Wednesday, July 27, 2022

 जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत   

नांदेड (जिमाका) दि. 27 :- राज्‍य निवडणूक आयोगाकडील आरक्षण सोडत सुधारीत कार्यक्रमानुसार नांदेड जिल्‍हा परिषद सदस्‍य पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत गुरुवार 28 जुलै 2022 रोजी डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भव‍नाच्या प्रेक्षागृहात  जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्‍यक्षतेखाली  सकाळी 11 वा. काढण्‍यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्‍य पदांसाठीच्‍या आरक्षणाची सोडत तालुकापातळीवर काढण्यात येत आहे.  गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व देगलूर तालुका मुख्‍यालयी तर माहूर, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, नायगाव (खै), लोहा व मुखेड या तालुक्यांसाठी 28 जुलै रोजीच दुपारी 4 वाजता संबधित तहसिलदार यांच्याकडून संबधीत उपविभागीय अधिकारी यांच्‍या नियंत्रणात पंचायत समिती सदस्‍य पदांसाठीच्‍या आरक्षणाची सोडत काढण्‍यात येणार आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या नागरिकांना या सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे त्यांनी नमूद ठिकाणी व वेळी उपस्थित रहावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी  

नांदेड जिल्‍हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्‍याचा दिनांक 29 जुलै 2022 आहे. तर आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्‍हा परिषद आरक्षण / संबंधित तहसिलदार यांच्याकडे पंचायत समिती आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी  29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम 12 उपकलम (1), कलम 58 (1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलाकरीता राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.  

 

सोडतीचे ठिकाण व वेळ

जिल्‍हा परिषद / पंचायत समितीचे नाव सभेची वेळ व तारीखसभेचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. नांदेड जिल्‍हा परिषदेसाठी गुरुवार 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भव‍न जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे. माहूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह माहूर येथे. किनवट पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह किनवट येथे. हिमायतनगर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह हिमायतनगर येथे. हदगाव पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह हदगाव येथे. अर्धापूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. तहसिल कार्यालय सभागृह अर्धापूर येथे. नांदेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. उपविभागीय अधिकारी कार्यालय बैठक हॉल नांदेड येथे. मुदखेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. तहसिल कार्यालय मुदखेड येथे. भोकर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह भोकर येथे. उमरी पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह उमरी येथे. धर्माबाद पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. नगरपरिषद सभागृह धर्माबाद येथे. बिलोली पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह बिलोली येथे. नायगाव खै. पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. कै. बळवंतराव चव्हाण पंचायत समिती सभागृह नायगाव खै. येथे. लोहा पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. सभागृह तहसिल कार्यालय लोहा येथे. कंधार पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह कंधार येथे. मुखेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. बैठक हॉल तहसिल कार्यालय मुखेड येथे. देगलूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. शंकरराव चव्हाण सभागृह पंचायत समिती देगलूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

00000

 दिव्यांगाना मोफत संगणकीय व व्यावसायिक

प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :-दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. या प्रशिक्षणासाठी गरजू दिव्यांगानी 31 जुलै 2022 पर्यत प्रवेश अर्ज करावेत असे आवाहन मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे अधिक्षक यांनी केले आहे.

प्रवेशासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.

अभ्यासक्रमाचे नाव, शैक्षणिक पात्रता- सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथएम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) किमान इयत्ता 8 वी पास, मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग, सबमसिंबल पंप सिंगलफेज, (इलेक्ट्रीक कोर्स) किमान इयत्ता 9 वी पास. वय 16 ते 40 वर्षे, प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.

सोई व सवलती- प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवण्याची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल व व्यावसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना.

अर्ज केव्हा, कसे व कोठे करावेत – प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळीरोड, म्हेत्रेमळा, गोदड मळया जवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली-416 410 दु.क्र.0233-2222908 मोबाईल क्र. -9922577561/9975375557 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांग असल्याबाबत चे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेराक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे 31 जुलै पुर्वी पोहोचतील या बेताने पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर  तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येईल. तरी माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगानी लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 11 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 102 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 6, हिंगोली 1, तर ॲटीजन तपासणीद्वारे माहूर 4 असे एकूण 11 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 112 एवढी झाली असून यातील 1 लाख 376 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 44 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 5  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 4 असे एकूण 9  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 17, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 20, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7 असे एकुण 44  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 12 हजार 290
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 91 हजार 801
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 112
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 376
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.34 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 01
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-44
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
0000

 घरोघरी तिरंगा अभियानाचे आता

उत्स्फूर्त लोकसहभागातून लोकचळवळीत रूपांतर

-        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


 ·        नांदेड प्रादेशिक परिवहन विभाग घरोघरी तिरंगासाठी पुढे सरसावला

·        जिल्ह्यातील वाहन वितरकही सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी तत्पर  

