Friday, June 26, 2020

कोरोनातून 3 व्यक्ती झाले बरे नवीन एकही व्यक्ती बाधित नाही


वृत्त क्र. 578   
कोरोनातून 3 व्यक्ती झाले बरे
नवीन एकही व्यक्ती बाधित नाही
नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 2 आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 असे एकूण 3 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 331 बाधितांपैकी एकूण 270  व्यक्ती कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  शुक्रवार  26 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 79 अहवालापैकी 79 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे आज नवीन एकही बाधित व्यक्ती आढळला नाही.  
आज 2 पॉझिटीव्ह बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उमर कॉलनी येथील 54 वर्षाचा 1 पुरुष व गुलजार बाग नांदेड येथील 65 वर्षाचा 1 पुरुषांचा यात समावेश आहे. हे दोन्ही बाधित डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार घेत होते. दोन्ही बाधितास उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. जिल्ह्यात आतापर्यत कोरोनामूळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. औषधोपचार चालू असलेल्या 45 बाधितांपैकी 6 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात वय 50  55 वर्षाच्या दोन स्त्री व 38, 42, 67 व 75  वर्षाचे चार  बाधित पुरुषांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 45 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 9, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 31 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1  बाधित व्यक्ती उपचार घेत असून 3 बाधित  औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. शुक्रवार 26 जून रोजी 109  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 444,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 47,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 249,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 331,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 16,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 270,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 45,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 109 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000



सुधारीत वृत्त क्र. 577   
सलून, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर
सुरु ठेवण्यास अटींच्या अधीन राहून परवानगी
नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्‍हयातील केशकर्तनालय दुकाने, स्‍पा, सलुन, ब्‍युटी पार्लर अटी व शर्तीचे अधीन राहून शनिवार 27 जून पासून सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत चालू ठेवण्‍यास पुढील आदेशापर्यंत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे.
राज्य शासनाच्या 25 जून 2020च्या आदेशानुसार केशकर्तनालय दुकाने, स्‍पा, सलुन, ब्‍युटी पार्लर चालू ठेवण्‍यासाठी अटी व शर्तीचे अधीन ही परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने केवळ निवडक सेवा जसे की केस कापने, केसाला रंग देणे इत्‍यादीला परवानगी असेल परंतू  इतर सेवांना सध्‍या परवानगी नाही. या सेवेच्या बाबी दुकानात स्‍पष्‍टपणे दर्शविल्या  जाव्‍यात. सलून कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अॅप्रॉन आणि मास्‍क इत्यादीचा समावेश असलेले संरक्षक साधने वापरणे आवश्‍यक आहे. प्रत्‍येक सेवेनंतर खुर्ची स्‍वच्‍छ / निर्जतूक करुन दुकानातील संपूर्ण क्षेत्र आणि जमिन, पृष्‍ठभाग, फरशी प्रत्‍येक 2 तासांनी स्‍वच्‍छ व निर्जंतूक करण्‍यात यावेत. टॉवेल्‍स, नॅपकिन्‍स यांचा वापर झाल्‍यानंतर त्‍याची विल्‍हेवाट लावता येईल अशा प्रकारच्‍या (Disposable) टॉवेल्‍स, नॅपकिन्‍सचा वापर करण्‍यात यावा. तसेच वापरुन झाल्‍यावर  विल्‍हेवाट न लावता येण्‍याजोग्‍या (Non Disposable) उपकराणांचे  प्रत्‍येक सेवेनंतर स्‍वच्‍छ आणि निर्जंतूकीकरण करणे बंधनकारक आहे.  सेवा देणारा व सेवा घेणारा सोडून इतर व्‍यक्‍तीमध्‍ये 3 फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. मास्‍क, रूमाल नाका तोंडाला झाकुण ठेवील अशा प्रकारचे असणे आवश्‍यक आहे. तसेच दुकानामध्‍ये सॅनिटायझर, हॅन्‍डवॉश, साबण, व इतर हात धुण्‍याचे साहित्‍य ठेवणे बंधनकारक राहील. ग्राहकांना केवळ अपॉइमेंट  (Appointment) घेऊनच येण्‍यास कळवावे. ग्राहक विनाकारण दुकानामध्‍ये वाट पाहत राहणार नाही याची सलुन्‍स मालकांनी दक्षता घ्‍यावी. प्रत्‍येक दुकानदारांनी ग्राहकांनी वरिल प्रमाणे घ्‍यावयाच्‍या दक्षतेबाबतची माहिती दुकानाच्‍या दर्शनी भागात ठळक स्‍वरुपात लावण्‍यात यावी. या अटींचे उल्‍लघन केल्‍यास दंडात्‍मक व कायदेशिर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्‍यात येईल.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897  आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल.
सर्व संबंधित यंत्रणांनी अत्‍यावश्‍यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 26 जून 2020 रोजी निर्गमित केले आहेत.
00000


सार्वजनिक बांधकाम मंत्री
अशोक चव्हाण यांचे आगमन
नांदेड (जिमाका) दि. 26 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आज नांदेड दौऱ्यासाठी दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन झाले. कोविड 19 च्या आजारावर विजय मिळविल्यानंतर त्यांची नांदेड येथे ही पहिलीच भेट असल्याने औत्सुक्य होते. या औत्सुक्यापोटी जिल्ह्यातील काही सामान्य नागरिक भेटीसाठी विमानतळावर दाखल झाले. कोविड 19 हा आजार शंभर टक्के बरा होऊ शकतो असा विश्वास नांदेड जिल्हावासियांना त्यांच्या मार्फत मिळाला आहे. मास्क व इतर सुरक्षितता जिल्हावासियांनी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
00000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...