Sunday, January 18, 2026

 विशेष लेख

गुरु तेग बहादूर आणि संत नामदेव: मूलभूत विचारांची समानता

“हिंद दी चादर” नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा ही विविध संत, गुरू आणि विचारवंतांच्या योगदानातून समृद्ध झालेली आहे. या परंपरेत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे अग्रणी संत नामदेव महाराज (इ.स. १२७०–१३५०) आणि शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर साहिब (इ.स. १६२१–१६७५) हे दोन युगपुरुष वेगवेगळ्या काळात जन्मले. या दोघांमध्ये सुमारे तीन शतकांचे कालांतर असले, तरी त्यांच्या जीवनकार्याचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यास मूलभूत विचारधारेत लक्षणीय समानता आढळून येते. ही समानता अधोरेखित करण्याच्या दृष्टीने नांदेड येथे आयोजित करण्यात येणारा “हिंद दी चादर” हा विशेष उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतो.

संत परंपरेचा समान मूल्याधिष्ठान संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून भक्ती, सत्य, साधेपणा आणि मानवी समता यांचा पुरस्कार केला. त्यांनी जात, वर्ण आणि कर्मकांडांवर आधारित भेदभावाला ठाम विरोध केला. “ईश्वर सर्वत्र आहे” ही भावना त्यांच्या विचारांचे केंद्रबिंदू होती.

त्याचप्रमाणे श्री गुरु तेग बहादूर साहिब यांनीही ईश्वर एक असून तो सर्व मानवांचा आहे, असा सार्वत्रिक दृष्टिकोन मांडला. त्यांनी धार्मिक असहिष्णुता, अन्याय आणि जबरदस्तीविरुद्ध उभे राहून मानवमूल्यांचे संरक्षण केले.

निर्भयता, सत्यनिष्ठा आणि बलिदान संत नामदेव महाराजांनी सामाजिक अन्यायाविरोधात निर्भयपणे आवाज उठविला. सत्य आणि नामस्मरण हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी आपल्या रचनांमधून स्पष्ट केले.

श्री गुरु तेग बहादूर साहिब यांनी सत्य, धर्मस्वातंत्र्य आणि मानवी स्वाभिमान यांसाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांनी स्वतःच्या धर्मापुरते मर्यादित न राहता इतर धर्मीयांच्या हक्कांसाठी प्राणांची आहुती दिली. त्यामुळे त्यांना “हिंद दी चादर” म्हणून गौरविण्यात येते.

मानवी स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान संत नामदेवांनी माणसाच्या अंतःकरणातील शुद्धता आणि आत्मसन्मान यांना सर्वोच्च स्थान दिले. बाह्य आडंबरांपेक्षा अंतर्गत भक्ती व नैतिकता महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गुरु तेग बहादूर साहिब यांनी व्यक्तिस्वातंत्र्य, विशेषतः धार्मिक स्वातंत्र्य, हा मानवी जीवनाचा मूलभूत अधिकार असल्याचा संदेश आपल्या आचरणातून दिला.

“हिंद दी चादर” उपक्रमाचे महत्त्व

नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागमानिमित्त आयोजित करण्यात येणारा “हिंद दी चादर” हा विशेष उपक्रम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभाव यांचा संदेश देणारा आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर साहिब यांच्या त्याग, बलिदान व मानवतावादी विचारांचा प्रसार करण्यात येत असून, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील संत नामदेव महाराजांच्या विचारांशी असलेली वैचारिक समानता अधोरेखित करण्यात येत आहे.

सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता

संत नामदेव महाराज आणि गुरु तेग बहादूर साहिब यांच्या विचारधारेमुळे समाजात सहिष्णुता, बंधुता आणि समतेची भावना दृढ झाली. या दोन्ही महापुरुषांचे विचार आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीतही मार्गदर्शक ठरतात.

“हिंद दी चादर” या उपक्रमातून विविध धर्म, पंथ आणि समाजघटकांमध्ये परस्पर सन्मान व समन्वयाची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

संत नामदेव महाराज आणि श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्यात जरी तीन शतकांचे कालांतर असले, तरी सत्य, निर्भयता, मानवी स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि ईश्वरभक्तीची सार्वत्रिक भावना ही दोघांच्या विचारधारेची समान सूत्रे आहेत. नांदेड येथे आयोजित “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष उपक्रम हा या महान परंपरेचे स्मरण करून देणारा व भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा उपक्रम आहे.

