Tuesday, July 31, 2018


"फेक न्यूज परिणाम आणि दक्षता"
विषयावर पत्रकारांसाठी आज कार्यशाळा
            नांदेड, दि. 31 :- समाज विघातक घटनांच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूजबाबत दक्षता घेण्यासाठी जनजागृती व प्रसार करण्यात येत आहे. "फेक न्यूज परिणाम आणि दक्षता" या विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा बुधवार 1 ऑगस्ट 2018 रोजी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील "चिंतन हॉल" येथे दुपारी 12 वा. आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून समाज माध्यमांवरुन येणारी फेक न्यूज कशी ओळखायची, त्याविषयी कशी दक्षता घ्यावयाची याबाबत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस जिल्ह्यातील संपादक, पत्रकार, प्रतिनिधी दूरचित्रवाणी, केबल टिव्ही, छायाचित्रकार, प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000


कापुस, सोयाबीन पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यात कापुस व सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. या पिकावरील किड संरक्षणासाठी नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी यांनी कृषि संदेश दिला आहे. 
कापुस पिकावर गुलाबी बोंडअळीसाठी कामबंध सापळे लावावे व निरीक्षण करावे. तसेच प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. अंडीपुंजी तसेच लहान अळ्या आढळल्यास नष्ट कराव्यात. निंबोळी अर्क 5 टक्के या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे.
00000


माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी
एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कार
नांदेड, दि. 31 :- एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कारासाठी  माजी सैनिक विधवा यांचे पाल्य दहावी व 12 वी परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत अशा  पात्र पाल्यांनी विहित नमुन्यातील अर्ज 31 ऑगस्ट 2018 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कार हा माजी सैनिकांच्या विधवा पाल्यामधून 10 वी 12 वी परिक्षेत राज्यात सर्वाधिक गुण प्राप्त करुन येणाऱ्या  पाल्यांना  दिला जातो.  राज्यातून  दोन माजी सैनिक विधवांच्या पाल्यांची निवड यासाठी केली जाते व त्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये अदा करण्यात येतात.  वर्ष 2017-18 मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक विधवा यांच्याकडून या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास दूरध्वनी क्र. 02462-245510 वर संपर्क करावा, असेही आवाहन केले आहे.   
000000


विशेष गौरव पुरस्कारासाठी 
माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 31 :- विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करुन राज्याची व देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे अशा  सर्व  माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांच्याकडून सन 2017-18 साठी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येते आहे.
यामधे राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नर्तन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळणारे, संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहूमोल कामगिरी करणारे आदी कार्याबद्वल सन्मानार्थ पुढील प्रमाणे एकरकमी पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह / प्रशस्तीपत्रक देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर बहूमोल कामगिरी करणा-या माजी सैनिक / पत्नी / पाल्यांना रोख 10 हजार रुपये  व आंतरराष्ट्रीय पातळीवर बहूमोल कामगिरी करुन देशाची प्रतिष्ठा वाढवतील अशा माजी सैनिक / पत्नी / पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार दिला जातो.   त्याचप्रमाणे दहावी व बारावी  परीक्षेत प्रत्येक मंडळातून 90 प्रतिशत पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येकी पहिल्या 5 माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी 10 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह / प्रशस्ती पत्रक देवून विशेष गौरव पुरस्कार दिला जातो. अशा विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांकडून विहीत नमुण्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील माजी सैनिकांनी अधिक माहिती व अर्जासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे  संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
00000


Monday, July 30, 2018


"फेक न्यूज परिणाम आणि दक्षता"
विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा
            नांदेड, दि. 30 :-  समाज विघातक घटनांच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूजबाबत दक्षता घेण्यासाठी जनजागृती व प्रसार करण्यात येत आहे. "फेक न्यूज परिणाम आणि दक्षता" या विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा बुधवार 1 ऑगस्ट 2018 रोजी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील "चिंतन हॉल" येथे दुपारी 12 वा. आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून समाज माध्यमांवरुन येणारी फेक न्यूज कशी ओळखायची, त्याविषयी कशी दक्षता घ्यावयाची याबाबत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस जिल्ह्यातील संपादक, पत्रकार, दूरचित्रवाणी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, छायाचित्रकार, प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000

