Saturday, February 25, 2023

 नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाची नुतन इमारत सुविधेची आदर्श मापदंड ठरेल*

- न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी
▪️प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या नेतृत्वाचा गौरव
▪️सर्वात मोठे न्यायालय म्हणून गणलेल्या नांदेडसाठी आता सुसज्ज न्यायालय
नांदेड, (जिमाका) दि. 25 :- नांदेड जिल्ह्याच्या न्यायालयीन सुविधेच्यादृष्टिने आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा आहे. बिलोली येथील न्यायालायाचे उद्घाटन तर नांदेड जिल्हा न्यायालयासाठी बहुप्रतिक्षेत असलेल्या सुसज्ज इमारतीचे आज भूमिपुजन करण्यात आले आहे. स्थापत्य शास्त्राच्यादृष्टिने ही या इमारतीचा आराखडा जेवढा कल्पक आणि आकर्षक करण्यात आला आहे त्याचप्रमाणात न्यायालयीन सुविधेच्यादृष्टिने ही इमारत एक आदर्श मापदंड ठरेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती नितीन सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.
नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायलायाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरण व भुमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश वि. न्हावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड वसंतराव साळुंके, जिल्हा न्यायाधीश-1 शशिकांत ए. बांगर, अभिवक्ता संघ नांदेडचे अध्यक्ष ॲड सतीश पुंड, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश देवसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यादृष्टिने वकीलसंघ, सध्या कमी जागेत सुरू असलेले न्यायालय व यात न्यायालयीन कामकाज करतांना सुविधेच्यादृष्टिने अडचणी स्वाभाविक आहेत. परंतू या अडचणीवर मात करण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर हे सक्षम नेतृत्व नांदेड जिल्ह्याला आहे. कोणाच्या काही अडचणी असतील तर त्या त्यांच्याकडे गेल्यास ते निश्चित मार्गी लावतील या शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला.
सन 1931 मध्ये नांदेड जिल्ह्यात न्यायालयाची पहिली इमारत झाली. त्यानंतर 1979 मध्ये व नंतर 1988 मध्ये यात वाढ करण्यात आली. सद्या अस्तित्वात असलेली न्यायालयीन इमारत व संकुल हे अत्यंत अपुऱ्या जागेत कार्यरत आहे. या अपुऱ्या जागेत 21 न्यायालय कार्यान्वित आहेत. सद्यस्थितीत 33 न्यायालये तर भविष्यात 50 न्यायालयीन कक्षाची आवश्यकता असणार आहे. यादृष्टीने नांदेड जिल्ह्याला न्यायालयीन कामकाज सुरळीत चालून सर्वसामान्यांना चांगली न्यायालयीन सुविधा मिळण्याच्यादृष्टिने नव्या संकुलाची अत्यंत आवश्यकता होती. यादृष्टिने कौठा (मौजे असर्जन) येथे हे भव्य न्यायालयीन संकुल लवकरच बांधून पूर्ण होईल असा विश्वास प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर यांनी व्यक्त केला.
या नवीन इमारतीचे एकुण क्षेत्रफळ हे 26 हजार 515 चौ.मीटर असणार आहे. यात सुसज्ज वाहनतळ, पहिल्या मजलावर अधिवक्ता हॉल, कार्यालय, वाचनालय, हिरकणी कक्ष, महिलांसाठी स्वतंत्र अधिवक्ता हॉल असा सुविधा राहतील. दुसऱ्या मजल्यावर एकुण 7 कोर्ट हॉल, तिसऱ्या मजल्यावर एकुण 8 कोर्ट हॉल, चौथ्या मजल्यावर 8 कोर्ट हॉल, पाचव्या मजल्यावर 8 कोर्ट तर सहाव्या मजल्यावर दोन कोर्ट हॉल असतील. यात न्यायालयीन गरजेनुसार ज्या-ज्या बाबी अधोरेखीत करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व बाबींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. ही कोर्ट सुविधा यात असेल. याचबरोबर पक्षकारांना उत्तम न्यायाची परंपरा व गुणवत्ता कायम राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सन 1997 मध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वात प्रथम संगणक वापर सुरू झाला. आज याचे व्यापक स्वरुप झाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्वांसाठी डेटा हा महत्वाचा भाग आहे. यात ई-फाईलींगची सुविधा पक्षकारांपासून न्यायालयापर्यंत अत्यंत सुविधेची आहे. यात जलद न्यायाची अपेक्षा पूर्ण होईल यादृष्टिकोनातून अधिवक्ता संघाने ई-फाईलींग स्वीकृती बाबत जो व्यापक विचार ठेवला त्याबद्दल मी त्यांचे
अभिनंदन
करतो असे न्हावकर यांनी सांगितले. भविष्यात याची उपयुक्तता अनुभवातून कळेल. आपल्या साध्या रोजच्या डेली बोर्डसाठी 16 तासाचे मनुष्यबळ लागायचे. तेच आता अवघ्या एकातासावर आले आहे. 15 तासांची यात बचत आहे, असे सांगून त्यांनी ई-न्यायालयाची अत्यवश्यकता व महत्त्व विषद केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने अवघ्या काही महिन्यात एकुण 243 उपक्रम घेतल्याबद्दल त्यांनी या कार्याचे कौतूक केले. न्याय सबके लीए यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे त्यांनी सांगितले. ॲड वसंतराव साळुंके यांनी यावेळी आपले मनोगत मांडले. न्यायालीयन कामकाजाचा कायापालट भविष्याचा वेध या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
00000























