह शेतीचा प्रयोग हा एका शिवारातील संलग्न भातीक क्षेत्रामध्ये सामुहकरत्या नियोजनबद्ध शेती करणारा असावा. सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1890 अथवा कंपनी अधिनियम 1958 च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी / गट म्हणुन नोंदणीकरणे आवश्यक राहील. सामुहिक सिंचन सुविधा, सामुहिक पध्दतीने यांत्रीकीकरणाद्वारे मशागत करणे शक्य असल्याने सामुहिक शेतीस प्राधान्य देण्यात येईल. गटशेती या योजनेअंतर्गत प्रकल्प स्वरुपात उपक्रम राबविण्यात येईल. या योजनेत गठ झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या गटाना प्रगतीशी शेतीचे तंत्रज्ञान देण्यासाठी शेती विषयक तांत्रीक सल्लागाराची सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
शेतीपुरक जोडधंदा जसे सामुह गोठा, दुग्ध प्रक्रिया औजारे, मत्सपालन, मधुमक्षीका पालन, रेशीम उद्योग, कुक्कुट पालन तसेच मागेल त्याला शेततळे, जलसंपदा विभागाकडील कामे इत्यादी कार्यक्रम संबधीत कृषि संलग्न विभागाकडुन त्या विभागाच्या प्रचलित निकषा प्रमाणे समुह गटास प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येतील. बँकेत प्रकल्प आराखडा सादर केलेल्या, करणा-या गटास प्राधान्य देण्यात येईल. ज्या तालुक्यात ग्रामीण स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (एम.ए.सी.पी.) किंवा अन्य योजना, प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या नाहीत अशा तालुक्यास या योजनेत प्राधान्य देण्यात येईल.  ज्यगटाचे प्रकल्प आराखडे सर्व अटी शर्तीची पुर्तता करतील अशा गटांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक गटाने, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी कृषि विभागच्या तालुका कृषि अधिकारी यांचेकडे संपर्क  साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी केले आहे.

000000
निराधार योजनेच्या लाभार्थ्‍यांचे बँक खाते
काढण्‍यासाठी लोहा तहसिल कार्यालयात शिबीर
नांदेड दि. 6 :- लोहा तालुक्‍यातील संजय गांधी निराधार योजनेतील ज्‍या लाभार्थ्‍यांनी आयसीआयसीआय बँकेत खाते काढले नाही, त्या लाभार्थ्‍यांचे बँक खाते काढण्‍यासाठी 7 व 8 सप्‍टेंबर 2017 रोजी लोहा तहसिल कार्यालय येथे शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे.
      लोहा तालुक्‍यातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्‍ती वेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृती वेतन योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना आयसीआयसीआय बँकेमार्फत दरमहा  600 रुपये या प्रमाणे अनुदान वाटप केले जाते. काही लाभार्थ्‍यांनी आयसीआयसीआय बँकेचे खाते काढले नाही, अशा लाभार्थ्‍यांचे बँक खाते काढण्‍यासाठी आयसीआयसीआय बँकेचे प्रतिनिधी तहसिल कार्यालय लोहा येथे दिनांक 7 व 8 सप्‍टेंबर रोजी येणार आहेत. ज्‍या लाभार्थ्‍यांचे बँक खाते अद्याप काढले नाहीत तसेच 29 ऑगस्ट रोजी मंजूर लाभार्थ्‍यांनी त्‍यांचे बँक खाते काढण्‍यासाठी आधार कार्ड, फोटो असल्‍यास घेऊन तहसिल कार्यालय लोहा येथे या दोन दिवसीय कॅम्‍पमध्‍ये कार्यालयीन वेळेत उपस्‍थीत राहुन बँकेच्‍या प्रतिनिधीकडून बँक खाते काढून घ्‍यावे, असे आवाहन तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी केले आहे.

00000
दिव्यांग लाभार्थ्यांची रक्कम बँकेत जमा
नांदेड, दि. 6 :-  जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था 3 टक्के अपंग कल्याण निधी 100 दिव्यांग पात्र लाभार्थ्यांची रक्कम त्यांच्या वैयक्तीक बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची यादी जिल्हा समाज कल्याण कार्यालय जि. प. नांदेड येथे लावण्यात आली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी संबंधीत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
शासकीय अध्यापक महाविद्यालयात
शिक्षक दिन संपन्न
नांदेड, दि. 6 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे या होत्या. यावेळी प्रा. डॉ. सुलभा मुळे यांनी मार्गदर्शन केले तर निता मोरे,  सातभाई, श्री. कदम, दिपक जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. सुत्रसंचालन सारिका गायकवाड यांनी केले.

00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...