Tuesday, July 28, 2020

वृत्त क्र. 696

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 10.06 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात बुधवार 29 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 10.06 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 161.03 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 397.75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 44.63 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 29 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 20.75 (472.22), मुदखेड- 13.00 (301.00), अर्धापूर- 17.33 (391.66), भोकर- 22.75 (425.98), उमरी- 10.33 (279.63), कंधार- 7.50 (302.00), लोहा- 8.33 (367.32), किनवट- 17.71 (451.10), माहूर- 9.25 (399.00), हदगाव- 3.57 (381.72), हिमायतनगर-2.00 (586.66), देगलूर- 16.67 (432.44), बिलोली- निरंक (363.60), धर्माबाद- 6.67 (402.98), नायगाव- 4.60 (357.00), मुखेड- 0.57 (449.06). आज अखेर पावसाची सरासरी 397.75 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 6364.00) मिलीमीटर आहे.
000000

वृत्त क्र. 695


बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकाचे वितरण
नांदेड (जिमाका) दि. 28 :-  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी फेब्रुवारी-मार्च 2020 परीक्षेच्या गुणपत्रिका, गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयाचे अभिलेखे  निकाल विषयक इतर साहित्यांचे वितरण लातूर विभागीय मंडळातर्फे गुरुवार 30 जुलै 2020 रोजी सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत खालील वितरण केंद्रावर वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्राचार्यांनी आपल्या प्रतिनिधीस लेखी पत्र देवून परीक्षेचे साहित्य स्वीकारण्यासाठी वितरण केंद्रावर पाठवावेत, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
गुरुवार 30 जुलै 2020 रोजी नांदेड जिल्ह्यासाठी पिपल्स हायस्कूल नांदेड येथे सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत नांदेड, अर्धापूर, मुदखेड तालुका तर दुपारी 2 ते सायं 5 वाजेपर्यंत कंधार, लोहा व उमरी तालुका. हुतात्मा जयवंतराव पाटील क. महा. हिमायतनगर येथे सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत हिमायतनगर, भोकर तर दुपारी 2 ते सायं 5 वाजेपर्यंत हदगाव, किनवट व माहूर तालुका. शंकर विद्यालय नरसी (नायगाव) येथील वितरण केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मुखेड, नायगाव तालुका तर दुपारी 2 ते सायं 5 वाजेपर्यंत देगलूर, बिलोली, धर्माबाद तालुक्यांचा यात समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होवू नये यासाठी तालुकानिहाय सकाळ व दुपारच्या नियोजनाप्रमाणे वाटप होणार आहे. सकाळ सत्र सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत तर दुपार सत्र 2 ते सायं. 5 वाजेपर्यंत राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

