Friday, January 12, 2024

 वृत्त क्र. 40

 

श्री क्षेत्र माळेगांव येथे भव्य कृषी प्रदर्शनाचे

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

·         डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण

 

नांदेड (जिमाका), दि. 12 :- जिल्हा परिषदेच्या कृषि विभागमार्फत श्री क्षेत्र माळेगांव यात्रे भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.  या कृषि प्रदर्शनात एकूण 133 स्टॉल उभारण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते 10 जानेवारी रोजी करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, मंजुषा कापसेमुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्नाप्रकल्प संचालक संजय तुबाकलेउपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेजिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती आर.पीकाळमशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक सविता बिरगेकार्यकारी अभियंता अमोल पाटीलजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बोधनकर, इतर विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, स्टॉलधारकशेतकरी व पत्रकार यांची उपस्थित होती.

या प्रदर्शनात कृषि निविष्ठारासायनिक खते 8बियाणे 19किटकनाशक औषधी कंपन्या-17 विविध (यंत्रेसुक्ष्म सिंचनकृषि औजारे 16, ट्रॅक्टर 11, नर्सरी 3सेंद्रीय शेती 2, महिला बचत गट 5, एमएसआरएलएम 15 व विविध शासकीय विभागाचे 14, बॅक 1, इतर (शेती उपयोगी व खाद्य स्टाल) 24 असे एकूण 133 स्टॉल उभारण्यात आले आहे. नामांकित मुख्य बियाणे कंपनी त्यांनी कापूस उत्पादक कंपन्यांनी लाईव्ह झाडे लावण्यात आली आहेभाजीपाला उत्पादक कंपनी यांनी भाजीपाला यांचे लाईव्ह नमुने ठेवण्यात आलेकापूस पिकावरील गुलाबी बोंड ळी नियंत्रणासाठी राशी व महिको कंपनीमार्फत एकात्मिक व्यवस्थापन मॉडल उभारले आहे.  ट्रॅक्टरट्रॅक्टर चलित अवजारे पेरणी यंत्र, नांगर, मोगडाताडपत्री , कडबा कटर विद्युत पंप अवजार साहित्य विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आलेले आहे. नर्सरी फळे  भाजीपाला रोपेसेंद्रिय  खतबचत गटामार्फत तयार केलेल्या चटणी पापड कुरडया डाळी विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आलेले आहेत.

कृषि विभागमार्फत फळेभाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत भाजीपाला 151 (26 प्रकारचे भाजीपाला नमुने फळे -144 ( 25 प्रकारचे फळे नमुने मसाला पिके -29 (6 प्रकारचे मसाला नमुने असे एकूण 324  ( 57 प्रकारचे नमुने )प्राप्त झाले आहेत. त्याची पाहणी आमदार श्यामसुंदर शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केली आहे. 324 (57 प्रकारचे नमुने प्राप्त झाले आहेत.

या स्पर्धेत 324 सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना  प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त अनुक्रमे 4 हजार रुपये, 3 हजार रुपये व 2 हजार रुपये या प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे, असे कृषि विकास अधिकारी विजय बेतीवार यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त 10 ते 14 जानेवारीपर्यंत स्टॉल सकाळी ते रात्री पर्यंत सुरू असणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागा मार्फत करण्यात आले आहे.                                                                           

सन 2023-24 या वर्षामध्ये कृषि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या 19 शेतकऱ्यांना डॉ. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात खडकी येथील उध्दव रामराव कदम, बोरगाव येथील आनंदराव रामजी रुमणवाड, निवघा येथील बालाजीराव भाऊराव पवार, मालेगाव येथील अमोल बालाजी सावंत, करंजी येथील संजय बळवंतराव चाभरकर, हसनाळी येथील केदार महादेव कावडे, साप्ती येथील कबीरदास विश्वनाथ कदम, नागठाणा येथील केशव शंकरराव लिंगाडे,जांब बु येथील रामराव जिवनराव गोंड,  लखमापूर येथील प्रमोद शिवाजी बेहरे,कोकलेगाव येथील माधुरी मारोती मिरकुटे, कोल्हारी येथील श्रीमती अंजनाबाई दिगांबर अंकुरवाड, रामपूर येथील अनिल हणमंतराव इंगोले पाटील, धानोरा म. येथील भागवत व्यंकटी कदम,गंगनबीड येथील धोंडीबा रामदास राहेरकर, लोहगाव येथील रमेश विश्वनाथराव शेटकर, वटफळी येथील दत्ता शंकर कदम, वडगाव बु. येथील लक्ष्मण देवराव पवार, पिंपळगाव ढगे येथील वसंत विश्वांभर ढगे यांचा समावेश आहे. कृषि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 16 शेतकऱ्यांचा व उत्तेजनार्थ शेतकऱ्यांचा असे एकूण 19 पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

0000





 वृत्त क्र. 39 

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी

'अमृत'च्या योजना मोलाच्या

-         मुख्य वित्त व लेखाधिकारी महेश वाकचौरे 

नांदेड (जिमाका), दि. 12 :-  खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपले जीवन उन्नत बनवावे, असे आवाहन संस्थेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी तथा नांदेड जिल्हा पालक अधिकारी महेश वाकचौरे यांनी केले. 

नांदेड येथे संपन्न झालेल्या लाभार्थ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत 'अमृत'च्या विविध योजनांबाबत लाभार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारचा 'अमृत' हा अतिशय महत्वांकांक्षी प्रकल्प आहे. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्यसंघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड केलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्यआर्थिक विकासासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी करणे आदि उपक्रम आहेत. कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देवून स्वावलंबी बनविणेकौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे आदी योजना 'अमृत'मार्फत राबविल्या जात आहेत. या योजनांची खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु इतर कोणत्याही शासकीय कार्यालय, महामंडळे अथवा संस्थांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांनी आवर्जुन लाभ घ्यावाअसे महेश वाकचौरे यांनी सांगितले. 

शहर व जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या त्यांनी भेट घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत विभाग समन्वयक गंगाधर कोलमवार, एस. गजेंद्र, एस. जी. धोतरे, कैलास बंडगर, सत्यनारायण पवळे, बी. बी. बेटमोगरेकर उपस्थित होते. यानिमित्ताने समाजातील विविध मान्यवरांनी काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या. अमृतच्या योजनांची अधिकाधिक व्यापकता निर्माण करण्यासाठी संस्था प्रयत्न करेल, असे आश्वासन वाकचौरे यांनी दिले.

0000




 वृत्त क्र. 38

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी

 18 जानेवारीपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका), दि. 12 :- क्रीडा क्षेत्रात क्रीडा विकासासाठी जीवन व्यतीत केले आहेअशा व्यक्तीना  प्रतिवर्षी राज्य शासनाच्या वतीने शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने शासनास सन 2022-23 या वर्षाचे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी च्या नामांकनासाठी शिफारस करावयाची आहे. त्यानुषंगाने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत 18 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा कार्यालयासी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे 29 डिसेंबर, 2023 शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना करण्यासाठी क्रीडापटू किंवा क्रीडा मार्गदर्शक किंवा कार्यकर्ते अथवा संघटन म्हणून क्रीडा क्षेत्रात काम केले आहे. क्रीडा क्षेत्रातील कार्यामुळे महाराष्ट्राचे नाव देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचविण्यात संस्मरणीय कामगिरी केली आहे किंवा क्रीडा क्षेत्रात मुलभूत स्वरुपाचे विशेष कार्य केले आहे. तसेच त्यांचे वय वर्षे 60 किंवा अधिक आहे, अशा व्यक्तींची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येते, असे क्रीडा विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...