Tuesday, April 11, 2023

 श्री गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेला

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय शहरी पुरस्कार

 

नांदेड (जिमाका), दि. 11 :- श्री गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेला यावर्षाचा (2023) शहरी विभागातील उत्कृष्ट महाविद्यालय शहरी पुरस्कार प्राप्त झाला आहे.  यामध्ये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला.  संस्थेच्यावतीने संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.   

 

विद्यापीठाने गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध महाविद्यालयातून प्रस्ताव मागविले होते. चार जिल्ह्याच्या शहरी विभागातील विविध कॉलेज व संस्थेने आपले प्रस्ताव विद्यापीठास सादर केले होते. यामध्ये श्री गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिक व तंत्र शास्त्र संस्थेनेही संचालक डॉ. यशवंत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता. यानंतर विद्यापीठाच्या समितीने इतर संस्थेसह या संस्थेसही भेट देऊन संस्थेची पाहणी केली होती. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी समितीला सविस्तर माहिती दिली. दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी विद्यापीठात आयोजित समारंभात विविध पुरस्काराचे वितरण केले गेले.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा यांच्या हस्ते संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. 

 

यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र.  कुलगुरू जोगेन्द्रसिंग बिसेन, कुलसचिव सर्जेराव आर. शिंदे यासमवेत विद्यापीठाचे विविध विभागाचे अधिष्ठाता तसेच श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र संस्थेचे अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. एम. बी. कोकरे, अधिष्ठाता (इनोवेशन) डॉ. एस. एस. गाजरे, परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. बोम्बडे  आणि डॉ. आर. आर. मंथालकर इत्यादी उपस्थित होते.

 

या पुरस्काराबद्दल संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी, नियामक मंडळाचे  आजी माजी अध्यक्ष व सदस्य, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, म.रा. मुंबई  तसेच  सह-संचालक तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर व संस्थेतील सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...