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- ज्या व्यापक लढ्यातून देशाने स्वातंत्र्य मिळविले, देशासाठी अनेक देशभक्तांनी आपले बलिदान दिले त्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला नव्या पिढी पर्यंत पोहोचवले तर त्यांच्या मनात देशाप्रती अधिक कृतज्ञता निर्माण होईल. हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हा उपक्रम केवळ देशभक्ती पुरता मर्यादित नाही तर आपल्या कर्तव्यालाही अधोरेखित करणारा उपक्रम आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. देशाप्रती आपली कृतज्ञता घरोघरी तिरंगा लावून व्यक्त करण्याची मिळालेली संधी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंब स्वयंस्फूर्त बजावेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

 

घरोघरी तिरंगा अभियानाला लोकचळवळीत रुपांतरीत करण्यासाठी नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाने पुढाकार घेतला. जिल्ह्यातील सर्व वितरक, वाहन प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून प्रातिनिधीक स्वरुपात पाच हजार कुटूंबा पर्यंत तिरंगा पोहोचविण्याच्या उपक्रमाचा आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते प्रातिनिधीक शुभारंभ केला. सिडको येथील मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या घरावर तिरंगा लावण्याची पहिल्यांदाच ही संधी प्रत्येकाला मिळाली आहे. घरोघरी तिरंगा पाठीमागे एक व्यापक भावना आहे. देशाप्रती कृतज्ञता आहे. ही कृतज्ञता आपण लक्षात घेऊन जिल्ह्यातील 7 लाख 50 हजार घरे आपल्या घरावर दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा लावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

प्रादेशिक परिवहन विभागाने घरोघरी तिरंगासाठी जी स्वयंस्फूर्त जबाबदारी स्विकारली आहे त्याचे कौतूक करावे वाटते. यात विशेष म्हणजे ज्या घरांना तिरंगा घेणे शक्य नाही अशा घरांसाठी सुमारे 5 हजार तिरंगा वाटण्याचे या विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे. हे पाच हजार तिरंगा त्यांनी माविम मार्फत समन्वय साधून बचतगटांमार्फत घेतल्याने आता या लोकचळवळीला बचतगटातील महिलांच्या श्रमाची जोड मिळाल्याचे गौरउद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काढले.

 

प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाील हा उपक्रम राबविण्याचे आम्ही ठरवले. यात अधिकाधिक लोकांचा सहभाग घेण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागामार्फत आम्हीही याचे महत्व नागरिकांना पटवून देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी 5 हजार ध्वज पुरवणाऱ्या बचत गटाला त्यांच्या मानधनाचा धनादेशही मान्यवरांच्या हस्ते यावेळी देण्यात आला.        

00000






 मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावेत

-  जिल्हा‍ निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर

§  1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

नांदेड (जिमाका) दि. 27 :-  मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहिम राज्यभर 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणार आहे. जिल्‍हयातील पात्र मतदारांनी मतदार यादीतील नावाशी 1 ऑगस्‍टपासुन मोठ्या संख्‍येने आधार क्रमांकाची जोडणी करून घ्यावी. त्यासाठी अर्ज क्र. 6 (ब) भरून देण्‍यासाठी https://eci.gov.in/ किंवा https://ceo.maharashtra.gov.in/  या संकेतस्‍थळास भेट द्यावी. अथवा आपल्‍या भागातील संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  (बीएलओ) यांचेकडे छापील अर्ज क्र. 6 (ब) भरून द्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी केले आहे. 

 

निवडणूक कायदा अधिनियम 2021 अन्‍वये लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1950 मध्‍ये सुधारणा केल्‍या आहेत. त्‍यानुसार मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्‍यासाठी आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडुन ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्‍याबाबतच्‍या सुधारणा अंतर्भुत आहेत. आधार क्रमांक मिळवण्‍याचा उद्देश मतदार यादीतील त्‍याच्‍या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्‍यात त्‍यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे. 

 

या सुधारणांची अंमलबजावणी 1 ऑगस्‍ट 2022 पासुन लागु होणार आहे. हा कायदा आणि नियमामध्‍ये केलेल्‍या सुधारणानुसार मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रत्‍येक व्‍यक्‍तीकडून आधार क्रमांक विहीत स्‍वरूपात व विहीत रितीने मिळविण्‍यासाठी वैधानिकरित्‍या प्राधिकृत करण्‍यात आलेले आहे. मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मतदान कार्डासोबत मतदारांना आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्‍यावतीने ऐच्छिक आहे.  यासाठी लागणारा नमुना अर्ज 6 ब च्‍या छापील प्रती उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत. 17 जुन 2022 च्‍या अधिसूचनेनूसार 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्‍पुर्वी मतदार यादीत नाव असलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीस त्‍याचा आधार क्रमांक अर्ज 6 (ब)  मध्‍ये भरून देता येईल. अर्ज 6 (ब) मा. भारत निवडणूक आयोगाच्‍या https://eci.gov.in/ या संकेतस्‍थळावर आणि मा. प्रधान सचिव तथा मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य यांचे https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. तसेच मतदारांना ऑनलाईन पध्‍दतीने आधार क्रमांक भरण्‍यासाठी अर्ज 6 (ब) ERO NetGaruda Appnvsp आणि vha या माध्‍यमांवर देखील उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. मतदार त्‍याचा आधार क्रमांक सादर करण्‍यास असमर्थ असला तरी मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीतील नोंद वगळता येणार नाही. नमुना अर्ज 6  ब मध्‍ये नमुद केलेल्‍या 11 पर्यायी कागदपत्रापैकी कोणताही एक दस्‍तावेज सादर करता येईल. बीएलओ यांचेमार्फत घरोघरी भेट देऊन मतदाराकडून छापील नमुना अर्ज 6 ब भरून घेण्‍यात येणार आहेत. मतदाराकडून अर्ज 6  ब भरून घेण्‍याच्‍या अनुषंगाने 4 सप्‍टेबर 2022 रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्‍यात येणार आहे असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