वृत्त क्रमांक 91

 जिल्‍हास्‍तरीय कृषि महोत्‍सवात जास्तीत जास्त

शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

नांदेड, (जिमाका) दि. 25 :-  मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त व आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष 2023 चे औचित्‍य साधून कृषि विभाग व आत्‍मा यांच्या संयुक्‍त विद्यमाने नांदेड जिल्‍हा कृषि महोत्‍सवाचे’’ आयोजन 1 ते 5 मार्च 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. या महोत्‍सवास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा तसेच जास्तीत जास्त ग्राहकांनी शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

या महोत्सवाचे आयोजन सकाळी 10 ते सायं. 8 वाजेपर्यंत कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीनवा मोंढानांदेड येथे करण्‍यात येणार आहे. या कृषि महोत्‍सवात शासकीय 30 स्टॉल, कृषि निविष्ठा 20 स्टॉल, कृषि तंत्रज्ञान व सिंचन 20 स्टॉल, खाद्य पदार्थ 20 स्टॉल, कृषि प्रक्रिया 10, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला बचत गट 100 स्टॉल असे एकुण 200 स्‍टॉल उभारण्‍यात येणार आहेत.कृषि तंत्रज्ञान व सिंचन,कृषि निविष्ठा या खाजगी स्टॉलसाठी नाममात्र रु.5000 भाडे आकारण्यात येणार आहे.तसेच शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,महिला बचत गट,शासकीय व निमशासकीय कार्यालये यांच्यासाठी  स्टॉल नि:शुल्क आहेत.

 

शासकीय स्‍टॉल बुकिंगसाठी एस.बी.बोरा मो.क्र.9422752817, कृषि निविष्ठा साठी श्री.हुंडेकर मो.क्र.9049150631, कृषि तंत्रज्ञान व सिंचन व्ही.जे.लिंगे मो.क्र.7066105384, शेतकरी गट व उत्पादक कंपनी साठी श्रीहरी बिरादार मो.क्र.8275556316 व महेश तहाडे मो.क्र.9923405166 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक 90

