Tuesday, April 11, 2023

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी

अर्ज करण्यास 3 मे पर्यत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राष्ट्र उभारणीच्या कार्यात युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करणेस्वच्छता अभियानआरोग्य जागृतीसाक्षरतालिंग, भेदसामाजिक समस्याचे निराकरण करण्यासाठी नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्यावतीने राष्ट्रीय युवा कोर राष्ट्रीय स्वयंसेवक पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आता 3 मेपर्यत मुदतवाढ दिली असून उमेदवारांनी या https://nyks.nic.in/nycapp/main.asp  संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी चंद्रकला रावळकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय युवा कोर राष्ट्रीय स्वयंसेवक पदासाठी उमेदवाराचे वय एप्रिल 2023 रोजी 18 वर्षापेक्षा जास्त व 29 वर्षाच्या आत असावे. उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 वी पास असावे. पदवीधर व समाजकार्य पदवीधरांस प्राधान्य दिले जाईल. स्वयंसेवकासाठी नियमित शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र राहणार नाहीत. मासिक एकत्रित मानधन रुपये 5 हजार रुपये असून यामध्ये प्रवास भत्ता समाविष्ट आहे. ही नोकरी नसल्यामुळे स्वयंसेवकास कोणताही क्लेम मिळणार नाही. कोणत्याही प्रकारचा रोजगारांसाठी अधिकार राहणार नाही. प्रत्येक तालुक्यासाठी स्वयंसेवक असतील. कालावधी एक वर्षाकरीता असून कामाचे स्वरूप लक्षात घेता पुढील वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येईल. नेहरू युवा केंद्र संगठनच्या वेबसाईटवर योजनेची सविस्तर माहिती आहे.  उमेदवार हा नांदेड जिल्हयातील रहिवासी असावा. उमेदवार ज्या तालुक्यातीत आहे त्या तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कार्यालय पत्ता- नेहरू युवा केन्द्र नांदेड, मालेगाव रोड, शिवराय नगर, तरोडा नांदेड मो.क्र. ८९९९२८३७२६ याप्रमाणे आहे.

0000

 

 समता पर्व अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम   

नांदेड (जिमाका) दि. 11 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत एप्रिल ते मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत थेट जनतेशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.  

सामाजिक समता पर्वा निमित्त स्वच्छता मोहिमे अंतर्गत 10 एप्रिल 2023  रोजी वैशाली नगर येथील बौध्द विहार परीसराची स्वच्छता  करण्यात आली.  यावेळी सामाजिक न्याय विकास योजनाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास समाज कल्याण निरीक्षक के.टी. मोरेलिपीक दिनेश दवणेपांडुरंग दोंतुलवाड यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून परिसराची स्वच्छता केली. यावेळी परिसरातील नागरिकांना समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. 

00000

 क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त

बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत एप्रिल ते मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत थेट जनतेशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.   

सामाजिक समता पर्वा निमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त प्रा. डॉ. किरण सगर यांचे  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी समता पर्वा निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देण्यात आले. 

कार्यक्रमांच्या अध्यक्षा श्रीमती प्रा. डॉ. निरंजन कौर सरदार या होत्या. यावेळी क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाज कल्याण निरीक्षक आर.डी. सुर्यवंशीपी.जी. खानसोळेके.टी. मोरे श्रीमती एम.पी. राठोड, श्रीमती व्हडगीर, दत्तहरी कदम, लिपिक डी.आर दवणे, विजय गायकवाड, कैलास राठोडमहेश इंगेवाड  यांची उपस्थिती होती. तसेच जवाहरलाल नेहरु  समाजकार्य  महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. 

0000

जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन     

  

नांदेड (जिमाका) दि. 11 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक समतापर्व अभियान अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी ते 30 एप्रिल या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन व ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारण्यासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश खपलेउपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बापू दासरी यांनी केले आहे.

 

या अभियानांतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्यात येत आहे.  नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षातील प्रवेशित इयत्ता आकरावी व बारावी विज्ञान शाखेतील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप समितीकडे ऑनलाईन भरलेले अर्ज दाखल केली नाहीत अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व सर्व महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या समानसंधी केंद्राचे नियुक्त केलेले प्रमुख प्रतिनिधी (नोडल ऑफिसर) यांना मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकृतीसाठी दिनांक ते 30 एप्रि 2023 दरम्यान जिल्ह्यात तालुका ठिकाणी महाविद्यालय स्तरावर पुढीलप्रमाणे एक दिवसीय जातवैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन व ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकृतीसाठी विशेष मोहिम अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात तालुक्याचे नावदिनांक-वेळ व शिबिराचे ठिकाण पुढील प्रमाणे राहिल. नांदेड शहरासाठी 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत यशवंत महाविद्यालय नांदेड येथे तर लोहा-कंधार तालुक्यासाठी 13 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 वाजेपर्यंत महात्मा फुले महाविद्यालय शेकापूर ता. कंधारअर्धापूर 17 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 मिनाक्षी देशमुख मेमोरियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अर्धापूर. भोकर 18 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 वाजेपर्यंत श्री शाहू महाराज महाविद्यालय बोरगाव रोड भोकरदेगलूर 18 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते दु. 2.30 देगलूर महाविद्यालय देगलूरमुदखेड 19 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 महात्मा गांधी माध्य. व उच्च माध्य.विद्यालय मुदखेड.धर्माबाद व बिलोली 19 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 लाल बहादूरशास्त्री महाविद्यालय धर्माबाद. किनवट 20 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा किनवट. हदगाव 21 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते दु. 2.30 पंचशिल महाविद्यालय हदगावमाहूर 24 एप्रिल  रोजी सकाळी 11 ते  दु. 2.30 श्री रेणुकादेवी कनिष्ठ महाविद्यालय माहूर. नायगाव 25 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 जनता हायस्कूल नायगाव. उमरी 26 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 यशवंत विद्यालय उमरी. हिमायतनगर 27 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते दु. 2.30 हुतात्मा जयवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयहिमायतनगरमुखेड 27 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.   

