Tuesday, July 18, 2017

जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 7.46 मि. मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 26.10 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 19 :- जिल्ह्यात बुधवार 19 जुलै 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.46 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 119.34  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 249.35 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 26.10 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात बुधवार 19 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील प्रमाणे,  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 5.00 (390.30), मुदखेड- 6.00 (313.49), अर्धापूर- 3.00 (238.33), भोकर- 8.75 (279.75), उमरी- 5.00 (223.99), कंधार- 2.33 (260.00), लोहा- 11.50 (230.99), किनवट- 15.86 (294.73), माहूर- 24.00 (278.14), हदगाव- 8.29 (278.75), हिमायतनगर-9.33 (176.14), देगलूर- 1.67 (159.65), बिलोली- 7.00 (225.40), धर्माबाद- 4.67 (227.35), नायगाव- 4.80 (200.06), मुखेड- 2.14 (212.57) आज अखेर  पावसाची सरासरी 249.35 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3989.64) मिलीमीटर आहे.

00000
योग्यता प्रमाणपत्रासाठी
वाघी येथे वाहनांची तपासणी
नांदेड, दि. 18 :- योग्यता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मौजे वाघी ता. नांदेड येथील गट क्र. 176 येथे नव्याने ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आला आहे. चालक, मालकांनी योग्यता प्रमाणपत्रासाठी वाहने मौजे वाघी येथे तपासणीसाठी आणावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत
विविध घटकासाठी 31 जुलै पर्यंत नोंदणी  
शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे कृषि विभागाचे आवाहन    
नांदेड, दि. 18 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2017-18 करिता नांदेड जिल्ह्यासाठी रुपये 222.12 लाखाचा आराखडा मंजुर झाला आहे. या योजनेतील विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर सोमवार 31 जुलै 2017 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
जिल्हा अभियान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती बैठकीत प्राप्त उद्दीष्टाच्या अधीन राहुन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी सोमवार 31 जुलै पर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करुन स्कीम फाईल करावी. इच्छुकांनी प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यास अडचण आल्यास तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साध अर्ज भरावा.
या योजनेंतर्गत अनुसुचीत जातीसाठी 58.70 लाख रुपये, अनुसुचीत जमाती- 33.37 लाख रुपये सर्वसाधारण- 130.86 लाख रुपये अनुदान याप्रमाणे आर्थिक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत क्षेत्रविस्तार (आंबा घनलागवड, पेरु घनलागवड), पुष्पोत्पादन (सुटीफुले, कंदफुले, कटफुले), सामुहीक शेततळे, यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर 20 एच.पी. पर्यंत), हरीतगृह, हरीतगृहातील भाजीपाला लागवड, शेडनेट, शेडनेट मधील फुले लागवड, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रीया केंद्र, कांदाचाळ, रायपनींग चेंबर, कोल्ड स्टोरेज, मोबाईल प्रिकुलींग युनिट आदी बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण प्रकल्प राबविण्यासाठी नांदेड जिल्ह्याला 27.91 लाख रुपयाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर (20 अश्वशक्ती पर्यंत), पॉवर टिलर (8 अश्वशक्ती पेक्षा कमी), पॉवर टिलर (8 अश्वशक्ती पेक्षा जास्त), 20 एच.पी. पर्यंत ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलीत अवजारे (नांगर, डिस्क नांगर, कल्टीव्हेटर, लेव्हलर ब्लेड, रिजर, पेरणी यंत्र त्यादी) या बाबींचा समावेश आहे. अधीक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

000000
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझाछायाचित्र स्पर्धेसाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ
Ø  निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
Ø   पंचवीस, वीस व पंधरा हजार रुपयांची पारितोषिके
Ø   तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे
नांदेड, दि. 18 :- महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझाछायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा जाहीर केली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 जुलै 2017 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 25 हजार रूपये, 20 हजार रूपये, 15 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीनहजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत.
            महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्,माझीकन्या भाग्यश्री, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी maha.photo01@gmail.com या ईमेल वर दि.31 जुलै 2017 पर्यंत छायाचित्र पाठवावीत. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव, संपूर्णपत्ता, मोबाईल नंबर, छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र 18X30 इंच एचडी (हायरिझॉल्युशन) असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यातयेणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक सहायक संचालक (माहिती) सागर कुमार कांबळे (9175544155) यांच्याशी संपर्क साधावा.

0000000
जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 8.93 मि. मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 25.31 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 18 :- जिल्ह्यात मंगळवार 18 जुलै 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 8.93 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 142.86  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 241.89 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 25.31 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मंगळवार 18 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे,  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 12.50 (385.30), मुदखेड- 16.33 (307.49), अर्धापूर- 13.67 (235.33), भोकर- 1.25 (271.00), उमरी- 4.33 (218.99), कंधार- 8.50 (257.67), लोहा- 6.17 (219.49), किनवट- 8.86 (278.87), माहूर- 6.25 (254.14), हदगाव- 2.43 (270.46), हिमायतनगर-5.67 (166.81), देगलूर- 6.00 (157.98), बिलोली- 15.20 (218.40), धर्माबाद- 8.67 (222.68), नायगाव- 12.60 (195.26), मुखेड- 14.43 (210.43) आज  अखेर  पावसाची सरासरी 241.89 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3870.30) मिलीमीटर आहे.

00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...