Friday, July 20, 2018


लोहा येथे 34 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही2017       /
नांदेड दि. 21 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने लोहा येथे दि. 20 जुलै 2018 रोजी अचानक धाडी टाकल्या.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. कायद्यातील तरतुदीनुसार पथकामार्फत 34 तंबाखू विक्रेते यांचेकडून 22 हजार रुपये दंड आकारण्यात आला.
या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे तथा सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी कनकावाड व स्थानिक पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ केंद्रे व खोमणे आदी होते.
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गुंटूरकर यांनी केले आहे.

0000000

वाहतुक संदर्भात अडचणी असल्यास
नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा  
नांदेड, दि. 20 :- अत्यावश्यक वस्तूची वाहतुक / पुरवठा संदर्भात अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी दूरध्वनी 02462- 235077 या क्रमांकावर नागरिक, वाहन मालक / चालकांनी संपर्क करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.   
राज्यात विविध वाहतूक संघटनेद्वारे बेमुदत संप पुकारलेला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली प्रवाशांची व माल वाहतुकदारांचे वाहतुकीच्या वितरणाची होणारी समस्या, गैरसोय आदी बाबींवर उपाययोजना करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत असणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
नागपूर, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या ‘आषाढी वारी’ विशेषांकाचे आज विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री तथा या विशेषांकाचे अतिथी संपादक चंद्रकांत पाटील, विभागीय आयुक्त अनुप कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आदी उपस्थित होते.
आषाढी वारीचा संग्राह्य विशेषांक
पंढरपुरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादवारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले.
या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री श्री. पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’ असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी  वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.
0000
इरशाद बागवान/विसंअ/18/7/18


लोकशाही दिनाचे 6 ऑगस्ट रोजी आयोजन
नांदेड, दि. 20 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 6 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 20 :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा- जुलै / ऑगस्ट 2018 परीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 29 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  
नांदेड जिल्ह्यात दहावीसाठी 20 परीक्षा केंद्र तर बारावीसाठी 9 परीक्षा केंद्रात ही परीक्षा होत आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. त्यानुसार या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.
000000


मुख्यमंत्री कृषि अन्न प्रक्रिया योजनेचे
प्रस्ताव 31 ऑगस्ट पूर्वी सादर करावीत   
नांदेड, दि. 20 :- प्रक्रिया द्योगास चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत "मुख्यमंत्री कृषि अन्न प्रक्रिया योजनेस" मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी इच्छुकांनी प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांचेकडे मंगळवार 31 ऑगस्ट 2018  पुर्वी सादर करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  आर. बी. चलवदे यांनी केले आहे.          
शेतीमालाचे मूल्यवर्धन, उत्पादन अन्न पदार्थांच्या गुणवत्तेत वाढ, शेतमालाच्या काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, बाजारपेठेची निर्मिती यासह ऊर्जा बचतीसाठीच्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण, प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची निर्यात आणि ग्रामीण भागातील लघु मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ही प्रक्रिया कर्ज निगडीत असु यासाठी पूर्वी शासकीय / अशासकीय संस्थेकडून अनुदान घेतले असल्यास त्याचा तपशील अर्जासोबत देणे अनिवार्य आहे.
या योजनेत कृषि अन्न प्रक्रिया प्रस्थापना, स्तरवृध्दी आधुनिकीकरण, शीतसाखळी योजना, मनुष्यबळ निर्मिती विकास योजना तसेच राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानेंतर्गत मंजू, भौतिकदृष्टया उत्पादन सुरु प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना अर्थसहाय्य देय  राहील.
शासकीय / सार्वजनिक द्यो, सक्ष्म शेतकरी उत्पादक कंपनी / गट महिला स्वयंसाहाय्यता गट, खाजगी द्यो क्षेत्र, ग्रामीण बेरोजगार युवक, सहकारी संस्था या अन्न प्रक्रिया प्रकल्पापैकी फळे भाजीपाला सारख्या नाशवंत शेतमालाच्या प्रक्रियेच्या प्रकल्पांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच अनुदान मर्यादा, सयंत्रे आणि प्रक्रिया प्रकल्प बांधकामाच्या खर्चाच्या 30 टक्के अनुदान, कमाल मर्यादा  50 लाख रुपये असेल. ज्या प्रस्तावांना राष्ट्रीयकृत, व्यापारी शेडयुल्ड बँकेकडील कर्ज मंजू आहे असे प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्याकडे मंगळवार 31 ऑगस्ट 2018  पुर्वी सादर करावीत. सर्व शेतकरी इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नवा मोंढा नांदेड (दूरध्वनी क्र. 02462- 284252) येथे संपर्क साधवा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  आर. बी. चलवदे यांनी केले आहे.     
00000




भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
शेतकऱ्यांनी 7 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावीत  
नांदेड, दि. 20 :- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यास 490.00 लक्ष रुपयाचे आर्थिक लक्षांक प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज मंगळवार 7 ऑगस्ट 2018 पर्यंत संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा, से आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
या योजने निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सोडतीनंतर दोन दिवसात सात-बारा आठ-अ चा उतारा, संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र, हमीपत्र, आधार कार्ड प्रत, जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती) आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुकातील प्रथम पानाची प्रत (फोटो सहीत) इ. कागदपत्रे तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावीत.
या योजनेंतर्गत फळबाग आंबा कलमे, आंबा कलमे (सधन लागवड), काजु कलमे, पेरु कलमे, पेरु कलमे (सधन लागवड), दाळींब कलमे, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबु कलमे, संत्रा कलमे (इंडो इस्त्राईल तंत्रज्ञान), नारळ रोपे बानावली, नारळ रोपे टी/डी, सिताफळ कलमे, आवळा कलमे, चिंच कलमे, जांभुळ कलमे, पोकम कलमे, फनस कलमे, अंजीर कलमे, चिकु कलमे इ. तसेच या योजने अंतर्गत कलमांच्या लागवडीला (नारळ वगळता) अनुदान देय राहील. योजनेअंतर्गत फळबागेसाठी ठिबक सिंचन बंधनकारक राहील. फळपिकांचे कलमे / रोपे प्राधान्याने शासकीय, कृषि विद्यापीठ, राष्ट्रीय संशोधन संस्था राष्ट्रीय बागबानी मंडळ, मानांकीत रोपवाटीकेतुनच घेणे बंधनकारक राहील.
प्रत्येक तालुक्यात प्राप्त होणाऱ्या आर्थिक लक्षांकाच्या मर्यादित योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. फळबाग लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी अनुक्रमे 50, 30 20 टक्के प्रमाणे त्यांच्या आधार लग्न बँक खात्यात अदा करण्यात येईल.
या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज भरुन घ्यावा. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा. योजनेच्या अटी शर्तींचा भंग झाल्यास लाभार्थी वसुली दंडात्मक कारवाईस प्राप्त राहील. या योजनेचा लाभ घेणेसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करावा, सेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...