Friday, December 23, 2016

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत
सामन्यात चुरशीचे क्षण; आज समारोप
नांदेड दि. 23 :-  औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा आज दुसरा दिवस होता. स्पर्धेत आज पुढच्या फेरीतील विविध क्रीडा प्रकारातील सामन्यात प्रतिस्पर्धी संघात चुरशीचे क्षण निर्माण झाले. त्यामुळे स्पर्धेत आज चांगलाच रंग भरला. या स्पर्धेचा उद्या शनिवारी समारोप होणार आहे. स्पर्धेत आज धावण्याच्या क्रीडा प्रकारात औरंगाबाद जिल्ह्याच्या धावपटुनी वर्चस्व राखले.   

स्पर्धेचा समारोप उद्या शनिवार 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वा. यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्यासाठी वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर प्रमुख पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट राहतील. पारितोषीक वितरण समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेचा आज दुसरा दिवस होता. संयोजन समितीच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार काही क्रीडा स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे आहेत. कॅरम एकेरी पुरुष- प्रथम क्रमांक- राजू सासणे (परभणी), द्वितीय- हणमंत वाघमारे (नांदेड). टेबल टेनिस एकेरी पुरुष- सिताराम ठेंबरे (औरंगाबाद),. टेबल टेनीस दुहेरी पुरुष- ठेंबरे आणि सबनीस (औरंगाबाद) याशिवाय टेबल टेनीस एकेरी (पुरुष), टेबल टेनीस दुहेरी (महिला) आणि मिश्र या प्रकारातही औरंगाबाद जिल्ह्याने विजेतेपद पटकाविले. तर पुरुष गटात लॅान टेनीस एकेरीमध्ये जालना जिल्ह्याने आणि दुहेरीमध्ये नांदेडने विजेते पद पटकाविले. शंभर मीटर धावणे पुरुष गट- प्रथम क्रमांक- बबन हजारे (औरंगाबाद), द्वितीय- बाळु नागरे (हिंगोली), तृतीय- शिवराज मुंडकर (नांदेड).  शंभर मीटर धावणे महिला गट- प्रथम क्रमांक – अनिता हुडे (लातूर), द्वितीय- वैशाली बारगळ (औरंगाबाद), तृतीय- रेखाताई राठोड (नांदेड). चारशे मीटर धावणे पुरुष गट- प्रथम- राजेश शिंदे (औरंगाबाद), द्वितीय- गोविंद दुगाने (परभणी), तृतीय क्रमांक विभागून- समाधान गायकवाड (जालना) आणि बाळु नागरे (हिंगोली).
समारोपासाठी खासदार अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर शैलजा स्वामी, विधानपरिषदेचे सदस्य सर्वश्री अमरनाथ राजूरकर, सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार डी. पी. सावंत, प्रदीप नाईक, वसंतराव चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, सुभाष साबणे, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, डॉ. तुषार राठोड, श्रीमती अमिता चव्हाण यांनाही विशेष निमंत्रीत करण्यात आले आहे. समारोपाच्या कार्यक्रमात सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.

000000

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...