0000

 आयटीआय प्रथम फेरीस 28 जुलैपासून सुरुवात


नांदेड (जिमाका) दि. 27 :- आयटीआयच्यावतीने ऑनलाईन प्रवेश प्रथम फेरीस गुरुवार 28 जुलै 2022 पासून सुरुवात होणार आहे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी केले आहे.

आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या व प्रवेश निश्चिती ट्रेड भरलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची प्रथम प्रवेश फेरी केंद्रीय पध्दतीनुसार होणार आहे. प्रथम फेरीची निवड यादी लागली आहे. ट्रेडसाठी निवड झाली आहे त्यानुसार युवक व युवतीना ट्रेडला दिलेल्या वेळेनुसार प्रवेश रितसर मूळ कागदपत्रे दाखल करुन नियमानुसार घ्यावा लागेल. पहिल्या प्रवेश फेरीचे प्रवेशास सुरुवात झाली असून संकेतस्थळावर दिलेल्या नियमानुसार युवक व युवतीस प्रवेश दिला जाईल. वेळेनंतर व दिनांकानंतर आलेल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन  पध्दतीत विचार केला जात नाही. प्रथम फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्वरीत आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी शासकीय  आयटीआय प्रवेश विभागाशी संपर्क साधावा असेही आवाहन प्राचार्य एम.एस. बिरादार यांनी केले आहे.

0000

 भोकर, अर्धापूर व कंधार येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 27 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भोकर तालुक्यातील सर्व शाळाचे मुख्याध्यापक /  प्राचार्य यांना रस्ता सुरक्षा अंतर्गत माहिती दिली. प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याबाबत सांगितले. स्कुल बस नियमावलीची  व  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. तसेच या उपक्रमात विदयार्थ्यानी सहभाग नोंदविण्याबाबत कळविले. या मार्गदर्शन शिबिरामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहा.मोटार वाहन निरिक्षक प्रविण राहाणे हे उपस्थित होते. या शिबिरात जवळपास 90 शाळेच्या मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदविला होता.

अर्धापूर तालुक्यातील महात्मा बसवेश्वर विद्यालयमीनाक्षी देशमुख मेमोरियल माध्यमिक गर्ल्स विद्यालय  जिल्हा परिषद हायस्कूल येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सहा.मोटार वाहन निरीक्षक वैभव डूब्वेवारस्वप्निल राजूरकर  निलेश ठाकूर यांनी नुकतेच रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर घेतले. या शिबीरात मुलांना रस्त्यावरुन जात असताना कोणती खबरदारी घ्यावी याबाबत माहिती दिली. हेल्मेट,सीट बेल्ट आणि रस्ता वाहतुकीचे नियम याबद्दल मार्गदर्शन केले. विशेष करुन 18 वर्ष पूर्ण होण्याआधी  लायसन्स नसताना वाहन चालविल्यामुळे कोणती कार्यवाही होऊ शकते याची माहिती देण्यात आली. विविध शाळांना शालेय परिवहन समिती संदर्भात माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापकशिक्षक   विद्यार्थी उपस्थित होते.

कंधार तालुक्यातील मनोविकास माध्यामिक विद्यालयप्रियदर्शनी उच्च माध्यमिक कन्या शाळा  ग्रो ण्ड ग्लो येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयवतीने सहा.मोटार वाहन निरीक्षक वैभव डूब्वेवारस्वप्निल राजूरकर निलेश ठाकूर यांनी नुकतेच रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर घेतले. या शिबीरात उपस्थित मुलांना रस्त्यावरुन जात असताना कोणती खबरदारी घ्यावीहेल्मेट,सीट बेल्ट आणि रस्ता वाहतुकीचे नियम याबद्दल मार्गदर्शन केले. विशेष करुन 18 वर्ष पूर्ण होण्याआधी  लायसन्स नसताना वाहन चालविल्यामुळे कोणती कार्यवाही होऊ शकते याची माहिती देण्यात आली. हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये तिरंगा खरेदी करुन 15 ऑगस्ट रोजी फडकवण्याचे विद्यार्थांना आवाहन करण्यात आले. तसेच विविध शाळांना शालेय परिवहन समिती संदर्भात माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापकशिक्षक  सुमारे पाचशे  विद्यार्थी उपस्थित होते.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...