Tuesday, January 28, 2020


शिवछत्रपती राज्य क्रीडा
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 :- राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. राज्यात शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (ळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु) असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            या पुरस्कारासाठी ऑनलाईन ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. बंधितानी ऑनलाईन अर्जाआपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज बंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या आर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रासह अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावे. ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करण्यात आलेल्या कागदपत्राशिवाय इतर कोणतेही अधिकची कागदपत्रे अर्जासोबत जोडण्यात येवू नये. ऑनलाईन व्यतिरीक्त इतर कागदपत्रे जोडलेली असल्याचे निदर्शनास आल्यास बंधित कागदपत्रांचा गुणांकनासाठी विचार केला जाणार नाही याची  अर्जदारांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहिती, पात्रतेचे निकष नियमावली आदी माहितीसाठी शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय 24 जानेवारी 2020 चे  अवलोकन करावे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in   www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
            शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य पुरस्कार (संघटक/ कार्यकर्ते), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला संघटक/ कार्यकर्ते महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहिसी पुरस्कर, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडु), एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार आहेत.
ज्येष्ठ क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/ कार्यकर्ते क्रीडा क्षेत्राशी सबंधित अशा 60 वर्षावरील व्यक्तीने क्रीडा खेळासाठी आपले सर्वस्व पणाला लावून आपले जीवन  क्रीडा विकासासाठी व्यतीत केले आहे, अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीचा गौरव करण्याचा दृष्टीने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी अर्ज मागविण्यात येत नसून अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीची माहिती नामांकनाद्वारे केंद्र शासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील. याबाबत अधिक माहितीसाठी क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक क्रीडा युवक सेवा लातुर विभाग लातुर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधु- 9423140617 यांच्याशी संपर्क साधाव, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विलास चव्हाण यांनी केले आहे.
00000


शासकीय अध्यापक महाविद्यालयात 
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
       नांदेड, दि. 28 :- शासकीय अध्यापक महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 महाविदयालयाच्या प्रांगणात प्राचार्य डॉ. सुनंदा गो. रोडगे यांच्या समवेत ध्वजारोहणापूर्वी संविधान उद्देषिका सरनामाचे 
सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर  महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या स्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी यांनी विविध भित्तिपत्रक भारतीय संविधानावर तयार केली होती. त्याचे अनावरण प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे  यांच्या व सर्व प्राध्यापकांच्या स्ते करण्यात आले,
 त्यानंतर  देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यात विविध प्रशिक्षणार्थींनी गीते म्हटली. त्यानंतर  अध्यक्षीय समारोपात प्राचार्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बोईवार या प्रशिक्षणार्थीनी केले.
             याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ. शाकेर, प्रा.डॉ. हारुन शेख , प्रा. डॉ. उमेश मुरुमकर प्रा. डॉ.  विठठल घोणशेटवाड, मुख्य लिपिक श्री गच्चे तसेच कार्यालयीन  कर्मचारी, प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन बी. एड. प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी सतीश गोपतवाड यांनी केले.
000000


बारावी परीक्षेचे साहित्य,
ग्रेड लिस्ट वितरण गुरुवारी होणार
नांदेड, दि. 28 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागीय मंडळ लातूर यांच्या मार्फत फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे साहित्य गुरुवार 30 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 ते सायं 5 यावेळेत नांदेड जिल्ह्यासाठी पिपल्स हायस्कुल नांदेड येथे वितरण केंद्रावर वाटप करण्यात येणार आहे, लातूर विभागीय मंडळ विभागीय संचिव यांनी कळविले आहे.
00000


लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 3 फेब्रुवारी 2020 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


बारावी परिक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत आवाहन
नांदेड, दि. 28 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींसाठी आवाहन करण्यात आले आहे की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परिक्षा फेब्रुवारी-मार्च 2020 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगनीमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन घेण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2020 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता बारावी परिक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेश हॉल तिकिट ऑनलाईन पद्धतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा / प्राचार्यांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकून त्यावर संबंधीत मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावयाची आहे. फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी वरील बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...