Thursday, June 15, 2023

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी नामांकित निवासी शाळेत

प्रवेशासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे सन 2023-24  मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याबाबत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी 30 जून 2023 पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बापू दासरी यांनी केले आहे.

धनगर व त्यांच्या उपजाती समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये परीपूर्ण अर्ज भरून प्रवेश द्यावा. यासाठी नामांकित शाळेचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. राजश्री पब्लिक स्कूल, वसरणी, लातूर रोड नांदेड येथे 100 मान्य विद्यार्थी संख्या, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, मालेगाव ता. अर्धापूर जि. नांदेड 100 मान्य विद्यार्थी संख्या, लिटील स्टेप इंग्लिश मेडीयम स्कूल, नायगाव (खै,) जि. नांदेड 100 विद्यार्थी संख्या, शंकरराव चव्हाण इं.स्कूल, दत्तनगर, नांदेड 100 विद्यार्थी संख्या या शाळेचा समावेश आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावाअसे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बापू दासरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 मागासवर्गीय विकास महामंडळाच्या

विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 15 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कृषी संलग्नलघु उद्योगसेवा उद्योग इत्यादी नवीन व्यवसाय किंवा व्यवसाय वाढीसाठी वित्त पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.

इतर मागास वर्गीय प्रवर्गातील इच्छुक व गरजू व्यक्तींनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाचा दूरध्वनी 02462-220865 या क्रमांकावर किंवा www.msobcfdc.org या वेबसाईटला भेट द्यावीअसे आवाहन जिल्हा व्यवस्थापकमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेड यांनी केले आहे.

बीज भांडवल कर्ज योजना

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करण्यात येईल. महामंडळाचा सहभाग 20 टक्केलाभार्थी सहभाग टक्के व बँकेचा सहभाग 75 टक्के राहील. महामंडळाच्या रक्कमेवर द.सा.द.शे. टक्के व्याज दर असून परतफेडीचा कालावधी वर्षे आहे. बँकेच्या रक्कमेवर बँक नियमानुसार व्याज दर आकारण्यात येईल.

थेट कर्ज योजना थेट कर्ज योजना

महामंडळाकडून व्यवसायानुसार महत्तम एक लक्ष रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेत लाभार्थी सहभाग नाही. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. नियमित हजार 85 रुपये 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज द्यावे लागणार नाही परंतू थकीत झालेल्या हप्त्यांवर दसादशे टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना

गरजू व कुशल व्यक्तींना व्यवसायाकरिता बँकेमार्फत वैयक्तिक कर्ज देण्यात येते. व्यवसायानुसार कर्ज रक्कम ते 10 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत कर्ज देण्यात येते. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम महत्तम 12 टक्क्यांच्या मर्यादित व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रामाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थीने ऑनलाईन वेबपोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या निकषांनुसार वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगटभागीदारी संस्थासहकारी संस्थाकंपनी अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्था बँकेतर्फे स्वयंरोजगारउद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळकडून अदा करण्याची ही योजना आहे. 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

उच्च शिक्षणासाठी राज्यदेशाअंतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थींनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे. अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इमाव  प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावाअसे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

 शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट

दुचाकी वाहन चालविल्यास होणार कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-

शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याचे  निदर्शनास आले आहे. वाहन चालविताना हेल्मेट वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार  कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.


बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात.. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक जनजागृती  अंमलबजावणी संबंधी व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आलेल्या नागरिक कर्मचारी अधिकारी यांचेवर मोटार वाहन कायद्यातर्गंत मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 194 डी मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती  देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतुद आहे. शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या  नागरिक कर्मचारी अधिकारी यांनी दुचाकी वाहन चालवितांना स्वत:च्या सुरक्षिततेच्या आणि मोटार वाहन कायद्यानुसार होणारी कारवाई टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा, असेही प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

 पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या

हलक्या व जड वाहनांना पथकरातून सूट

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-आषाढी एकादशी निमित्त 3 जुलै 2023 पर्यत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. यासाठी विहित नमुन्यात सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहेत. हे सवलत प्रवेशपत्र ज्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना पाहिजे असतील त्या वाहन मालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात परवाना विभागात संपर्क करावा, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमासाठी

जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

 

·   डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात

जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात समावून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी ही अभिनव योजना हाती घेतली आहे. राज्यामध्ये विविध जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या मनात शासकीय योजनांप्रती सकारात्मक आत्मविश्वास निर्माण केला असून नांदेड येथे येत्या काही दिवसातच हा भव्य उपक्रम आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि विविध विभागाचे मंत्री सहभागी होणार आहेत. यादृष्टिने आज प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची व्यापक आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बराटे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

ज्या घटकांसाठी योजना शासनाने तयार केल्या आहेत त्या घटकांच्या मनात योजनांप्रती आस्था व सकारात्मक भाव असणे तेवढेच अत्यावश्यक असते. यातूनच लाभार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग सुरू होतो. सर्व विभाग प्रमुखांनी शासकीय योजनांकडे लाभार्थ्याच्या मनात हा आत्मविश्वास देणे आवश्यक असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी सांगितले. ज्या लाभार्थ्यांनी शासकीय योजनाच्या माध्यमातून विविध आव्हानांवर मात करून यश मिळविले, अशा प्रातिनिधीक लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते या प्रस्तावित भव्य कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे.

00000 





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...