Friday, August 26, 2022

 जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेश चतुर्थी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे 9 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात श्री गणेश विसर्जन मिरवणूका होवून विसर्जनाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सार्वजनिक  शांतताकायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत.  

 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेश स्थापने निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, सिएलएफएलटीओडी-3 व एफएल/बिआर-2 व टिडी-1 अनुज्ञप्तीधारकांना अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  119 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1, नायगाव 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे धर्माबाद 2 असे एकूण 4 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 404 एवढी झाली असून यातील 1 लाख 687  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 2 तर नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 असे एकूण 5  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 18,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 7 असे एकूण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 16 हजार 577
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 95 हजार 756
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 404
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 687
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-
 01
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 26 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. सन 2022 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छूक व पात्र अर्जदारांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचनानुसार 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिलींद वाघमारे यांनी केले आहे.  

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...