Sunday, January 18, 2026

विशेष वृत्त क्रमांक 57

 “हिंद दी चादर” या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची आज नांदेड आकाशवाणीवर मुलाखत

नांदेड दि. 18 जानेवारी :-  “हिंद दी चादर” या कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्री तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम  कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नांदेड आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत सोमवार. दि. 19 जानेवारी २०२६ रोजी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी नांदेड आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे. 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर शासन आणि समाजाच्यावतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री व संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वानी योगदान द्यावे व या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

सर्व नांदेडकर, श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकावी,असे आवाहन सहायक निदेशक तथा केंद्र प्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.

00000



No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...