वृत्त क्र. 695


जिल्ह्यात 134 बाधितांची भर
कोरोनातून आज 30 व्यक्ती बरे तर दहा जणांचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 28 :-  जिल्ह्यात आज 28  जुलै रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 30 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 134 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 284 अहवालापैकी 89 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 528 एवढी झाली असून यातील 770 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 677 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे.
गुरुवार 23 जुलै रोजी वजिराबाद नांदेड येथील 71 वर्षाची एका महिलेचा खाजगी रुग्णालयात तर सोमवार 27 जुलै रोजी जुना कौठा नांदेड येथील 50 वर्षाचा एक पुरुष, सिडको नांदेड येथील  68 वर्षाचा एक पुरुष, मुदखेड येथील 70 वर्षाची एक महिला, किनवट मोमीनपुरा येथील 70 वर्षाची एक महिला, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 80 वर्षाचा एक पुरुष, तर मंगळवार 28 जुलै रोजी नांदेड नवीन मोंढा येथील 63 वर्षाचा एक पुरुष, भोकर रिठा येथील 57 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर नांदेड कुंभार गल्ली वजीराबाद येथील 74 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत पावला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 70 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 30 बाधितांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 21, लोहा कोविड केअर सेंटर येथील 7 तर औरंगाबाद येथे संदर्भित झालेल्या 2 बाधितांचा  समावेश आहे. आतापर्यंत एकुण 770 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.  
नवीन बाधितांमध्ये  पाठक गल्ली नांदेड येथील 22,25,28,32,34,46,46,54,56,60,62,77 वर्षे वयाचे 12 पुरुष व 20,40,42,55,56,63,77 वयाच्या 7 महिला, किल्ला रोड नांदेड येथील 37 वर्षाची एक महिला, नांदेड शिवाजीनगर येथील 30 वर्षाची एक महीला, नांदेड शारदानगर येथील 9,11,77 वर्षाचे तीन पुरुष व 70 वर्षाची एक महिला, नांदेड अंबिकानगर येथील 62 वर्षाचा एक पुरुष, नांदेड हिंगोलीगेट येथील 67 वर्षाचा एक पुरुष, नांदेड नवीन कौठा येथील 38 वर्षाचा 1 पुरुष व 60 वर्षाची 1 महिला, नांदेड शिवशक्तीनगर येथील 54 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड भावसार चौक येथील 19 वर्षाचा 1 पुरुष, हैदरबाग नांदेड येथील 53 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड दत्तनगर येथील 60 वर्षाची 1 महिला, मोमीनपुरा नांदेड येथील 55 वर्षाची 1 महिला, दिलीपसिंग कॉलनी गोवर्धन घाट येथील 58 वर्षाचा 1 पुरुष व 72 वर्षाची 1 महिला, पिजी हॉस्टेल नांदेड येथील 25 वर्षाचा 1 पुरुष, हडको नांदेड येथील 12,35,54,60 वर्षाच्या 4 महिला, सिडको नांदेड येथील 3,35 वर्षाचे 2 पुरुष व 30,35 वर्षाच्या 2 महिला, स्टॉप जीएमसी विष्णुपुरी नांदेड येथील 31 वर्षाची 1 महिला, वाजेगाव नांदेड येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, भोकर रायखोड येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, भोकर कुंभार गल्ली येथील 65 वर्षाची 1 महिला, बिलोली कासरळी येथील 46 वर्षाचा 1 पुरुष, सगरोळी बिलोली येथील 6,35,36,38,42,50 वर्षाचे 6 पुरुष व 30,40,57 वर्षाच्या 3 महिला, बापूनगर देगलूर येथील 63 वर्षाचा 1 पुरुष व 59 वर्षाची 1 महिला,  देशपांडे गल्ली देगलूर येथील 25 व 56 वर्षाच्या 2 महिला, लाईनगल्ली देगलूर येथील 7, 61 वर्षाचे 2 पुरुष व 40,61 वर्षाच्या 2 महिला, बापुनिवास साधनानगर देगलूर येथील 51 वर्षाचा 1 पुरुष व 26 वर्षाची 1 महिला, देगलूर नांदूर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, रफिक कॉलनी देगलूर येथील 42 वर्षाचा 1 पुरुष, कोथे पिंपळगाव देगलूर येथील 61 वर्षाची 1 महिला, नाथनगर देगलूर 54 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर येथील 51 वर्षाचा 1 पुरुष, कोतेकल्लूर देगलूर येथील 23,32,37,40,46 वर्षाचे 5 पुरुष, तोटावार गल्ली देगलूर येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, अल्लापूर देगलूर येथील 58 वर्षाचा 1 पुरुष, घुमटबेस देगलूर येथील 68 वर्षाचा 1 पुरुष, भुतनहिप्परगा देगलूर येथील 62 वर्षाचा 1 पुरुष, शांतीनगर धर्माबाद येथील 37 वर्षाची 1 महिला, रामनगर धर्माबाद 13 वर्षाचा पुरुष व 28,49 वर्षाच्या 2 महिला, देवीगल्ली धर्माबाद येथील 44 वर्षाची 1 महिला, गेट नं 2 धर्माबाद 23,28 वर्षाचे 2 पुरुष, हदगाव येथील 31 वर्षाचा 1 पुरुष व 40 वर्षाची 1 महिला, बामणी हदगाव येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, शिराढोणतांडा कंधार येथील 61 वर्षाची 1 महिला, दिग्रस कंधार येथील 72 वर्षाचा 1 पुरुष, बारुळ कंधार येथील 53 वर्षाचा 1 पुरुष, रंगारगल्ली कंधार येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, मोमीनपुरा किनवट येथील 70 वर्षाची 1 महिला, वाहेगाव बेटसांगवी येथील 32 वर्षाची 1 महिला, जानापूर लोहा येथील 65 वर्षाची 1 महिला, जाहूर मुखेड येथील 32 वर्षाची 1 महिला, शिवाजीनगर मुखेड येथील 6 वर्षाचा 1 मुलगा, सराफा गल्ली मुखेड येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, दापका मुखेड येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, तग्लीनगल्ली मुखेड येथील 22 वर्षाचा 1 पुरुष, बापशेटवाडी मुखेड येथील 5, 41 वर्षाचे 2 पुरुष, खरपखडगाव मुखेड येथील 11,35,40 वर्षाचे 3 पुरुष व 40,50 वर्षाच्या 2 महिला, अंबुलगा मुखेड येथील 8 वर्षाचा एक मुलगा व 13 वर्षाची 1 महिला, मुक्रमाबाद मुखेड येथील 23,34 वर्षाचे 2 पुरुष, महाकाली गल्ली मुखेड येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, कोळी गल्ली मुखेड येथील 15,32,38 वर्षाचे 3 पुरुष व 13 वर्षाची 1 महिला, मुखेड येथील 70 वर्षाची 1 महिला, नायगाव येथील 11,32,36,61 वर्षाचे 4 पुरुष, 29,32,55 वर्षाच्या 3 महिला, हिंगोली येथील 65 वर्षाची 1 महिला, जालना येथील 87 वर्षाचा 1 पुरुष, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील 62 वर्षाचा 1 पुरुष, परभणी येथील 67 वर्षाचा 1 पुरुष व 45 वर्षाची एका महिलेचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात 677 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 116, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 235, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 25, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 15, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 14, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 106, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 62, उमरी कोविड केअर सेंटर 10, लोहा कोविड केअर सेंटर येथे 4, हदगाव कोविड केअर सेंटर 13, भोकर कोविड केअर सेंटर 2, कंधार कोविड केअर सेंटर येथे 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 15, खाजगी रुग्णालयात 45 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
घेतलेले स्वॅब- 12 हजार 940,
निगेटिव्ह स्वॅब- 10 हजार 240,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 134,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 528,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 50,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 8,
मृत्यू संख्या- 70,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 770,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 677,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 264. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000