- प्रभाकर बारहाते,  प्र. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली

***



विशेष वृत्त  

“हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे आज वारकरी संमेलन; 

* पूर्वतयारीचा घेतला आढावा

हिंगोली, दि. १८ (जिमाका):  नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या “हिंद दि चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून संत नामदेव महाराज यांच्या पावन भूमीवर नरसी नामदेव येथे उद्या सोमवार, (दि. १९) रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

सदर वारकरी संमेलनाच्या अनुषंगाने आज कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा समाजबांधवांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या पूर्वतयारी पाहणीवेळी हिंद दि चादर”च्या नांदेड क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य ॲड. संतोष राठोड, संत नामदेव मंदिर ट्रस्टचे सचिव द्वारकादास सारडा, सुखबीर सिंग अलग, अंबादास दळवी, संदीप राठोड, विकास राठोड, प्रीतम राठोड, सचिन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.

 उद्या होणाऱ्या या वारकरी संमेलनातून संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार होऊन सामाजिक एकात्मता, सद्भावना व आध्यात्मिक जागृतीला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थेबाबत सविस्तर पाहणी करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

***






विशेष वृत्त क्रमांक 61  

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने गठीत समित्यांचा सविस्तर आढावा

सर्वांच्या सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा कार्यक्रम यशस्वी करा – सचिव रुचेश जयवंशी

नांदेड, दि. १८ जानेवारी : नांदेड शहरातील मोदी मैदानावर आयोजित “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून, या भव्य कार्यक्रमाचे सूक्ष्म व सुसूत्र नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी २६ विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून, या समित्यांमार्फत प्रत्येक लहान-मोठ्या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या समन्वयाने व सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा हा कार्यक्रम यशस्वी होईल, अशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन, भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचे आयोजन मोदी मैदान, नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज मोदी मैदानावर गठीत समित्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, शहीदी समागम समितीचे शासकीय समन्वयक डॉ. जगदीश सकवान, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, लातूर विभागाचे प्र. माहिती उपसंचालक विवेक खडसे, सर्व समित्यांचे नोडल अधिकारी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजितसिंघ कडेवाले यांच्यासह सर्व शासकीय व अशासकीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रभावी प्रचार-प्रसिद्धीसाठी इन्फ्ल्युएन्सर्सची भूमिका महत्त्वाची – जिल्हाधिकारी

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या काळात सोशल माध्यमे ही प्रभावी प्रसिद्धीची साधने ठरत असून, त्यामध्ये इंस्टाग्राम हे अल्प कालावधीत मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचणारे प्रभावी माध्यम आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

नांदेड येथे आयोजित “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, इंस्टाग्रामसह विविध सोशल माध्यमांचा सकारात्मक व प्रभावी वापर करून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. यासाठी स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील इन्फ्ल्युएन्सर्सनी पुढे येऊन सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य, सेवा आणि बलिदानाचा संदेश देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने समाज माध्यमातून त्याचा आशय प्रभावीपणे प्रसारित करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.

२६ शासकीय समित्यांच्या कामकाजाचा सखोल आढावा

यावेळी “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या एकूण २६ शासकीय समित्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व त्यांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. आवश्यक त्या सूचना देत समन्वय अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

याप्रसंगी समन्वयक रामेश्वर नाईक यांनी दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे होणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत संपूर्ण नियोजनाची माहिती दिली व संबंधित समिती सदस्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
000000










विशेष वृत्त  

'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती घरोघरी पोहचवा -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
लातूर, दि. 18 : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथील भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीमार्फत आयोजित या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. या कार्यक्रमाची माहिती घरोघरी पोहचवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.
'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात राबविण्यात असलेल्या उपक्रमांचा जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
नांदेड येथे 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर पोहचविण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. ते अधिक प्रभावी होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. यासोबतच जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका स्तरावरुनही जनजागृती उपक्रम आयोजित करावेत. या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
नांदेड येथील कार्यक्रमात जास्तीत नागरिकांनी सहभागी व्हावे
शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 52 एकरांच्या परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र, साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स व आरोग्य शिबिरे उभारली जात आहेत. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातूनही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
***

विशेष वृत्त  

हिंद दी चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीकडून व्यापक जनजागृती अभियान

