Wednesday, May 24, 2023

 हदगाव येथे शुक्रवारी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती

करिअर समुपदेशन मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत हदगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे शुक्रवार 26 मे 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा तामसा रोड हदगाव येथील सुमन गार्डन ॲन्ड लॉन्स येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या कालावधीत होईल. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होईल. हदगाव तालुक्यातील विद्यार्थी, पालकवर्ग व शिक्षकांनी https://mahacareer.globalsapio.com या लिंकवर नोंदणी करावी असे आवाहन संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.   

 

या मेळाव्यात प्रामुख्याने दहावी, बारावीनंतर महाविद्यालयीन शिक्षण व इतर अभ्यासक्रम, अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, कर्ज योजना या विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. या मेळाव्यास हदगावचे उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल वहिद, तहसीलदार जीवराज डापकर, प्रभारी पोलीस निरीक्षक जगन पवार, नगरपरिषदेचे मुख्यधिकारी दामोधर जाधव, उपकोषागार अधिकारी सचिन कद्रे, एसबीआय बँकेचे शाखा अधिकारी अभिषेक रोहतगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देवराव भिसे, गटविकास अधिकारी दशरथ आडेराघो, गटशिक्षणाधिकारी किसनराव फोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

या मेळाव्याच्या संयोजक समितीमध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर, कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, हदगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य फारूकी वासे यांचा समावेश आहे.  

0000

23.5.2023.

 छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर

समुपदेशन मेळाव्याचे 26 मे रोजी हदगाव येथे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगाव यांच्यावतीने 26 मे 2023 रोजी सुमन लॉन्सतामसा रोडहदगाव येथे सकाळी 10 ते 2 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उदघाटन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.  

 

या मेळाव्यात प्रामुख्याने दहावी व बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व इतर अभ्यासक्रममहाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियाशैक्षणिक शिष्यवृत्ती योजनाकर्ज योजना या विषयावर तज्ञामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. हदगाव तालुक्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी https://mahacareer.globalsapio.com/ या गुगल फॉर्म लिंकवर नोंदणी करुन या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

23.5.2023.

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 

योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्यात बेरोजगार उत्पादन उद्योग व सेवा उद्योगांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राबविण्यात येते.  या योजने अंतर्गत सेवा उद्योगासाठी 20 लक्ष रुपये मर्यादेपर्यंत व उत्पादन उद्योगासाठी 50 लक्ष रुपयांपर्यत बँकेमार्फत अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेत इच्छुक अर्जदारांनी https/maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

या योजने अंतर्गत उद्योग विभागामार्फत बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर जास्तीत जास्त 35 टक्के पर्यत (जात प्रवर्ग/उद्योग कार्यक्षेत्रानुसार) अनुदान देय आहे. ऑनलाईन केलेल्या कर्ज प्रकरणांची दरमहा छानणी नंतर ऑनलाईन कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी शिफारस करण्यात येतात व कर्ज मंजुरी /वाटपानंतर अनुदान ऑनलाईन बँकेत जमा करण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे कागदपत्राची यादी पुढीलप्रमाणे आहे. पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा दाखला (टीसी), डोमिसाईल /रहिवासी प्रमाणपत्र, अनुसूचित जाती-जमातीसाठी जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागासाठी गावाचा लोकसंख्येचा दाखला/प्रमाणपत्र (ग्रामसेवक यांचे), हमीपत्र (अंडरटेकींग फॉर्म) वेबसाइटवरील मेन्युबारमध्ये उपलब्ध, प्रकल्प अहवाल इ. कागदपत्रे 300 केबी (KB) पर्यत असावे. तसेच हमीपत्र व प्रकल्प अहवाल 1 (Mb) एमबी पर्यत असावे असे जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.

00000

23.5.2023.

 न्युक्लीअस बजेट योजनेत अर्ज करण्यासाठी 31 मे पर्यत मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी न्युक्लीअस बजेट योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2022-23 अंतर्गत अ गटातील वैयक्तीक व सामुहिक लाभाच्या योजना राबविण्यासाठी 17 एप्रिल ते 17 मे 2023 या कालावधीत लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

 

तथापि प्रकल्पातील नागरिकांच्या मागणीनुसार न्युक्लीअस बजेट योजना सन 2022-23 अंतर्गत अ गटातील वैयक्तीक व सामुहिक योजनांचे व शबरी घरकुल योजनेचे अर्ज वाटप व स्विकारण्यासाठी 31 मे 2023 पर्यत मुदतवाढ दिली आहे.  या योजनेसाठी लाभार्थ्यांनी 31 मे 2023 पर्यत अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकलपाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...