Thursday, August 3, 2017

नवीन मतदार नोंदणीसाठी
31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
           नांदेड दि. 3 :- भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानूसार जिल्‍हयातील तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21) नाव नोंदणी करण्यासाठी जिल्‍हयात विशेष मोहिम जुलै महिन्यात राबविण्‍यात आली होती. या विशेष मोहिमेस भारत निवडणूक आयोगाने दिनांक 31 ऑगस्ट 2017 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्‍हयातील जास्‍तीतजास्‍त नागरीकांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवून या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.   
दिनांक 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्‍या नवीन पात्र मतदारांना नोंदणीसाठी अर्ज करता येतील. जिल्‍हयातील मतदारांची नोंदणी, वगळणी, व दुरूस्‍तीसाठीचे अर्ज दिनांक 31 ऑगस्ट  2017 स्विकारण्‍यात येतील. अर्ज नागरीकांनी आपल्‍या भागातील बीएलओ यांचेकडे अथवा संबंधित तहसील कार्यालयात जमा करावेत.
या विशेष मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  (बीएलओ) हे त्‍यांच्‍या क्षेत्रातील घरांना दिनांक 31 ऑगस्ट 2017 पर्यंत भेट देतील आणि मतदारांची नोंदणी करतील, तसेच मयत / दुबार / स्‍थलांतरीत मतदारांची माहिती घेऊन योग्‍य चौकशीनंतर अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍याबाबतची कार्यवाही करण्‍याबाबतचा अहवाल संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे  देतील. 
दिनांक 5 जानेवारी 2017 नंतर नोंदणी करण्‍यात आलेल्‍या तसेच दुरूस्‍ती करण्‍यात आलेल्‍या मतदारांना त्‍या-त्‍या बीएलओ मार्फत विनामूल्‍य PVC EPIC CARD  ( प्‍लास्‍टीक मतदान ओळखपत्र ) वितरीत करण्‍यात येत आहेत याचा नागरीकांनी लाभ घ्‍यावा.  याशिवाय ज्‍या मतदारांचे फोटो यादीत नाहीत त्‍यांनी अलीकडील काळातील रंगीत पासपोर्ट साईज फोटो जमा करावेत. तसेच आपल्‍या कुटूंबातील मयत मतदार असल्‍यास त्‍यांचे नाव वगळण्‍यासाठी नमूना नं. 7 मध्‍ये अर्ज सादर करावेत. याशिवाय दुबार मतदार व स्‍थलांतरीत मतदारांची नावे देखील वगळण्‍यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2017 पर्यंत अर्ज स्विकारले जातील याची सर्वांनी नोंद घ्‍यावी, असेही आवाहन केले आहे.   
000000
स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण
संस्थेच्या संचालक पदी शिरपुरकर रुजू
           नांदेड दि. 3 :- येथील स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या संचालक पदी दिलीप शिरपुरकर हे नुकतेच रुजू झाले आहेत. तत्कालीन संचालक जयंत वरणकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निरोप तर श्री. शिरपुरकर यांचे स्वागत कार्यक्रम नुकताच आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी संस्थेतील इलेक्ट्रॉनिक मोटार प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन श्री. शिरपुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शाखा प्रमुख नरेशकुमार उन्हाळे, क्षेत्रीय कार्यालयाचे किरण जिंतुरकर, प्रशिक्षक अशोक लोहार, डॉ. पी. व्ही. पोपशेटवार, संस्थेतील कर्मचारी  उपस्थित होते.   

000000
माहूर येथील पंचक्रोषी यात्रेनिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 3 :- नारळी पोर्णिमेनिमित्त माहूर येथे पंचक्रोषी यात्रेचे कार्यक्रम शांततेत पार पडावे. त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व जिल्ह्यात शांतता अबाधीत रहावी म्हणून प्रभारी पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये रविवार 6 ऑगस्ट ते मंगळवार 8 ऑगस्ट 2017 च्या मध्यरात्री पर्यंत माहूर येथील पोलीस निरीक्षक अरुण जगताप पोस्टे माहूर स्वाधीन अंमलदार यांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.  
माहूर येथे मोठ्या प्रमाणात पंचक्रोशी यात्रा रविवार 6 ऑगस्ट ते मंगळवार 8 ऑगस्ट 2017 या कालावधीत भरणार आहे. या महोत्सव काळात प्रत्येक दिवशी 60 ते 70 हजार भाविक यात्रेकरु महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातून खाजगी वाहने घेऊन येतात. श्री दत्तशिखर, अनुसया माता मंदिर, देवदेवेश्वरी, रेणुकामाता मंदिर, सर्वतीर्थ, वनदेव, मातृतीर्थ अशा ठिकाणी दर्शनासाठी जातात. हा रस्ता अरुंद असून पावसामुळे बराचसा खराब झाला आहे. सर्वच वाहने वर गेल्यास वाहतुकीस अडचण निर्माण होऊ शकते. देवस्थाने ही जंगलात असून अंतरा-अंतरावर आहेत. 
प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे- रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्यारितीने चालावे व कसे वागावे ? हे फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जाणे किंवा जाऊ नये ? हे ठरविण्यासाठी. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजे-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्यासाठी. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेच्या ठिकाणी व इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबाद्दल किंवा ढोल, ताशे व इतर वाद्य वाजविणे आणि शींगे इतर वाद्य कर्कश वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबाबत आणि त्यावर नियमण ठेवणेबाबत. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमवणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सुचना देण्यासंबंधी. मुंबई पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्ठी देणारे सुव्यवस्था योग्य आदेश देण्याबाबत.  
हा आदेश लागू असेपर्यंत माहूर येथील पोलीस निरीक्षक अरुण जगताप यांचेकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेले आदेशाचे पालन करावे. सदर जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रेत, समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. सदरचा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेशही प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी जारी केले आहेत.

00000
रोजगार मेळाव्याचे
9 ऑगस्ट रोजी आयोजन  
नांदेड दि. 3 :-  जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने रोजगार मेळावा- 1 महात्मा फुले मंगल कार्यालय, फुले मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे बुधवार 9 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास जिल्ह्यातील रहिवासी व गरीब होतकरु तरुणांनी उपस्थित रहावे , असे आवाहन कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान यांनी केले आहे.
बेरोजगार तरुणांना नवभारत फर्टीलायझर, शोध ॲडव्हॅनटेक औरंगाबाद, दिशा सर्व्हिसेस औरंगाबाद, सिट्रस प्रोसेसिंग इंडिया लि. कंपनीत विविध पदांसाठी सेवेची संधी मिळणार आहे. कंपनीच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाणार आहे. मेळाव्यास येतांना आधार कार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दहावी टिसी / सनद, जातीचा दाखल (असल्यास) यांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात. यावेळी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व अण्णासाहेब पाटील बीज भांडवल योजना विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे ( दुरध्वनी 02462- 251674 ) संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
000000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...