हिंगोली, दि.१८ (जिमाका) : नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीच्या वतीने विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने सोमवारी (दि. १९ जानेवारी) रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान व धर्मस्वातंत्र्याच्या महान विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील मान्यवर, स्थानिक नागरिक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीचे अशासकीय सदस्य हरनाम सिंह यांनी यावेळी बॅनर व प्रचार पत्रके वितरित करून तसेच व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून हिंद दी चादर शहीदी समागमाची नांदेड, हिंगोली, जालना येथे माहिती दिली. यावेळी हरणामसिंग चव्हाण, अशासकीय सदस्य‌ जगबीर सिंग बावरी, शेरसिंग बावरी, लखनसिंग टाक, जितुसिंग टाक आदी समाजबांधवांकडून शिकलकरी वस्तीत विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत असून, दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात प्रचाररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून गावोगावी, वस्ती तांड्यांवर भेटी देत कार्यक्रमाचे सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या प्रचार मोहिमेत अशासकीय सदस्य अ‍ॅड. संतोष राठोड तसेच डॉ. आकाश राठोड यांचाही महत्त्वाचा सहभाग असून त्यांनी समागमाच्या उद्देशावर प्रकाश टाकण्यात येत आहे.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान हे केवळ शीख समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हिंद दी चादर शहीदी समागमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा व राष्ट्रभावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निर्देशानुसार, नरसी नामदेव येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या वारकरी संमेलनाच्या यशस्वी आयोजनाच्या प्रसार व प्रचारासाठी अंबादास दळवी हे सक्रियपणे कार्यरत असून, त्याचाच एक भाग म्हणून नरसी नामदेव व नरसी फाटा परिसरात बॅनर लावून प्रचार सुरू करण्यात आला आहे.

नांदेड येथे होणाऱ्या या ऐतिहासिक शहीदी समागमासाठी हिंगोली जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

****












विशेष वृत्त  

'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती घरोघरी पोहचवा -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

लातूर, दि. 18 : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथील भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीमार्फत आयोजित या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. या कार्यक्रमाची माहिती घरोघरी पोहचवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.

'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात राबविण्यात असलेल्या उपक्रमांचा जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

नांदेड येथे 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर पोहचविण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. ते अधिक प्रभावी होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. यासोबतच जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका स्तरावरुनही जनजागृती उपक्रम आयोजित करावेत. या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

नांदेड येथील कार्यक्रमात जास्तीत नागरिकांनी सहभागी व्हावे

शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 52 एकरांच्या परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत आहे. नागरिकांच्या  सोयीसाठी महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र, साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स व आरोग्य शिबिरे उभारली जात आहेत. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातूनही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

***

विशेष वृत्त  

'हिंद-दी-चादर' कार्यक्रम जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीचा लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घेतला आढावा

* लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मंगळावर, बुधवारी प्रभात फेरीचे आयोजन

लातूर, दि. १८ : हिंद-दी-चादर गुरु श्री तेग बहादूर साहिबजी यांचा इतिहास सर्व विद्यार्थी व समाजातील नागरिकांपर्यंत पोहचावा, यासाठी शिक्षण विभागामार्फत विशेष उपक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक शनिवारी घेण्यात आली. सर्व आस्थापनांच्या शाळांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंद-दी-चादर गुरु श्री तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे भव्य कार्यक्रम राज्यस्तरीय समागम समिती व राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत होत आहे. या अनुषंगाने शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या जनजागृती कार्यक्रमाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीस शिक्षण सहाय्यक संचालक संजय पंचगल्ले, प्राथमिक शिक्षण विभागाचे नोडल अधिकारी संजय पारसेवार, माध्यमिक शिक्षण विभागाचे नोडल अधिकारी मधुकर ढमाले तसेच प्रशासन अधिकारी अशोक कदम व विभाग समन्वयक श्री माधव बाजगिरे हे उपस्थित होते.

राज्य समन्वयक समितीने शिफारस केलेले श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावरील गीत सर्व २ हजार ६६६ शाळा व महाविद्यालयांमध्ये दररोजच्या परिपाठात गाण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. हे गीत सर्व विद्यार्थ्यांना व समाजातील नागरिकांना श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाची ओळख करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे डॉ. मठपती म्हणाले.

याशिवाय, जनजागृती मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधून मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रॅलीद्वारे विद्यार्थी व शिक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 'हिंद की चादर' या उपाधीचे महत्त्व व त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतील, असे डॉ. मठपती यांनी सांगितले. या बैठकीला सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन उपस्थिती होती.