Friday, July 27, 2018


सद्यस्थितीत कापसातील गुलाबी बोंडअळी ,
 रस शोषण करणाऱ्या कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन
            नांदेड, दि. 27 :- राज्या कापूस पीकाची लागवड मे महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झाली. चालु वर्षामन्सुनच्या पाऊस अपवाद वगळता जून महिण्यामध्ये जवळपास सर्वत्र झाला. त्यामुळे कोरडवाहू कापसाची लागवड जुनच्या अखेर पर्यंत झाली. मे महिण्यात लागवड झालेला कापूस सध्या पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पीकावर सद्यास्थितीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या शिवाय पूर्वहंगामी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जिनींग मिलमध्ये गुलाबी बोंडअळीचे पतंग कामगंध सापळ्यांमध्ये सापडत आहेत. त्यामुळे पाते-फुले लागण्याच्या अवस्थेत असणाऱ्या कापूस पीकावर गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गुलाबी बोंडअळी :
मागील हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या अवस्थेपासुणच झाला होता. त्यामुळे चालु हंगामामध्ये या किडीसाठी सजग राहणे आवश्यक आहे. गुलाबी बोंडअळी सुरुवातीच्या अवस्थेत पांढऱ्या रंगाची असते व जसेजशी वाढ होईल त्यानुसार अळीचा रंग गुलाबी होऊ लागतो. पाते फुले व बोंडांच्या देठाजवळ या अळीचा पतंग अंडी देतो, अंड्यातुन बाहेर निघाल्यानंतर  1-2 दिवसांत अळी फुले / बोंडामध्ये जाते. अळी बोंडामध्ये शिरल्यानंतर व्यवस्थापन करणे कठीण होते. त्यामुळे अंडी अवस्था, अळीची प्रथमावस्था व पतंग अवस्थेत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन गरजेचे आहे.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
अ) ट्रायकोकार्ड
·         अंडी अवस्थेत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकाची 1.5 लक्ष अंडी / हेक्टर पीक 45 55 दिवसाचे असतांना शेतामध्ये सोडावी. यासाठी हे परोपजीवी कीटक असलेले कार्ड (ट्रायकोकार्ड) झाडास बांधावे.
·         ट्रायकोकार्ड राष्ट्रीय कृषि प्रमुख कीड संशोधन ब्युरो, बेंगलुरु (080-23511982/98) येथे उपलब्ध आहेत.
·         या शिवाय अन्य शासकीय व खासगी संस्थांकडे उपलब्ध होतील. ट्रायकोकार्ड वरील ट्रायकोग्रामा हे कीटक अंड्यातुन बाहेर आल्यानंतर गुलाबी बोंडअळीच्या अंड्यावर उपजिवीका करतात. त्यामुळे गुलाबी बोंडअळीची अंड्यापासुण उत्पत्ती कमी होते.
ब) निंबोळी अर्क
·         अंडी व लहान अळीचे व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. त्यामुळे अंड्यातुन अळी बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते. अंड्यातुन बाहेर निघालेली अळी निंबोळीचा वास व चवीमुळे खाणे थांबविते. त्यामुळे त्यांच्या संख्येत घट होते.
·         निंबोळी अर्क तयार करण्यासाठी 5 किग्रॅ निंबोळी 10 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजवावी. निंबोळी युक्त द्रावण गाळुन हे द्रावण 100 लिटर होईपर्यंत पाणी टाकावे. अशाप्रकारे तयार केलेल्या निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी लगेच करावी.
·         बाजारातुन निंबोळी तेल घेतल्यास त्यातील घटकाच्या प्रमाणानुसार (300 पीपीएम - 75 मिली, 1500 पीपीएम – 50 मिली, 3000 पीपीएम – 25 मिली व 10000 पीपीएम – 10 मिली) फवारणीसाठी मात्रा वापरावी.
क) कामगंध सापळे
·         गुलाबी बोंडअळीची नुकसानीची पातळी समजण्यासाठी आणि पतंगांची संख्या कमी करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
·         आर्थिक नुकसानीची पातळी समजण्यासाठी प्रति हेक्टर 5 सापळे (एकरी 2) पीकाच्या उंचीपेक्षा 1 फुट उंच बांधावे.
·         एका सापळ्यामध्ये आठ पतंग याप्रमाणे सलग तीन दिवस आढळल्यास गुलाबी बोंडअळीची आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असे गृहित धरुन व्यवस्थापनाचे उपाय अवलंबावे.
·         अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडुन त्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रति हेक्टरी 40 (एकरी 16) कामगंध सापळे कापसामध्ये लावावे. जेणेकरुन जास्तीत जास्त नर पतंग कामगंध सापळ्यांमध्ये पडतील व अळ्यांची पुढील उत्पत्ती कमी होईल.
·         याचबरोबर प्रकाश सापळ्यांचा वापर करुन देखील पतंगांची संख्या कमी करता येईल.
ड) कीटकनाशकाचा वापर
·         गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहण्यासाठी पीकामध्ये सर्वेक्षण करावे यासाठी विखुरलेल्या पध्दतीने फुले / बोंडामध्ये अळीची पाहणी करावी. जर 10 टक्के पेक्षा अधिक प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावे.
·         यासाठी प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी 20 ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची साध्या पंपासाठी प्रति 10 लिटर पाणी या मात्रेत फवारणी करावी.
·         ऑक्टोबर नंतर गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी स्पिनोसॅड 45 एससी 4 मिली किंवा फेनवलरेट 20 ईसी 6 मिली या कीटकनाशकाची फवारणी करावी.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन कोणत्याही एकाच प्रकारे करणे शक्य नाही. म्हणून गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी वरीलप्रमाणे सर्व प्रकारे एकात्मिक पध्दतीने सामुदायीक रित्या करणे आवश्यक आहे.
रस शोषण करणाऱ्या कीडी :
सध्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पाने पिवळसर होऊन त्यानंतर कडा विटकरी रंगाच्या झाल्याचे आढळून येत आहे. काही ठिकाणी पिवळसर हिरव्या रंगाच्या मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन : तुडतुडे, मावा व फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी साध्या पंपाकरीता 5 टक्के निंबोळी अर्क किंवा असिटामिप्रीड 25 एसपी 2 ग्रॅम किंवा थायामिथाक्झाम 25 डब्ल्युपी 2.5 ग्रॅम किंवा फ्लोनिकामीड 50 डब्ल्युपी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पावरस्प्रेचा वापर करावयाचा असल्यास किटकनाशकाचे प्रमाण तिनपट वापरावे, असे कापूस विशेषज्ञ, कापूस संशोधन केंद्र, नांदेड यांनी कळविले आहे.
000000


