Wednesday, May 22, 2019


शेतीशाळेच्या माध्यमातून कृषिक्षेत्रात
महिलांचा सहभाग वाढवून त्यांना निर्णयक्षम बनवा
-         जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे
      
नांदेड दि. 22 :- शेतीशाळेतून कृषिक्षेत्रात महिलांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवून त्यांना निर्णयक्षम बनवणार असल्याचे सांगून शेतीकामामध्ये पुरूषांबरोबर महिलांचा समन्वय तितकाच महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.
नांदेड तालुक्यातील मौजे बोंढारतर्फे आज 22 मे 2019 रोजी नेरली येथे या हंगामातील कापूस पिकावरील महिलांची जिल्हयातील पहिली शेतीशाळा घेवून शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री. चलवदे बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डि. व्ही. पाटील हे होते.
कृषि विभागाच्यावतीने सचिव (कृषि) एकनाथ डवले, आयुक्त (कृषि) सुहास दिवसे व लातूर विभागीय कृषि सहसंचालक तुकाराम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरा प्रत्येक कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांनी एका गावामध्ये शेतीशाळा घेण्यास सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून नांदेड जिल्हयामध्ये सन 2019 च्या खरीप हंगामामध्ये एकूण 908 क्रॉपसॅप संलग्नीत शेतकऱ्यांच्या शेतीशाळा घेण्यात येणार असून प्रत्येक शेतीशाळेच्या गावामध्ये संपूर्ण हंगामात पिकनिहाय 8 ते 10 वर्ग प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर होणार आहेत.
            या शेतीशाळेमध्ये व.ना.म.कृ.वि.परभणी अंतर्गत कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डी.व्ही.पाटील यांनी कापूस पिक लागवड तंत्रज्ञान विषयी माहिती देवून कापसाची कोणकोणती वाण निवडावीत याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नांदेड तालुका कृषि अधिकारी विनायक सरदेशपांडे यांनी शेतीशाळेचे महत्व सांगून कृषितील नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे नमुद केले.
            शेतीशाळेमध्ये जमीन तयार करणे, बियाणे उगवण क्षमती प्रयोग, वाणांची निवड करण्याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. महिला शेतकऱ्यांना कामातून विरंगुळा मिळावा व त्यांच्यामध्ये नवचैतन्य यावे म्हणून सांघीक खेळ (बॉल इन बकेट, पावसाची टाळी) घेण्यात आले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक वसंत जारीकोटे यांनी केले तर आभार कृषि सहाय्यक शंकर पवार यांनी मानले. 
            कार्यक्रमाचे विशेष म्हणजे शेतीशाळेतील निवड केलेल्या 100 टक्के महिलांची उपस्थिती होती. शेतीशाळेच्या यशस्वीतेसाठी बोंढार त.ने.च्या कृषि सहाय्यक श्रीमती सलमा बेगम पाळेकर, मंडळ कृषि अधिकारी लिंबगाव प्रकाश पाटील, कृषि पर्यवेक्षक करंजकर एस.एम., कृषि सहाय्यक वडवळे एम.के., बारसे डी.एन., धुतराज आर.यु., कमठेवाड आर.आर.,श्रीमती शिंदे एस.आर, श्रीमती राजूरकर एम..ए, श्रीमती वासलवार ए.आर, श्रीमती मगर यु.जे., श्रीमती हुस्कुलवाड ए. टी. यांनी परिश्रम घेतले.
00000

  वृत्त क्र.   280   सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आरटीओ कार्यालय राहणार  सुरु     नांदेड दि.  27  :-  सन  2023 2024  हे वित्तीय वर्ष दिनांक  3...