Saturday, February 25, 2023

वृत्त क्रमांक 91

 जिल्‍हास्‍तरीय कृषि महोत्‍सवात जास्तीत जास्त

शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

नांदेड, (जिमाका) दि. 25 :-  मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त व आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष 2023 चे औचित्‍य साधून कृषि विभाग व आत्‍मा यांच्या संयुक्‍त विद्यमाने नांदेड जिल्‍हा कृषि महोत्‍सवाचे’’ आयोजन 1 ते 5 मार्च 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. या महोत्‍सवास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा तसेच जास्तीत जास्त ग्राहकांनी शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

या महोत्सवाचे आयोजन सकाळी 10 ते सायं. 8 वाजेपर्यंत कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीनवा मोंढानांदेड येथे करण्‍यात येणार आहे. या कृषि महोत्‍सवात शासकीय 30 स्टॉल, कृषि निविष्ठा 20 स्टॉल, कृषि तंत्रज्ञान व सिंचन 20 स्टॉल, खाद्य पदार्थ 20 स्टॉल, कृषि प्रक्रिया 10, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला बचत गट 100 स्टॉल असे एकुण 200 स्‍टॉल उभारण्‍यात येणार आहेत.कृषि तंत्रज्ञान व सिंचन,कृषि निविष्ठा या खाजगी स्टॉलसाठी नाममात्र रु.5000 भाडे आकारण्यात येणार आहे.तसेच शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,महिला बचत गट,शासकीय व निमशासकीय कार्यालये यांच्यासाठी  स्टॉल नि:शुल्क आहेत.

 

शासकीय स्‍टॉल बुकिंगसाठी एस.बी.बोरा मो.क्र.9422752817, कृषि निविष्ठा साठी श्री.हुंडेकर मो.क्र.9049150631, कृषि तंत्रज्ञान व सिंचन व्ही.जे.लिंगे मो.क्र.7066105384, शेतकरी गट व उत्पादक कंपनी साठी श्रीहरी बिरादार मो.क्र.8275556316 व महेश तहाडे मो.क्र.9923405166 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...