कर्ज वाटपासाठी धडक मोहिम राबविण्याचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आदेश
नांदेड, दि. 27 :- सद्यस्थितीत पीक कर्ज वाटपाच्या एकूण उद्दिष्टापैकी केवळ 20 टक्के कर्ज वाटप साध्य झाल्याने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. कर्ज वाटप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी अभियान स्वरुपात धडक मोहीम राबविण्यासाठी सर्व तहसील कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या पालक अधिकाऱ्यांना 30 जुलै ते 1 ऑगस्ट 2018 या तीन दिवसात त्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाप्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे.
पालक अधिकाऱ्यांनी बँकेकडे जमा केलेल्या कर्ज मागणी अर्जानुसार बँक शाखेकडून कर्ज वाटप केले जात आहे किंवा नाही याचा दैनंदिन आढावा घेण्याचे सर्व तहसीलदारांना दररोज पालक अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्याबाबत आदेशीत करुन संबंधित तालुक्यातील कोणीही मागणी करणारा पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्याना शासन कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप  हंगाम 2018 साठी बँकांनी पीक कर्ज त्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावरुन सूचना आहेत पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे स्तरावर सर्व बँकांच्या कर्ज वाटप प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे.
पालक अधिकाऱ्यांनी या तीन दिवसात आवश्यकतेनुसार गावाशी संबंधित बँकेकडून कर्ज मागणी अर्ज पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेणे शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना कर्ज मागणी अर्ज पुरवून कर्ज मागणी अर्ज भरकरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे तसेच शेतकऱ्यांचे कर्जमागणीचे परिपूर्ण अर्ज भरुन घेऊन संबंधित बँकेकडे जमा करुन संबंधित बँक शाखा व्यवस्थापकाकडून दिलेल्या अर्जाची पोहोच प्राप्त करुन घेण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी आदेशीत केले आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000


