Saturday, July 18, 2020


वृत्त क्र. 663   
नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 1.02 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात शनिवार 18 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 1.02 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 16.29 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 321.71 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 36.09 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 18 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 4.63 (390.58), मुदखेड- निरंक (248.67), अर्धापूर- निरंक (328.00), भोकर- 4.25 (341.48), उमरी- 2.67 (234.63), कंधार- 1.17 (235.34), लोहा- निरंक (321.49), किनवट- निरंक (320.10), माहूर- निरंक (313.25), हदगाव- 00.57 (311.86), हिमायतनगर- 0.33 (515.65), देगलूर- निरंक (277.77), बिलोली- निरंक (299.80), धर्माबाद- 2.67 (355.32), नायगाव- निरंक (309.40), मुखेड- निरंक (343.98). आज अखेर पावसाची सरासरी 321.71 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 5147.32) मिलीमीटर आहे.
0000



वृत्त क्र. 662   
नांदेड जिल्ह्यात आज 94 बाधितांची भर
कोरोनातून आज 7 व्यक्ती बरे तर एकाचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 18 :-  जिल्ह्यात आज 18  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार आज 94 व्यक्ती बाधित झाले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 66 तर अँटीजन टेस्ट किट तपासणीद्वारे 28 बाधित आहेत. जिल्ह्यातील एकुण 7 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. विष्णुनगर नांदेड येथील 67 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 44 एवढी झाली आहे. यात 68 मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत 6 मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण 359 अहवालापैकी 254 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 869 एवढी झाली आहे. यातील 476 एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे.  आज रोजी 349 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 27 बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात 14 महिला व 13 पुरुषांचा समावेश आहे.
आज बरे झालेल्या 7 बाधितांमध्ये नायगाव कोविड केअर सेंटर येथील 2, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 2 तसेच जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर येथील 1 संदर्भीत करण्यात आलेला एका बाधिताचा यात समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये नांदेड शहरातील आसरानगर येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, सांगवी ऑफीस कॉलनी 46 वर्षाचा 1 पुरुष, मधुबन रेसिडेन्सी येथील 48 वर्षाचा 1 पुरुष, सराफा येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर नाका येथील 52 व 55 वर्षाचे 2 पुरुष, इतवारा येथील 72 वर्षाचा 1 पुरुष, रहेमतनगर येथील 61 वर्षाचा 1 पुरुष, जुना कौठा येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, जुना मोंढा येथील 27 वर्षाचा 1 पुरुष, स्नेहनगर 52 वर्षाचा 1 पुरुष, सोमेश कॉलनी 38 वर्षाचा 1 पुरुष, गणराजनगर 48 वर्षाची 1 महिला, पांडुरंग नगर 33 वर्षाचा 1 पुरुष, सराफा बाजार येथील 3 व्यक्ती यात 9 वर्षाची 1 महिला, 28 आणि 36 वर्षाचे 2 पुरुष, सिडको येथे 31 वर्षाची 1 महिला, हैदरबाग येथील 84 वर्षाचा 1 पुरुष व 75 वर्षाची 1 महिला, पिरबुऱ्हानगर येथील 76 वर्षाचा 1 पुरुष, सरपंच नगर येथील 55 वर्षाचा 1 पुरुष व 50 वर्षाची 1 महिला, विष्णुनगर येथील 39 वर्षाचा 1 पुरुष व 67 वर्षाची 1 महिला, आदर्शनगर येथील 53 वर्षाचा 1 पुरुषा, सराफा नांदेड येथील 9,42, 55 वर्षाचे 3 पुरुष व 36 वर्षाची 1 स्त्री, शिवकृपा कॉलनी येथील 75 वर्षाची 1 महिला, स्वामी विवेकानंद येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, काबरानगर येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, गोकुळनगर येथील 64 वर्षाचा 1 पुरुष, साईनगर येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, वजिराबाद येथील 75 वर्षाची 1 महिला, फरांदेनगर येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, विष्णुपुरी येथील 22 वर्षाची 1 महिला, विसावानगर येथील 37 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर येथील 89 वर्षाचा 1 पुरुष, उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, नाथनगर देगलूर येथील 24 वर्षाचा 1 पुरुष, कंधार येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, बामणी मुखेड येथील 2, 25,25 वर्षाचे 3 पुरुष तर 19, 25, 45 वर्षाच्या 3 स्त्री, मुक्रामाबाद येथील 8, 35,60 वर्षाचे 3 पुरुष व 29 वर्षाची 1 महिला, अशोकनगर मुखेड येथील 33 व 43 वर्षाच्या 2 महिला, किनवट येथील सिद्धार्थनगरचे 65 वर्षाचे 1 पुरुष, एसबीएम कॉलनी येथील 48 वर्षाचा 1 पुरुष, एकतानगर 41 वर्षाचा 1 पुरुष, हिप्परा ता. नायगाव येथील 68 वर्षाचा 1 पुरुष, कळमनूर येथील 26 वर्षाचा 1 पुरुष, वसमत येथील 64 वर्षाचा 1 पुरुष, जिंतूर येथील 30 वर्षाची 1 महिला, गंगाखेड येथील 42 वर्षाचा 1 पुरुष, धुळे येथील 58 वर्षाचा 1 पुरुष, विष्णपुरी परिसरातील 27 वर्षाची 1 महिला आणि परळी येथील 60 वर्षाचा 1 पुरुष यांचा समावेश आहे. नांदेड शहरातील ॲन्टीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे 108 तपासणी पैकी 28 बाधित पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात प्रेमनगर येथील 6 आणि 26 वर्षाच्या 2 महिला, सरपंचनगर येथील 35 आणि 73 वर्षाचे 2 पुरुष आणि 70 वर्षाची 1 महिला, प्रकाशनगर येथील 2,22,30,35,60 वर्षाचे 5 पुरुष व 6 आणि 50 वर्षाच्या 2 महिला, चैतन्यनगर येथील 27 वर्षाचा 1 पुरुष, नंदनवन कॉलनी येथील 10 वर्षाचा 1 पुरुष, 32 व 8 वर्षाच्या 2 महिला, शक्तीनगर येथील 29 वर्षाचा 1 पुरुष, सराफा येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, मधुबन रेसिडेन्सी येथील 8,16,40 वर्षाच्या 3 महिला, विष्णुनगर येथील 22,32,52 वर्षाच्या 3 महिला, वजिराबाद येथील 18,21,42 वर्षाच्या 3 महिला व 18 वर्षाचा 1 पुरुष असे 28 पॉझिटिव्ह बाधित हे ॲन्टीजेन टेस्ट किट्स तपासणी प्रक्रियेद्वारे बाधित आढळले आहेत. एकुण बाधित हे 94 आहेत.
जिल्ह्यात 349 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 99, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 93, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 12, जिल्हा रुग्णालय येथे 19, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 12, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 29, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 18, माहूर कोविड केअर सेंटर 1, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 2, लोहा कोविड केअर सेंटर येथे 2, कंधार कोविड केअर सेंटर येथे 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 3 , खाजगी रुग्णालयात 44 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे तर निजामाबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 201,
घेतलेले स्वॅब- 9 हजार 826,
निगेटिव्ह स्वॅब- 7 हजार 873,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 94
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 869,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 8,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,
मृत्यू संख्या- 44,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 476,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 349,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 407.  
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000