वृत्त क्र. 694


दहावी परीक्षेचा बुधवारी निकाल
नांदेड (जिमाका) दि. 28 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल बुधवार, दिनांक 29 जुलै, 2020 रोजी दुपारी 1 वा. जाहीर केला जाणार आहे. खाली दिलेल्या संकेतस्थळावर मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.   
मार्च 2020 मध्ये दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. सदर माहितीची प्रत / प्रिंट घेता येईल. www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, www.mahresult.nic.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
या निकालाबाबत अन्य तपशील पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन http://verification.mh-ssc.ac.in/ स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी गुरुवार 30 जुलै 2020 ते शनिवार 8 ऑगस्ट 2020 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरुवार 30 जुलै 2020 ते मंगळवार 18 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट  कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीएल, नेटबँकिंगद्वारे भरता येईल.
मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
मार्च 2020 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होऊ उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 
00000



शासकीय दुध योजना परिसरात
हिरव्या गवताचा 30 जुलैला लिलाव
नांदेड, दि. 28 :- शासकीय दुध योजना नांदेड या योजनेच्या परिसरातील हिरव्या गवताचा सन 2019-2020 चा विक्रीचा जाहीर लिलाव गुरुवार 30 जुलै 2020 रोजी शासकीय दुध योजना नांदेड परिसरात येथे दुपारी 2 वा. होणार आहे, अशी माहिती दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दुध योजना नांदेड यांनी दिली आहे.
लिलावातील अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. लिलावाची बोली बोलण्यापूर्वी कार्यालयात पाचशे रुपये भरावे लागतील. गवताची कापणी व त्यास लागणाऱ्या मजुराची व्यवस्था लिलावधारकाला करणे बंधनकारक राहील. गवताच्या कापणीची मुदत लिलावाच्या तारखेपासून 31 मार्च 2021 पर्यत राहील. गवत कापणीची वेळ सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत राहील. या योजनेच्या आवारात जनावरे चारण्यास मनाई आहे. शासकीय मालमत्तेची, फुलझाडाची व इतर झाडाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. काही नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास भरपाई करुन घेण्यात येईल व ठेका रद्द करण्यात येईल. योजनेतील कर्मचाऱ्यांशी आपण व आपले मजदुर सौजन्याने वागतील याची दक्षता घ्यावी. गवत कापणीबाबतचा करारनामा या कार्यालयात करुन घ्यावा लागेल, तसेच संपूर्ण रक्कमेचा भरणा केल्यानंतर गवत कापण्याची परवानगी देण्यात येईल. परिसरातून गवताचा भारा थेट बाहेर घेऊन जातेवेळी योजनेचे समय लेखक, पाहरेकरी, सहा. सुरक्षा अधिकारी किंवा दुग्धशाळा व्यवस्थापक यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी, कर्मचारी तपासणी करतील. योजनेचे दुग्धशाळा व्यवस्थापकांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. लिलावाच्या अटी व शर्तीनुसार 25 टक्के रक्कम लिलाव झाल्याबरोबर भरणा करावी लागेल तर उर्वरीत रक्कम 75 टक्के ही  10 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत भरावी लागेल. त्यानंतर गवत कापणीची परवानगी देण्यात येईल. रक्कम ठरवून दिलेल्या तारखांना कार्यालयात भरणे बंधनकारक राहील. रक्कम वेळेवर भरणा नाही केली तर ठेका रद्द करण्यात येईल. भरणा केलेली रक्कम 25 टक्के जप्त करुन शासनाकडे जमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी. लिलावात सहभागासाठी तीन पेक्षा जास्त ठेके येणे बंधनकारक आहे. तीनपेक्षा कमी आल्यास किंवा पर्यायी कारणामुळे लिलाव पुढील तारखेस घेण्याचे सर्व अधिकारी दुग्धशाळा व्यवस्थापक यांना राहील, अधिक माहितीसाठी दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दुध योजना नांदेड येथे 02462-226721 वर संपर्क साधावा, असेही आवाहन दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दुध योजना नांदेड यांनी केले आहे.
00000


कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी
घरनिहाय सर्वेक्षणावर भर - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
गावनिहाय पथकांची निर्मिती

नांदेड दि. 28 (जिमाका) :- जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने घरनिहाय तपासणी मोहिमेस प्रारंभ केला आहे. नांदेड महानगरासाठी 15 झोनची निर्मिती करुन सुमारे 460 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असून प्रत्येक झोनला स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी समन्वयासाठी देण्यात आला आहे. ही मोहिम यशस्वी व्हावी यासाठी महानगरपालिका व महसुल यंत्रणा विशेष लक्ष देवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू नये या दृष्टीने सर्व प्रकारचे नियोजन झाले असून कोरोना बाधित व्यक्तींना प्राथमिक अवस्थेतच निदान करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार तात्काळ करता यावेत यावर आम्ही भर दिला आहे. यादृष्टीने 5 हजार ॲन्टीजेन टेस्ट किट्स आता उपलब्ध आहेत. या ॲन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून कोरोना तपासणी मोठया प्रमाणात करण्यात येवून मृत्यूचे सद्यस्थितीत जे प्रमाण वाढले आहे त्यावर आम्ही लवकर नियंत्रण मिळवू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात 1 हजार 309 ग्रामपंचायतीसाठी सुमारे 1 हजार 540 ग्रामविकास यंत्रणा /आशा वर्कर यांच्यामार्फत सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून यांचे सनियंत्रण त्या-त्या बुथ लेव्हल ऑफिसर यांच्याकडे सोपविले आहे.  प्रत्येक बुथनिहाय आरोग्य विषयक प्राथमिक सेवा सुविधा या त्या-त्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निहाय उपलब्ध आहेत. या सर्वेक्षणातून प्राथमिक स्तरावर असलेल्या संशयित रुग्णांची तात्काळ तपासणी करता यावी यासाठी प्राथमिक स्तरावर सुमारे 3 हजार ॲन्टीजेन टेस्ट किट्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तींना तात्काळ त्या-त्या तालुकानिहाय कोव्हीड सेंटरवर उपचारासाठी दाखल करण्यात येईल अशी माहिती डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर 2 हजार व्यक्तींच्या तपासणीची व त्यांच्यावर देखरेखीची जबाबदारी देण्यात आली असून प्रत्येकानी दररोज किमान त्यांच्या नेमून दिलेल्या भागातील दोनशे व्यक्तींचे ऑक्सीमिटर नोंद घेणे निश्चित केले आहे. या सर्व व्यक्तींना आरोग्य सुरक्षितेच्यादृष्टिने मास्क, सॅनिटायझर , शिल्ड आदि साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. याचबरोबर प्रत्येक तालुक्याला किमान तीन स्वॅब टेस्टींग व्हॅन उपलब्ध केल्या आहेत.  एखादया भागात/गावात कोरोना बाधित व्यक्ती आढल्यास त्यांच्यासाठी प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र तीन बसेस तत्पर ठेवण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.
00000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...