वाहनधारकाचे अर्ज, वाहनाचा कर
1 ऑगस्ट पासून ऑनलाईन
नांदेड , दि. 27 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयात येत्या 1 ऑगस्ट पासून वाहनधारकाचे सर्व अर्ज व परिवहन संवर्गातील वाहनांचा कर ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहे. ज्या वाहनांची वाहन 4.0  प्रणालीवर नोंद घेण्यात आली आहे अशा वाहन धारकांना त्यांचा वाहनाचा कर भरणा तसेच इतर अर्ज parivahan.gov.in/vahanservice या संकेतस्थळावर किंवा नजीकच्या नागरी सेवा केंद्र येथे करता येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 
कुठल्याही स्वरुपाचे हस्तलिखीत अर्ज स्विकारण्यात येणार नाही. ज्या वाहनांची अद्यापही वाहन 4.0 या ऑनलाईन प्रणालीवर बॅकलॉग नोंद घेण्यात आली नाही अशा  वाहनांचे सर्व वैध कागदपत्रे, वाहन मालकाचा मोबाईल क्रमांक व आधार कार्ड इत्यादी कागदपत्रासह कार्यालयात त्वरीत सादर करण्यात यावी. वाहनधारकांने कागदपत्रे कार्यालयात सादर केल्यानंतर सात दिवसात वाहनांची बॅकलॉग नोंद वाहन 4.0 प्रणालीवर घेण्यात येऊन अशी प्रकरणे निकाली काढण्यात येतील. याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिहवन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


दारु दुकाने बंद
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात बुधवार 1 ऑगस्ट 2018 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्याअर्थी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवून अनुचित प्रकार घडणार नाही. त्यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 149 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी 1 ऑगस्ट 2018 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल / बीआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.                              
0000000


शासकीय वसतिगृहात
अर्ज करण्यास मुदतवाढ 
नांदेड, दि. 27 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील मुला-मुलींसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहातील इयत्ता दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) रिक्त जागेवर प्रवेश देण्यासाठी संबंधीत तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय वसतिगृहात अर्ज सादर करण्यासाठी सोमवार 20 ऑगस्ट 2018 रोजी पर्यंत मुदत देण्यात आली होती.
वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशान्वये कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरु झाले असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश तातडीने व्हावे, यादृष्टिने अर्ज सादर करण्याची मुदत कमी करुन 22 जुलै पर्यंत करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातून अर्ज घेऊन गेले व अद्याप संबंधीत वसतिगृहास सादर केले नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ संबंधीत वसतिगृहास अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
0000000


राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत
लाभ मिळण्याबाबत अडचणी असल्यास
तक्रार नोंदविण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 27 :-  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत स्वस्त धान्य दुकान, शालेय पोषण आहार, महिला व बालविकास योजनेत लाभार्थ्यांना लाभ मिळण्याबाबत काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तक्रारी बाबत नागरिकांनी व लाभार्थ्यांनी नोंद करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांनी केले आहे.  
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्यादृष्टिने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा शासन निर्णय दि. 7 एप्रिल 2017 अन्वये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या अधिनियमांची अंमलबजावणी योग्यरित्या पार पाडण्याच्यादृष्टिने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 च्या कलम 15 अन्वये अधिनियमातील प्रकरण दोन अन्वये हक्क असलेले अन्नधान्य किंवा आहार यांच्या वितरणासंबंधीच्या बाबीमध्ये व्यथित झालेल्या व्यक्तीची (लाभार्थांची) तक्रार शिघ्र व प्रभावीरितीने दूर करण्यासाठी आणि या अधिनियमानुसार हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याकरीता जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नांदेड हे जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त असतील. त्यांच्या अधिनस्त एक कक्ष / समिती निर्माण करण्यात आली आहे. त्यासाठी rajyaannaayog@gmail.com, dsonanded2@gmail.com दूरध्वनी क्रमांक (02462) 232521 यावर संपर्क करावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

