Monday, January 21, 2019

पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्यावतीने नांदेड येथे
माध्यम कार्यशाळेचे (वार्तालाप) आयोजन
नांदेड दि. 18 :- पत्र सूचना कार्यालय मुंबईच्यावतीने नांदेड येथे माध्यम कार्यशाळेचे (वार्तालाप) गुरुवार 24 जानेवारी 2019 रोजी आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वार्तालाप कार्यक्रमात मान्यवर विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधतील. पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे या विभागाच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती देतील.
या कार्यशाळेचे उद्‌घाटन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता हॉटेल चंद्रलोक, हिंगोली रोड, नांदेड येथे करण्यात येईल. या कार्यशाळेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, दै. प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, नांदेड डाक विभागाचे अधीक्षक एस. बी. लिंगायत, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर आदि मान्यवर पत्रकारांशी संवाद साधतील .
या कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड कार्यालयाच्या dionanded16@gmail.com या ई-मेल पत्यावर पूर्व नोंदणी करुन उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्ह्यातील पत्रकारांना जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर तसेच पत्र सूचना कार्यालय मुंबईचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे यांनी केले आहे.
00000

सुधारीत वृत्त क्र.  68  
रास्तभाव धान्य दुकानात
दोन महिन्याची साखर उपलब्ध
नांदेड, दि. 21 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जानेवारी व फेब्रुवारी 2019 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 1 हजार 118 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड 81 , हदगाव -17, किनवट -296, भोकर-45, बिलोली-62.50, देगलूर-121.50, मुखेड-80.50, कंधार-19, लोहा-75, अर्धापूर-12.50, हिमायतनगर-40, माहूर-135, उमरी-9, धर्माबाद-48,नायगाव-55, मुदखेड-21 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000



हरभरा पिकासाठी कृषि संदेश
नांदेड दि. 21 :- नांदेड जिल्हयात हरभरा  पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतक-यांनी पुढीलप्रमाणे  किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे .
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी  इमामेक्टीन बेंझोएट 5 एस जी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. तसेच मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी झाडे  उपटुन ष्ट करावीत हरभरा पिकास पाणी देणे टाळावे. असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...