सर्व प्राचार्यकनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांनी सन 2022-23 या वर्षातील प्रवेशीत इयत्ता 11 व 12 विज्ञान शाखेतील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप समितीकडे जात पडताळणीचे ऑनलाईन भरलेले अर्ज सादर केली नाहीत अशा विद्यार्थ्यांनी तसेच सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य / प्रतिनिधीसमान संधी केंद्राचे नियुक्त प्रमुख प्रतिनिधी व नोडल ऑफिसर यांनी वरीलप्रमाणे तालुका ठिकाणी महाविद्यालय स्तरावर आयोजित केलेल्या शिबिराच्या ठिकाणी माहितीसह उपस्थित राहण्याबाबत कळवावे, असेही आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.  

000000

 डॉल्‍बी सिस्‍टीमचा वापर करण्यास प्रतिबंध 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्‍वये प्राप्‍त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी 14 एप्रिल 2023 रोजी 00.00 वाजेपासून ते 30 एप्रिल 2023 रोजी 24.00 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती काळात जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कोणत्याही व्‍यक्‍तीस फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार डॉल्‍बी सिस्‍टीमचा वापर करण्यास / चालविण्‍यास प्रतिबंध केले आहे. याबाबत फौजदारी प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी आदेश 10 एप्रिल 2023 रोजी निर्गमीत करण्‍यात आला आहे.

00000

 श्री गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेला

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय शहरी पुरस्कार

 

नांदेड (जिमाका), दि. 11 :- श्री गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेला यावर्षाचा (2023) शहरी विभागातील उत्कृष्ट महाविद्यालय शहरी पुरस्कार प्राप्त झाला आहे.  यामध्ये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला.  संस्थेच्यावतीने संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.   

 

विद्यापीठाने गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध महाविद्यालयातून प्रस्ताव मागविले होते. चार जिल्ह्याच्या शहरी विभागातील विविध कॉलेज व संस्थेने आपले प्रस्ताव विद्यापीठास सादर केले होते. यामध्ये श्री गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिक व तंत्र शास्त्र संस्थेनेही संचालक डॉ. यशवंत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता. यानंतर विद्यापीठाच्या समितीने इतर संस्थेसह या संस्थेसही भेट देऊन संस्थेची पाहणी केली होती. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी समितीला सविस्तर माहिती दिली. दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी विद्यापीठात आयोजित समारंभात विविध पुरस्काराचे वितरण केले गेले.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा यांच्या हस्ते संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. 

 

यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र.  कुलगुरू जोगेन्द्रसिंग बिसेन, कुलसचिव सर्जेराव आर. शिंदे यासमवेत विद्यापीठाचे विविध विभागाचे अधिष्ठाता तसेच श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र संस्थेचे अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. एम. बी. कोकरे, अधिष्ठाता (इनोवेशन) डॉ. एस. एस. गाजरे, परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. बोम्बडे  आणि डॉ. आर. आर. मंथालकर इत्यादी उपस्थित होते.

 

या पुरस्काराबद्दल संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी, नियामक मंडळाचे  आजी माजी अध्यक्ष व सदस्य, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, म.रा. मुंबई  तसेच  सह-संचालक तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर व संस्थेतील सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

00000



 मार्चमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्याला 30 कोटी 52 लाख रुपयांचा निधी

▪️पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांना दिला होता दिलासा
▪️महाराष्ट्र शासनाच्या तत्पर निर्णयाची प्रचिती

नांदेड (जिमाका), दि. 11 :- नांदेड जिल्हा व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी मार्च महिन्यात 4 ते 8 मार्च या कालावधीत तसेच दिनांक 16 ते 19 मार्च या काळात पडलेल्या अवेळी पावसामुळे काही शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना वेळीच मदतीचा हात पोहचावा या उद्देशाने तातडीने 177 कोटी 80 लक्ष 61 हजार एवढा निधी 10 एप्रिल रोजी शासन निर्णय काढून संबंधित विभागांना प्रदान करण्यात आला. यासाठी नांदेड जिल्ह्याला 30 कोटी 52 लक्ष 13 हजार एवढा निधी प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना धीर दिला होता. मंत्रालय पातळीवर त्यांनी याबाबत आग्रह धरून नांदेड जिल्ह्यातील बाधितांसाठी ही एक महिन्याच्या आत मदत उपलब्ध करून दिली. जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पाहणी करून शासनाला वेळीच माहिती उपलब्ध करून दिली होती. लाभार्थ्यांना मदत व मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे.
000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...