Wednesday, July 25, 2018


स्वभावासाठी औषध
                         आरोग्यम धनसंपदाकिंवाहेल्थ इज वेल्थया सुविचारांची आपल्याला लहाणपणापासुन ओळख असते.पण खरोखरचं आपण ते सुविचार समजून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आत्मसात करतो का,याचा विचार करण्याची गरज आहे. कारण आधुनिक काळात अनेक प्रकारच्या वाढलेल्या स्पर्धा विविध विवंचनांमुळे आपले मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे .तसेच धावपळ , ताण  , सतत कामाचा दाब यामुळे शरीर मनावर विपरीत परिणाम होतात . सतत चिंता लागणे , खिन्नता वाटणे , विनाकारण चिडचिड होणे , राग येणे किंवा संताप होणे , मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी कितीही प्रयत्न केला तरी मनातुन जाणे , काळजी  इत्यादी मानसिक लक्षणे आपल्या आसपासच्या लोकांमध्ये बरेचदा बघायला मिळतात . हि लक्षणे काही गंभीर मानसिक आजार दर्शवितात किंवा  अशा मानसिक आजारांची सुरूवात असू शकतात . कधीकधी  अशी लक्षणे त्यांच्या आयुष्याचा भागच बनुन जातात  - त्यांच्याही नकळत आणि मग अशा वेळी त्यावर उपाय करणे तर सोडाच त्याची जाणिवही त्या व्यक्तीला होत  नाही . एखाद्या गोष्टी बद्दल अतिशय चीड /राग  / संताप येणे , सतत चिंता करणे , भुतकाळात अति रममाण होणे , अकारण भिती वाटणे , आत्मविश्वास कमी असाणे , व्यसनी बनणे , विनाकारण संशय घेणे , कुठलेही नविन काम सुरू करण्यापूर्वी साशंक होऊन ते पुढे ढकलणे , एकलकोंडेपणा तसेच कधीकधी दुसऱ्या वर प्रमाणाबाहेर अवलंबून राहणे , इतरांपासून लपवाछपवी करण्याची प्रव्रुत्ती इत्यादी लक्षणे मानसिक आरोग्य बिघडल्याची निर्देर्शक आहेत .
            वरिल काही लक्षणे सामान्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग झाला असल्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या परिवारातील लोकांच्या लक्षातही येत नाही .जेव्हा  कधी घरातील सदस्य / मित्र परिवार त्यांच्या अशा वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करतात, तेव्हा त्या व्यक्ती म्हणतात कि मलाही कळतं, सगळं पण वळतं नाही  किंवा काय करू स्वभावाला औषध नाही . पण आता जर खरोखरच एखाद्याची ईच्छा असेल तर त्याला त्याच्या स्वभावावरुन औषध देता येईल त्याच्या स्वभावातील नकारात्मक गोष्टी काढून योग्य तो सकारात्मक बदल त्याच्या स्वभावात करणे शक्य आहे . कसे ???  बाख फ्लॉवर रेमिडीज म्हणजे पुष्पौषधीं द्वारे , डॉ एडवर्ड बाख , लंडन येथील सुक्षम जिवशास्त्रञ यांनी 1930  साली बाख फ्लावर रेमिडीज म्हणून एक औषध पद्धती सुरू केली.
            डॉ बाख हे उच्चविद्याविभुषित होते . MBBS केल्यानंतर त्यांनी त्या काळातील  MRCS , LRCP तसेच DPH ( केंब्रिज) या पदव्या  मिळवल्या . परंतु ते संशोधक वृत्तीचे असल्याने त्यांनी त्यांची ॲलोपॅथिक वैद्यकाची प्रॅक्टिस सोडून दिली 1930 साली वनस्पतींच्या फुलांपासुन औषधे वापरण्याची पद्धत सुरू केली. यालाच बाख फ्लॉवर रेमिडीज किंवा पुष्पौषधी म्हणतात.                  
            डॉ बाख यांच्या औषधींची संख्या 38 असुन यामध्ये रानफुले , झुडपे , वृक्षांची फुले यांचा समावेश होतो.  यापैकी कोणतेही औषध अपायकारक नसून त्यांची सवयही लागत नाही . मानसिक शारीरिक अशा दोन्हीही रोगप्रकारांवर त्यांचा चांगला उपयोग होतो ,असा डॉ बाख यांचा प्रयोगसिद्ध अनुभवसिद्ध दावा आहे. डॉ बाख यांनी त्यांच्या "बारा गुणकारी औषधे इतर औषधे " या पुस्तकात 38 पुष्पौषधींच्या गुणधर्मांची माहिती देऊन मनाच्या सात अवस्थांचे वर्णन केले आहे .मनाच्या या सात अवस्था  खालील प्रमाणे आहेत.
1.भिती,
 2.अनिश्चितता,
3.सद्यस्थितीत रस वाटणे, 
 4.एकटेपणा/एकाकीपणा                                    
  5.कल्पना जास्त करणे आजुबाजुच्या परिस्थितीस जास्त संवेदनशील असणे             
  6.नैराश्य अथवा विषण्ण मनस्थिती  
 7.दुसऱ्याचे भले होण्याविषयी  जादा  काळजी करण्याचा स्वभाव                          
