Friday, December 15, 2017

हमीभावाने तूर खरेदीसाठी
ऑनलाईन नोंदणी सुरु
नांदेड दि. 15 :-  केंद्र शासनाचे आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीभावाने हंगाम सन 2017-18 मध्ये तूर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरु आहे. खरेदी विक्री संघामार्फत देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, नांदेड, लोहा, भोकर, हदगाव येथे नोंदणी सुरु आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत नायगाव व किनवट येथे नोंदणी सुरु आहे. हमी भावाने तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.  यासाठी सात / बाराचा उतारा पीक पेऱ्याची नोंद असलेला, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व बँक पासबुकच्या पहिल्या पानची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
श्री खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त  
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 15 :- माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे. त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 14 डिसेंबर ते 21 डिसेंबरच्या मध्यरात्री पर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व माळाकोळीचे स्वाधीन अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक फिरोजखान पठाण यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत.   
श्री खंडोबा यात्रेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, इतर राज्यातून भाविकांची दर्शनासाठी व यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याअनुषंगाने रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे हे फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग  अशा वेळा विहित करण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबद्दल. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये, घाटांत किंवा घाटांवर, सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवालये आणि सार्वजनिक स्थळी किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबाद्दल. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमवणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सुचना देण्यासंबंधी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राखणेकामी योग्य आदेश देण्याबाबत. 
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक फिरोजखान पठाण यांचेकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेले आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात योजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असे आदेशही पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जारी केले आहेत.
00000


उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2017 या वर्षासाठी सोमवार 25 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
      उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
      जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी  पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळीउद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी या कार्यालयाकडे स्थायीरित्या नोंदणीकृत असणे आवश्यक आहे व कमीत कमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापुर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे. नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी सोमवार 25 डिसेंबर पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावाअसे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000
माळेगाव यात्रेत महिला बचतगटाच्या
वस्तुंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री
नांदेड दि. 15 :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील महिला बचत गटांच्या वस्तुंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन वस्त्रोद्योग व पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य विकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते रविवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेत होणार आहे, असे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांनी कळविले आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण राहणार असून जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खा. राजीव सावत, खा. डॉ. सुनील गायकवाड, आ. अमर राजूरकर, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. डी. पी. सावंत, आ. प्रदीप जाधव, आ. वसंत चव्हाण, आ. सुभाष साबणे, आ. हेमंत पाटील, आ. अमिता चव्हाण, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. डॉ. तुषार राठोड, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, आरोग्य व शिक्षण समिती सभापती माधव मिसाळे, कृषि समिती सभापती दत्तात्रय रेड्डी, समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, महिला व बालकल्याण समिती सभापती मधुमती कुंटुरकर, लोहा पंचायत समितीचे सभापती सतीश उमरेकर यांची उपस्थिती राहणार आहे, असेही प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांनी कळविले आहे.

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...