जिल्हा रुग्णालयाचे प्रस्तावित संकुल
सर्व सुविधायुक्त करण्यावर भर
 - पालकमंत्री अशोक चव्हाण 
नांदेड (जिमाका) दि. 18 :- कोरोनाची परिस्थिती आजच्या घडिला पूर्ण नियंत्रणात जरी असली तरी भविष्यातील स्थितीचा विचार करुन नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जनतेला कशा उपलब्ध करुन देता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यादृष्टिने जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती ऐवजी उभारले जाणारे नवीन जिल्हा रुग्णालय हे अधिकाधिक चांगल्या सुविधांसह लवकर उपलब्ध करुन देण्यावर आमचा भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत बैठक झाली. या बैठकीत जिल्हा रुग्णालयाची नवीन संकुल अधिकाधिक चांगले कसे करता येईल याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा केली. आजच्या घडिला यातील बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या इतर इमारतीची अत्यंत दयनिय आवस्था झाली आहे. वैद्यकिय सुविधेच्यादृष्टिने त्याऐवजी नव्याने उभारले जाणारे रुग्णालय हे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अधिकाधिक चांगल्या दर्जाचे कसे होईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार थांबावा, त्याची साखळी तुटावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाला संचारबंदीचा निर्णय अत्यावश्यक वाटल्याने त्यांना तसा निर्णय घेतलेला आहे. सर्वांचे यात हित असल्याने जनतेने ही संचारबंदी अधिकाधिक कडक शिस्तीत पाळून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आजवर अतिशय चांगले सहकार्य केले असून यापुढेही कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सर्वजण आपआपली व्यवस्थीत काळजी घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...