              डॉ  बाख यांनी भितीच्या प्रकारांवर 5 औषधे वर्णन केली आहेत - धास्ती वाटणे , अकल्पित भीती द्यात भीती , मानसिक भीतीने तोल सुटणे , घराबाहेरील लोकांची भिती वाटणे हे भीतीचे 5 प्रकार असून यासाठी 5 पुष्पौषधी देऊन भीती घालवता येते . इतर औषधी सोबतच (ॲलोपॅथिक / होमियोपॅथिक/आयुर्वेदीक/ युनानी ) ही औषधे घेतले तरी चालेल. आत्मविश्वास कमी असल्याने कुणी निर्णय घेउ शकत नाही  किंवा मनाच्या चलबिचल अवस्थेला कंटाळून जर निर्णय घेणे जमत नसेल तर अशा लोकांना बाख फ्लॉवर रेमिडीजने फायदा होतो .                                      
            स्वतः साठी बाख यांची औषधे घेण्याने तर विशेष फायदा होतो , कारण आपल्या मानसिक शारीरिक अवस्थांची आपल्याला जास्त जाणीव असते. अतिशय थकवा आल्यास कसे वाटते ? मनासारखे झाल्यास कशी  चिडचिड  होते किंवा तसे व्हायला उशिर झाल्यावर आपण कसे अधीर होतो  ? तातडीच्या गंभीर प्रसंगी मनःस्थिती कशी असते ? हवेत बिघाड  झाल्यास मन कसे उदास वाटते ,वगैरेची जाणीव आपल्याला लगेच होते. आपल्या मनाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये योग्य त्या बाख फ्लॉवर रेमिडीजचा वापर करुन बिघडलेल्या मानसिक स्थितीला लवकरच पुर्ववत करण्यासाठी ही औषधे खुप उपयोगी पडतात. स्वतःच्या मनःस्थितीचे निरीक्षण करुन तज्ञांच्या सल्ल्याने औषध सुरु करुन काही आठवडे / गरजेनुसार  औषध घेतल्यास नक्कीच फायदा होतो .                                             
            रोग होऊ नये म्हणून बाख फ्लॉवर रेमिडीजचा प्रतिबंधक औषध म्हणूनही उपयोग होतो . प्रतिबंधक औषधांचा वापर करताना व्यक्तीच्या मनाची अवस्था हाच केंद्रबिंदू लक्षात घेऊन औषधांची निवड करावी असे डॉ बाख यांनी सांगितले .व्यक्तीचा भावनात्मक समतोल बिघडला की शारीरिक लक्षणे त्यानंतर निर्माण होतात . तेव्हा नेहमीच मानसिक अवस्थांचा समतोल राखल्यास नंतरचा शारीरिक आजार होणारच नाही , असे डॉ बाख यांचे मत आहे .दुर्दैवाने मनाच्या अवस्थांकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही  असे दुर्लक्ष केल्याने शारीरिक त्रास सुरू होतात आणि त्यावर औषधे घेतली जातात . आपल्यातील दोष आपल्याला माहिती असतात , त्यांचे आपण जतन करतो परंतु प्रक्रुती  निरोगी ठेवणारी डॉ बाख यांची औषधे  त्यांच्यावर दिली पाहिजे हे अनेकांना माहित नसते. भीती , राग , मत्सर , ईर्ष्या  वगैरे मनोवृत्ती लहान वयापासूनच असतात  तेव्हा प्रथम पासूनच ही औषधे दिल्यास व्यक्ती  निरोगी सशक्त होईल . मला काही होत नाही  असे म्हणणारे अनेकजण असतात . ते मानसिक दडपणाखाली असल्याचे आढळते  त्यांच्या मनोवेदना शारीरिक वेदनांपेक्षाही अधिक तीव्रतेच्या असतात , कारण वैचारिक वेदना या शारीरिक वेदनेपेक्षा नेहमीच जास्त त्रासदायक / वेदनादायक असतात . कामाचे  दडपण   घेऊन जर कोणी काम करत असेल किंवा आपल्याला आवडणारे काम करावे लागले तर त्यामुळे थकवा येणे , निरुत्साही होणे किंवा चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात .तेव्हा कुठल्याही प्रकारचा ताण घेता / लाज बाळगता योग्य त्या बाख फ्लॉवर रेमिडीजचे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सेवन करावे आपल्या जीवनातील समस्या / प्रश्न यांना  आत्मविश्वासाने सामोरे जावे .....पटतंय ना ? प्रथम  आपल्याला काही तरी समस्या आहे हे आपल्याला पटलं तर त्यानंतरच ती समस्या सोडवण्याच्या दिशेने योग्य त्या उपायापर्यंत आपण पोहचु शकतो.योग्य त्या उपायांमुळे अमूल्य असलेले आपले जीवन अधिक आनंदी ,समाधानीपणे जगतं आपल्यासह इतरांना ही आनंदी ठेवू शकतो.त्यामुळे चला स्वतःला वेळ देऊ या, आरोग्यसंपन्न जीवनशैली आत्मसात करु या आवश्यक तेथे बाख फ्लॉवर रेमिडीज तुमच्या सहाय्यासाठी आहेच.
-         डॉ.हेमा थोरात,(होमिओ तज्ञ)
      औरंगाबाद.

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...