 बिलोली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

सर्व सोयी-सुविधांमुळे सर्वांच्या सहकार्यातून न्यायदानाचे कार्य अधिक गतीमान होईल
- न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी
नांदेड, (जिमाका) दि. 25 :- बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीत न्यायदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या सुसज्ज व सुदंर इमारतीत सर्वांच्या सहकार्याने चांगल्या वातावरणात न्यायदानाचे काम पार पडणार आहे. आधुनिक सोयी-सुविधांमुळे कामाचा दर्जा अधिक वाढणार असून न्यायदानाचे कार्य अधिक गतीमान होईल, असे प्रतिपादन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी केले. बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर, धुळयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आरेफ महमद साहेब, बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर, न्यायाधीश श्रीमती रामगडीया, उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व सदस्य बी.डी. साळुंखे, बिलोली अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार पाटील, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव न्यायालयातील विधीज्ञ, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, पक्षकार आदीची उपस्थिती होती. यावेळी न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते जेष्ठ विधीज्ञाचा सत्कार करण्यात आला.
बिलोली जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य व सुसज्ज इमारतीचे क्षेत्रफळ 1912.91 चौ मीटर असून यात दोन मोठे कोर्ट हॉल, लोकअदालतीसाठी एक कोर्ट हॉल, दोन अभिलेख कक्ष दिवाणी व फौजदारी संचिकेकरीता, वित्त विभाग स्ट्रॉग रूम, मुद्देमाल कक्ष, महिला अभिवक्ता हॉल, कॅटींग, फायर सेफ्टी सिस्टिम, हायजेनिक सॅनिटरी सिस्टिम, सीसीटीव्ही, गार्डन, वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम, सोलार सिस्टिम आदी सोयी सुविधांनीयुक्त प्रशस्त अशा इमारतीचे अवलोकन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी केले. वकील व न्यायाधीश या नाण्याच्या दोन बाजू असून एकमेकांच्या सहकार्याशिवाय न्यायदानाचे काम अपूर्ण असून जेष्ठ विधी ज्ञानाच्या मार्गदर्शनाने न्यायदानाचे हे काम अधिक कार्यक्षमतेने करावे. तसेच न्यायालयीन कामकाज सुसह्य होण्यासाठी न्यायालयीन प्रशासन सर्व ते सहकार्य करेल असेही न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी सांगितले.
हे न्यायालय उभारणीत अनेकांचे श्रेय असून अंदाजे 9 कोटी रुपये खर्च करुन ही आधुनिक इमारत सर्व सुविधेसह उभारली आहे. सध्या न्यायालयीन कामकाजात ई-कोर्ट सुविधा आली असून ई-कोर्ट सुविधा विधीज्ञांनी स्विकारली पाहिजे. त्यामुळे न्यायदानाचे काम कमी मनुष्यबळात व कमी वेळेत पार पडेल. तसेच वकीलांना स्वत:च्या कामकाजाची दैनंदिनी तयार होईल. हा बदल सर्वांनी सकारात्मकतेने स्विकारला पाहिजे. या बदलाची प्रक्रिया समजून घेतल्यास ज्ञान वृद्धी होवून याचे फायदे समजतील. येत्या 5 मार्चला याबाबत सर्व विधीज्ञासाठी प्रशिक्षण ठेवले असून अभिवक्त्यांनी या प्रशिक्षणाचा उर्त्स्फूतपणे लाभ घ्यावा असे आवाहन प्रमूख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर यांनी केले. नांदेड न्यायालयात 1276 प्रकरणे ई-फायलिंग झाले आहे. समाजातील सर्वासाठी न्याय ही संकल्पना असून अंतिम घटकापर्यंत न्याय पोहचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही प्रमूख जिल्हा न्यायाधीश श्री. न्हावकर यांनी सांगितले.
बिलोली न्यायालयाच्या कामकाजाचा विस्तार अधिक असून या नवीन इमारतीत संपूर्ण सुविधा उपलब्ध प्राप्त असल्यामूळे कामकाज अधिक गतीमान होवून सामान्य माणसाला सुलभपणे न्याय मिळण्यास मदत होईल. सध्या सर्व न्यायालयात प्रक्रीयेत ई-फायलिंगचे काम सुरु आहे. यासाठी सर्व तांत्रिक सुविधा मिळेपर्यत ऑॅनलाईन आणि ऑफलाईन काम सुरु असावे असे महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य बी.डी. साळुंखे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश कोठलीकर यांनी सर्वाचे आभार मानले.
सुरवातीला बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात मान्यवंराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. बिलोली अभियोक्ता संघाचे ॲड. शिवकुमार नागनाथराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन न्यायाधीश श्रीमती हरणे मॅडम यांनी केले. तर आभार जिल्हा न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी मानले.
00000






  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...