**





विशेष वृत्त  

हरिभाऊ घोगरे हायस्कूल,उपळे (मा.) येथे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांना अभिवादन

धाराशिव दि.१८ जानेवारी (जिमाका) धाराशिव तालुक्यातील उपळे (मा.) येथील हरिभाऊ घोगरे हायस्कूलमध्ये १७ जानेवारी रोजी ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात प्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून केले.यावेळी व्यासपीठावर प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री.टी.डी.कांबळे,शिक्षक श्री.ए.बी. क्षीरसागर,श्रीमती घोगरे व श्रीमती वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक सचिन कांबळे यांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला.वैराग्य,धैर्य,धर्मसंरक्षण तसेच धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले महान बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अतुलनीय त्यागामुळेच भारतीय समाजात मानवतावादी मूल्ये,सहिष्णुता व राष्ट्रनिष्ठेचा संदेश दृढ झाला,असे मत त्यांनी व्यक्त केले.

या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक सलोखा आणि मानवतेची जाणीव निर्माण झाली.उपस्थित सर्वांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार श्री.ए.बी.क्षीरसागर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम श्रद्धा, शिस्तबद्धता व प्रेरणादायी वातावरणात उत्साहपूर्वक पार पडला.

*****





विशेष वृत्त क्रमांक 60  

'हिंद-दी-चादर'चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा 

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

🔹नाविन्यपूर्ण प्रसिद्धीवर भर द्या

🔹नांदेडमधील ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

नांदेड, दिनांक १८ (जिमाका) : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या ऐतिहासिक 'शहीदी समागम' सोहळ्याचे विचार   खेडोपाडी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत,असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले. 

येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या प्रसिद्धी कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत श्री.पापळकर यांनी प्रसिद्धी यंत्रणेला मार्गदर्शन केले.गुरुजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर द्या, असेही ते म्हणाले.

 शिक्षण विभागासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी शिक्षण विभागाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे श्री.पापळकर यांनी नमूद केले.शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरी,निबंध,चित्रकला,प्रश्नमंजुषा आणि समूहगान असे उपक्रम राबवून विद्यार्थी व पालकांपर्यंत कार्यक्रमाचा संदेश पोहोचवावा.तसेच,शासकीय कार्यालये, पेट्रोल पंप आणि सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्ज लावून वातावरण निर्मिती करावी,अशा सूचना त्यांनी दिल्या.

 सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा 

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नियोजनावर भर दिला.ते म्हणाले,की मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबतच सोशल मीडियाचा (समाज माध्यमे) प्रभावी वापर करून राज्यासह राज्याबाहेरही या कार्यक्रमाची माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.

 १० लाख भाविकांची उपस्थिती; आंतरराष्ट्रीय महत्त्व 

हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक ऑनलाईन माध्यमातून म्हणाले,की हा कार्यक्रम देश-विदेश पातळीवर अत्यंत महत्त्वाचा आहे.या महासोहळ्यात केवळ शीख समाजच नव्हे,तर सिकलीगर,बंजारा,लबाना, सिंधी,मोहयाल,वाल्मिकी,उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव समाज आदी समाजासह इतर समाज असे मिळून सुमारे १० लाख भाविक सहभागी होणार आहेत.त्यामुळे प्रसिद्धीची व्याप्ती मोठी असावी.

यांची होती उपस्थिती 

या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर,शहीदी समागम समितीचे शासकीय समन्वयक डॉ. जगदीश सकवान,लातूर विभागाचे प्र.माहिती उपसंचालक विवेक खडसे आणि नांदेड-परभणीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, लातूर प्र.जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप,हिंगोली प्र.जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते  लातूर विभागाचे सहायक संचालक (माहिती) डॉ.श्याम टरके प्रत्यक्ष उपस्थित होते.

तसेच ऑनलाईन माध्यमातून हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माध्यम समन्वयक संतोष आंधळे, छत्रपती संभाजीनगर माहिती विभागाचे प्र.उपसंचालक प्रशांत दैठणकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने (छत्रपती संभाजीनगर),अरुण सूर्यवंशी (जालना),गोपाळ साळुंखे (धुळे), सुनील सोनटक्के (सोलापूर), डॉ. रवींद्र ठाकूर (जळगाव),विभागीय संपर्क अधिकारी श्रद्धा मेश्राम आणि छत्रपती संभाजी नगर विभागाचे सहायक संचालक गणेश फुंदे यांनी सहभाग नोंदविला.सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी आपापल्या जिल्ह्यातील प्रसिद्धी नियोजनाची सविस्तर माहिती सादर केली.

******








विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...