Friday, December 7, 2018


नांदेड येथे राज्यस्तरीय
शालेय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन
नांदेड, दि. 7 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा बेसबॉल असोसिएशन नांदेड यांच्यावतीने राज्यस्तर शालेय बेसबॉल 14 वर्षे मुले-मुली क्रीडा स्पर्धेचे आयोजन 7 ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीत पोलिस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास क्रीडाप्रेमी, खेळाडू मुले-मुलींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते 8 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वा. पोलिस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, क्रीडा उपसंचालक श्रीमती उर्मीला मोराळे, राज्य बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखनकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
रविवार 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वा. बक्षिस वितरण कार्यक्रम नांदेड जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा  आमदार डी. पी. सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हुजुर साहिब सचखंड गुरुद्वारा बोर्डचे अधीक्षक डी पी. सिंग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे क्रीडा संचालक विठ्ठलसिंह परिहार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रामलू पारे, एस. एम. पटेल, सुरज सोनकांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न  होणार आहे.
या स्पर्धेसाठी राज्यातील 8 विभागातून 256 खेळाडू मुले-मुली, 16 क्रीडा मार्गदर्शक, 16 संघ व्यवस्थापक व 20 स्वयंसेवक व निवड समिती सदस्य असे एकुण 315 उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन व नियोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधू, सय्यद साजीद, आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण, नांदेड जिल्हा बेसबॉल संघटनेचे प्रलोभ कुलकर्णी, त्यांचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
000000


नांदेड डाक विभागात
स्वच्छता पंधरवाडा संपन्न

नांदेड, दि. 7 :- स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी दूरसंचार विभागाच्यावतीने भारतीय डाक विभागात स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या दरम्यान स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
या पंधरवाड्यात दरदिवशी नवनवीन उपक्रम राबविण्यात आले. त्यात मुख्यत्वे करुन पोस्टमनची निवड स्वच्छता दूत म्हणून करुन त्यास स्वच्छतेचे महत्व सांगणारा टी-शर्ट वाटप करण्यात आला. त्याद्वारे त्यांच्या वाटप क्षेत्रात स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करण्याची अभिनव कल्पना राबविण्यात आली.
याशिवाय विविध कार्यालयात वृक्षारोपण, टपाल पेटीचे रंगकाम, होर्डिंग लावणे व स्वच्छता पत्रक वाटप करण्यात आली. डाक कार्यालयात येणाऱ्या व जाणाऱ्या टपालावर Discourage the use of plastic carry Bags  हा शिक्का मारण्यात आला. त्याद्वारेही प्लास्टीकचा वापर टाळावा हा संदेश जनतेत पोहचविण्यात आला. या स्वच्छता कार्यशाळेच्या अध्यक्षतेस्थानी केशव घोणसे पाटील होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शेवटी स्वच्छ कार्यालयास स्वच्छ व सुंदर कार्यालयाचे बक्षीसही जाहीर करण्यात आले. स्वच्छता पंधरवाड्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन करणे व तो यशस्वीरित्या राबविण्यासाठी डाक अधिक्षक लिंगायत तसेच उपडाक घर अधिक्षक नागरगोजे यांनी विशेष प्रयत्न केले व पुढेही असेच स्वच्छतेचे उपक्रम राबविण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले.  
000000


सशस्त्र सेना ध्वजदिन निधी
संकलनाचा नांदेड येथे शुभारंभ
  
नांदेड, दि. 7 :- जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2018-19  संकलन  शुभारंभ माजी सैनिकांच्या मेळाव्याचे दघाटन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी श्री महिंद्रकर, ईसीएचएस नांदेडचे अधिकारी मेजर बी थापा यांची प्रमुख उपस्थिती होती.   
सन 2017-18 साठी शासनाने जिल्ह्यासाठी 35 लाख 50 हजार 512 रुपये  एवढे उद्दिष्ट दिले होते. ते जिल्हयाने 46 लाख 88 हजार रुपये जमा करुन 132 टक्के पुर्ण केले आहे. तसेच वर्ष 2018-19 साठी देखील शासनाकडुन 35 लाख 50 हजार 512 रुपये  एवढे उद्दिष्ट मिळाले असन ते डिसेंबर 2018 मध्ये दुप्प्टीने निधी जमा करुन पुर्ण करण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकारी परदेशी यांनी  सांगितले.   
या संकलनात जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय, शाळा  तथा  महाविद्यालयांनी  सहकार्य केले आहे. यापुढे सुद्धा त्यांना दिलेले उद्दिष्ट वेळेतच पुर्ण करु अशी  खात्री जिल्हयातील  कार्यालयांनी दिली.  या प्रसंगी उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालयांना  प्रशस्तीपत्र, सैनिकाबाबत महत्व असणारे विषयाचे व इतर  कार्यालयीन उपयुक्त पुस्तके  भेटवस्तू म्हणून देण्यात आली.
प्रास्ताविक सैनिक कल्याण संघटक श्री शेटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रु ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलीत झालेल्या निधीचा विनियोग   माजी सैनिकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती  दिली.  सुरुवातीला शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली.
या कार्यक्रमात जिल्हयातील वीरनारी, वीरपिता यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्तीचे व इतर आर्थीक मदतीचे 1 लाख 28 हजार रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले. निनाद फांउडेशन नांदेड या सामाजिक संस्था यांनी वर्षे 2016-17 मध्ये माजी सैनिक विधवा यांना  1 लाख 8 हजार रुपये आर्थीक मदत दिल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले आहे.  
सेवानिवृत्त कर्मचारी प्रफूल्ल कोंदडे हे त्यांच्या पेन्शनमधून 1 हजार रुपये प्रतिमहिना आरटीजीएसद्वारे देतात. यावेळी त्यांचाही प्रशस्तीपत्र व भेटरुपी पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.  देगलूर  येथील  माजी सैनिक महिला बचतगटास यावेळी बचतगट नोंदणी प्रमाणपत्र अदा करण्यात आले.  
पत्रकार योगेश लाठकर यांनी 5 हजार रुपये नगदी तर शिवराज बिच्चेवार यांनी 1 हजार 100 रुपये आरटीजीएसव्दारे निधी जमा केला.  सुत्रसंचलन माजी सैनिक श्री. झगडे यांनी केले तर  माजी सैनिक हयुन पठाण यांनी आभार मानले. 
या कार्यक्रमास जिल्हयातील जवळपास 250 माजी सैनिक, विधवा, अवलंबित उपस्थित होते. प्रामुख्याने माजी सैनिक संघटना प्रमुख व्यंकट देशमुख, रामराव थडके आदी उपस्थित होते. कार्यक्रम  यशस्वीपणे पारपाडण्यासाठी सैनिक कल्याण कार्यालयाचे सुभे मजीदवार, किशन गुरगुटवार, सुर्यकांत कदम, श्री. टिपरसे, श्री. पाईकराव, श्री. गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. 
0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...