Tuesday, July 28, 2020

वृत्त क्र. 695


बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकाचे वितरण
नांदेड (जिमाका) दि. 28 :-  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी फेब्रुवारी-मार्च 2020 परीक्षेच्या गुणपत्रिका, गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयाचे अभिलेखे  निकाल विषयक इतर साहित्यांचे वितरण लातूर विभागीय मंडळातर्फे गुरुवार 30 जुलै 2020 रोजी सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत खालील वितरण केंद्रावर वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्राचार्यांनी आपल्या प्रतिनिधीस लेखी पत्र देवून परीक्षेचे साहित्य स्वीकारण्यासाठी वितरण केंद्रावर पाठवावेत, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
गुरुवार 30 जुलै 2020 रोजी नांदेड जिल्ह्यासाठी पिपल्स हायस्कूल नांदेड येथे सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत नांदेड, अर्धापूर, मुदखेड तालुका तर दुपारी 2 ते सायं 5 वाजेपर्यंत कंधार, लोहा व उमरी तालुका. हुतात्मा जयवंतराव पाटील क. महा. हिमायतनगर येथे सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत हिमायतनगर, भोकर तर दुपारी 2 ते सायं 5 वाजेपर्यंत हदगाव, किनवट व माहूर तालुका. शंकर विद्यालय नरसी (नायगाव) येथील वितरण केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मुखेड, नायगाव तालुका तर दुपारी 2 ते सायं 5 वाजेपर्यंत देगलूर, बिलोली, धर्माबाद तालुक्यांचा यात समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होवू नये यासाठी तालुकानिहाय सकाळ व दुपारच्या नियोजनाप्रमाणे वाटप होणार आहे. सकाळ सत्र सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत तर दुपार सत्र 2 ते सायं. 5 वाजेपर्यंत राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...