Friday, May 4, 2018


"नीट" परीक्षा रविवारी नांदेड येथे होणार  
विद्यार्थी, परीक्षकांनी नियमांचे पालन करावे
नांदेड दि. 4 :-  वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परिक्षा "नीट"  रविवार 6 मे 2018 रोजी होणार आहे. जिल्ह्यात 44 केंद्रात 17 हजार 400 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्रातील अटी व नियम काळजीपूर्वक वाचून त्याचे पालन करावे. प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि एका छायाचित्राव्यातिरिक्त सोबत काही आणू नाही. पोशाख आणि पादत्राणासंबंधीचे नियम पाळावेत. परीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नीट परीक्षा शहर समन्वयक प्राचार्य फनिंद्र बोरा यांनी केले आहे.
गेल्यावर्षी 34 केंद्रावर 13 हजार 743 विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. त्याचे सुयोग्य नियोजन होरायझनचे प्राचार्य फनिंद्र बोरा यांनी केले होते. त्यामुळे यावर्षीही शहर समन्वयक म्हणून त्यांचेकडेच जबाबदारी बोर्डाने दिली आहे. यावर्षीही प्रशासनाचे त्यांना साह्य मिळत असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नीट परीक्षा शहर समन्वयक प्राचार्य फनिंद्र बोरा यांनी केले आहे.  
000000


राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान अंतर्गत
ग्रंथालय योजनेसाठी प्रस्ताव करण्याचे आवाहन   
नांदेड दि. 4 :-  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे  www.rrlf.nic.in  हे संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी समाननिधी असमाननिधी योजनेसाठी विहित पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह इंग्रजी, हिंदी भाषेमधील प्रस्ताव चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास मंगळवार 15 मे 2018 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालक किरण धांडेारे यांच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयासाठी कार्यन्वित असलेल्या अर्थसहाय्याच्या समान निधी योजनेतून ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्यासंदर्भातील नियम, अटी अर्जाचा नमुना www.rrlf.nic.in  या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी केले आहे. समान निधी योजना 2017-18 साठी राज्य शासनाच्या 50 टक्के प्रतिष्ठानच्या 50 टक्के अर्थसहाय्य राहील. सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार / बांधणीसाठी अर्थसहाय्य कमाल मर्यादा 10 लाख आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
0000000

कॅरेज बाय रोड नियमानुसार नोंदणीचे
आरटीओ कार्यालयाचे आवाहन 
नांदेड दि. 4 :- केंद्र सरकारने लागू केलेल्या कॅरेज बाय रोड अधिनियम 2007  च्या अनुषंगाने माल वाहतूक व्यवसायातील वाहतुकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतुक कंपनी, कागदपत्रे / पाकिटे / मालाची घर पोहच वाहतूक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांनी कॉमन कुरिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे अर्ज करुन नोंदणी प्रमाणपत्र गुरुवार 31 मे 2018 पर्यंत प्राप्त करुन घ्यावीत, असे आवाहन अपर परिवहन आयुक्त यांच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
00000


"नीट" परीक्षा काटेकोरपणे सुरळीत पार पाडावी
- निवासी उपजिल्हाधिकारी कारभारी
नांदेड दि. 4 :- "नीट" ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारी ही एक महत्वपूर्ण परीक्षा आहे. त्यामुळे नियमावलीनुसार कोटेकोर नियोजन करुन परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परिक्षा "नीट"  रविवार 6 मे 2018 रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच आयोजित "नीट" परीक्षा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री कारभारी बोलत होते. 
नांदेड येथील "नीट" परीक्षेसाठी 17 हजार 400 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील 44 केंद्रावर परीक्षा होणार आहे. ही परीक्षा व्यवस्थीत पार पाडण्याची जबाबदारी पर्यवेक्षकांनी समर्थपणे पार पाडावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी केले.
यावेळी परीक्षेसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, परीक्षेचे गोपनय साहित्‍य, आवश्‍यक पोलीस बंदोबस्‍त, परीक्षा केंद्रावर पाण्‍याची व्‍यवस्‍था, आरोग्‍य पथकाची नेमणूक, विद्युत व्यवस्था, विद्यार्थ्‍यांसाठी हेल्पलाइन सेवा, परीक्षा उपकेंद्रातील अंतर लक्षात घेता शहरात जादा सिटी बसची व्‍यवस्‍था तसेच बाहेरुयेणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी जलद बसला थांबा देण्याच्या सूचना दिल्‍या.
बैठकीस पोलीस अधीक्षक कार्यालयाचे एपीआय वैजनाथ मुंडे, मनपाचे उपशिक्षणाधिकारी डी. आर. बनसोडे, विस्तार अधिकारी एस. आर. आळंदे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. व्ही. एम. इंगळे, राज्य परिवहन महामंडळाचे एन. एस. निम्मनवाड, नीट परीक्षेचे जिल्हा संपर्क अधिकारी फनिंद्रा बोरा, नीट अधिकारी आशिष शिरसाठ, आदी उपस्थित होते.  
000000


शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

नांदेड, दि. 4 :- शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नायगाव खै. येथील अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत शैक्षणिक सत्र 2018-19 साठी इयत्ता 6 वी ते 10 वी सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
अनु. जाती, अनु. जमाती, विजाभज, विमाप्र व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी या शाळेत कार्यालयीन वेळेत प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज देण्याची अंतिम मुदत 10 जून 2018 असून प्रवेश शासनाच्या सामाजिक आरक्षणानुसार ठरवून दिलेल्या टक्केवारी नुसार दिले जाणार आहे, असे मुख्याध्यापक अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नायगाव यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.  
00000000



वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 4 :- वेतन पडताळणी  पथकाचा मे 2018 चा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 22 मे ते शुक्रवार 25 मे 2018 या काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे पथक या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झाली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.
00000


ग्राम स्वराज अभियान  
राष्ट्रीय स्तरावरील योजना
ग्रामीण भागातील गरिबांपर्यत पोहचवावी
- केंद्रीय निरीक्षक रेड्डी

नांदेड, दि. 4 :- ग्राम स्वराज अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील विविध योजना ग्रामीण भागातील गरिबांपर्यंत पोहचवावी, असे निर्देश ग्राम स्वराज अभियानातील केंद्रीय पथकाचे निरीक्षक सुब्रमण्यम रेड्डी यांनी दिले. या अभियानांतर्गत संबंधित विभागांनी राबविलेल्या उपक्रमाचा आढावा केंद्रीय निरीक्षकांनी स्नेहनगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवासस्थानी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावर आयोजन करण्यात आले आहे.  
भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने 14 एप्रिल ते 5 मे 2018 या कालावधीत "ग्राम स्वराज अभियान" राबविण्यात येत आहे. या अभियानाची अंमलबजावणी कशाप्रकारे होत आहे तसेच या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय निरीक्षकांचे दोन पथक प्रधानमंत्री कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्ह्यात दाखल झाले आहे. यात केंद्रीय निरीक्षक सुब्रमण्यम रेड्डी, उदय कुमार यांचे एक पथक असून दुसऱ्या पथकात गृहनिर्माण आणि शहर प्रकरण विभागाचे उपसचिव अखिल सक्सेना आणि वाणिज्य विभागाचे उपसचिव मुरलीधर मिश्रा यांचा समावेश आहे. ही दोन पथके जिल्ह्यातील 20 निवडक गावात प्रत्यक्षात भेटी देऊन केंद्र शासनाच्या कल्याणकारी उपक्रमाच्या अंमलबजावणीची पाहणी करुन मार्गदर्शन करीत आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  व्ही. आर. कोंडेकर, आर. डी. तुबाकले, जी. एल. रामोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रविण घुले, जिल्हा कृषि अधिकारी पंडीत मोरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए. बी. कुंभारगावे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. आर. रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय निरीक्षकांनी भेट दिलेल्या गावामध्ये राबविलेल्या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले असून याबाबतचा संकलीत अहवाल व भेटी दरम्यान नागरिकांनी केलेल्या सूचना व मागणीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धींगत करणे, ग्रामीण भागातील गरीबांपर्यंत पोहचणे, सद्यस्थितीत कार्यरत योजनांबाबत माहिती घेणे, नवीन उपक्रमांचा समावेश करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, स्वच्छता सारख्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांना पुढे घेऊन जाणे व पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे या विविध कल्याणकारी उपक्रमांचा यात समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत सामाजिक न्याय दिवस (14 एप्रिल), स्वच्छ भारत दिवस (18 एप्रिल), उज्ज्वला दिवस (20 एप्रिल), राष्ट्रीय पंचायत राज दिवस (24 एप्रिल), ग्राम स्वराज दिवस (28 एप्रिल), आयुष्यमान भारत दिवस (30 एप्रिल), किसान कल्याण दिवस (2 मे ), आजिविका दिवस (5 मे) तर पोषण अभियान (14 - 24 एप्रिल 2018 ) चा समावेश आहे.
या कालावधीत देशातील जास्तीतजास्त गरीब कुटुंब असलेली 21 हजार 58 गावांची निवड करण्यात आली असून "सबका साथ सबका गाव सबका विकास" या विशेष मोहिमेद्वारे प्रधानमंत्री उजाला योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य), प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व मिशन इंद्रधनुष्य या सात योजना या सर्व गावांमध्ये राबवून त्या ठिकाणी शंभर टक्के साध्य पूर्ण करण्याचा मानस आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 20 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या केंद्रीय पथकासोबत संपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी प्रदिप सोनटक्के, डी. आय. गायकवाड, गणेश शिवरात्री, एस. व्ही. येवते हे सहकार्य करीत आहेत.
ग्राम स्वराज अभियानांतर्गत
आजिविकास दिवसाचे आयोजन  
ग्राम स्वराज्य अभियान व कौशल्य विकास अंतर्गत आजिविकास दिवस शनिवार 5 मे 2018 रोजी विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पस येथे सकाळी 10 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषणाचे थेट प्रेक्षपण दाखविण्यात येणार आहे. नागरिक, महिला बचत गटातील सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.  
यावेळी दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण व महिला स्वयंसहाय्यता बचत गटांची माहिती व यशोगाथा सांगण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  
0000000



  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...